Posts Tagged 'ह. अ. भावे'

१४१) एडिसन चरित्र / लेखक ह. अ. भावे

141-edisan-1

१४१) एडिसन चरित्र / लेखक ह. अ. भावे / वरदा बुक्स / पहिली आवृत्ती ०१-०५-१९९५ / पृष्ठे २५० / रुपये १२० 

एडिसनने १८८१ मध्ये दिव्याचा शोध लावला व तो जगात अजरामर झाला. परंतु एडिसनची हि ओळख फारच अपूर्ण आहे. आपल्या ८४ वर्षांच्या आयुष्यात त्याने १३०० शोध लावले व व्यापारी दृष्टीने वापरले.

विजेच्या दिव्यासाठी त्याने १०००० प्रयोग केले. तर संचायानी बॅटरीसाठी ५०००० प्रयोग केले. दिवसाचे १८-२० तास त्याने अथक काम केले. त्याचा ध्वनिमुद्रणाचा   शोध पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. सिनेमा, टेलिफोन, ग्रामोफोन, शहराला वीज वाटप, टाईपरायटर अश्या प्रमुख शोधांची नावे पाहिली कि आपण थक्क होतो.

एडिसन हा मातृभक्त होता. एडिसन विद्या शिकायला कोणत्याच शाळेत गेला नव्हता, हे विशेष. एडिसनने आपला जन्म मानव जातीच्या कल्याणासाठी वापरला.

त्याचे चरित्र लहान थोर सर्वांसाठी स्फूर्तिदायक आहे. एडिसनकडे कामाची चिकाटी होती आणि प्रत्येक काम हे चांगलेच झाले पाहिजे हि त्याच्या आईची शिकवण त्याच्या मनात कायम घर करून असे.

एका छोट्या मुलाला आशीर्वाद देताना एडिसन म्हणतो कि ” छोट्या दोस्ता, काम करताना तू घडाळ्याकडे कधीच पाहत जाऊ नकोस.”

७७ व्या वाढदिवशी एका प्रश्नाला तो उत्तर देतो ” निसर्गाची गूढ कोडी उलगडणे  आणि त्यांचा उपयोग मानवी जीवन जास्त जास्त सुखमय करण्याकडे करणे हेच माझे ध्येय आहे. ”

मित्रांनो, वेळात वेळ काढून हे पुस्तक वाचा.

सुधीर वैद्य 

०२-०९-२०१६


Archives

April 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.