Archive for the 'Spandane Articles' Category

५३७) माझा तिसरा पुनर्जन्म – २४-०७-१९९६

537) Accident - 1       537) Accident - 2

537) Accident - 3                   537) Accident - 4

५३७) माझा तिसरा पुनर्जन्म  – २४०७१९९६

मित्रानो , सुप्रभात

आज २४-०७-२०१७, माझ्या तिसऱ्या पुनर्जन्माला २१ वर्षे पूर्ण झाली. मला कल्पना आहे कि ह्या वाक्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.  खरेच मी आजपर्यंत मृत्यूला चार वेळा हुलकावणी देऊन आलो आहे. .

२४-०७-१९९६ रोजी एका जीवघेण्या अपघातातून मी आणि पत्नी  बचावलो. खासगी बस रस्ता सोडून बाजूच्या खड्ड्यात पडली. माझी बरगडी आणि उजवा हात fracture झाला. डाव्या हातात काचा घुसल्या. डाव्या हाताची करंगळी थोडी कापली गेली. काही काळ मी बेशुद्ध होतो. त्या अपघाताची आठवण मी आजही विसरू शकलो नाहीये. नशिबाने वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध झाली त्यामुळे मी सावरू शकलो. माझ्या पत्नीच्या डोळ्याभोवती १५ टाके घ्यावे लागले पण डोळा वाचला. असो .

आजही २३ आणि २४ जुलै १९९६ ची आठवण झाली की मन कावरेबावरे होते. पावसाचे थैमान २२ जुलै पासून सुरु होते. संपूर्ण शहराला पावसाने ग्रासले होते. २३ जुलैला सकाळी ६ वाजता आम्ही बसने निघालो. बसमध्ये फक्त दहा प्रवासी होते. रस्त्यावर दोन फूट पाणी होते आणि त्या पाण्याला कापत  सुसाट वेगाने आमची बस निघाली. खरेतर त्याच दिवशी अपघात होणार होता. पण आम्ही वाचलो. दुसऱ्या दिवशी लग्नाला हजेरी लावून दुपारी त्याच बसने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

एक दिवसाची  वर्षा  सहल म्हणून पत्नीच्या आग्रहाखातर मी गेलो होतो. त्याच आठवड्यात वाईट स्वप्ने सुद्धा पडली होती. पण अपघात झाला आणि एक दिवसाची वर्षा  सहल आयुष्यभराचा धडा शिकवून गेली.

त्या दिवसानंतर माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. एका नवीन सुधीरने परत जन्म घेतला. आयुष्याची भाषा – संकल्पना सगळे काही बदलले. त्यातून मी स्वत:ला सावरले. आयुष्याचा ट्रॅक  बदलला व पुन्हा एकदा आयुष्याला भिडलो. दोन वर्षांनी डिसेंबर १९९८ मध्ये  परत एकदा चौथ्यांदा मरता  मरता वाचलो. असो.

माझ्या चार वेळच्या  मरणाचे अनुभव संकेत स्थळावरील एका लेखात शब्दबद्ध केले आहेत.  🙂 😦

२४ जुलै जसा माझ्या आयुष्यात खास दिवस आहे, तसाच भारताच्या इतिहासातही हा खास दिवस आहे. २४ जुलै १९९१ रोजी देशाचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर झाले. तेव्हा डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान होते. त्या दिवसानंतर आपल्या देशात खा (खाजगीकरण ) उ (उदारीकरण ) जा (जागतिकीकरण ) संस्कृतीने जन्म घेतला आणि बघता बघता  देशाने महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरवात केली. ह्या धोरणाची फळे सध्या आपण चाखत आहोत.

आजचा पावसाळी दिवस तुम्हा सर्वांना  आनंदाचा जाओ.

सुधीर वैद्य 

२४०७२०१७


Archives

August 2017
M T W T F S S
« Jul    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.