Archive for the 'Spandane – The Art of Living' Category

६९१) क्लिक म्हणजे काय ?

६९१) क्लिक म्हणजे काय ?

आपल्या आयुष्यात ह्या क्लिक होण्याला बरेच महत्व आहे ?

अगदी कोणते शिक्षण घेऊ?

कोणती नोकरी स्वीकारू ?

कोणता फ्लॅट घेऊ ?

दोन आवडलेल्या जोडीदारापैकी कोणाशी विवाह करू ? इत्यादी .

प्रत्येक वेळी हा आतला आवाज ऐकायला येतोच असे नाही . तर काही वेळा त्या आतल्या आवाजाप्रमाणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य किवा परिस्थिती असतेच असे नाही. पण ह्या आतल्या आवाजाचे महत्व मात्र आहे, हे नक्की .

जेव्हा निर्णय घेताना मनात शंका येत राहते, मन अस्वस्थ होते, अश्यावेळी मनात आलेला पहिला विचार काय होता हे आठवा. अनेक वेळा हाच खरा आतला आवाज असतो. परंतु आपल्या मनाची खात्री नसल्यामुळे आपण आपल्या कुवतीनुसार किंवा सल्लागारांच्या मदतीने त्या प्रश्नांची उत्तरे शॊधण्याचा प्रयत्न करतो.

अनेक वेळा व्यावहारिक पातळीवर उपलब्ध माहितीचा उहापोह केल्या नंतर सुद्धा सर्व उपाय वापरून काढलेल्या उत्तराने तुमच्या मनाचे समाधान होत नाही. हीच ती वेळ स्वत:ला सावरण्याची असते व शांतपणे मनाचा कानोसा घेण्याची किंवा आतला आवाज ऐकण्याची. ह्या बाबतीतला माझा अनुभव फार चांगला आहे. आपल्या मनाची ताकद एव्हडी आहे कि प्रश्न निर्माण झाल्यानंतर अनेक शक्यता व उत्तरे मनात झर्रकन येतात. आपण प्रश्नाचा अभ्यास नंतर करतो, पण मनाने हा अभ्यास एका झटक्यात केलेला असतो. बघा एकदा प्रयत्न करून.

निर्णय घेताना शॉर्ट टर्म तसेच लॉन्ग टर्म स्वप्नांचा विचार आवश्यक असतो. तसेच what is call of the day, call of the year मनात पक्के पाहिजे. उत्तर शोधताना आपल्या भावनांना आणि अपेक्षांना आवर घालता आला तर फार उत्तम.

लग्नाच्या बाबतीत भेटीगाठी घेऊन अधिक माहिती मिळाल्यानंतर परत एकदा आतला आवाज तपासून बघणे हा उपाय चांगला आहे . पण अशा भेटीगाठी, समाजाचे आणि नातेवाईकांचे दडपण न येता, किती वेळा शक्य असतील हा प्रश्न आहे. जर भेटीगाठी खरेच महत्वाच्या असत्या तर सर्व प्रेमविवाह यशस्वी झाले असते .

​मित्रांनो, विषयाचा आवाका मोठा आहे. माझे विश्लेषण वाचून मुद्दा क्लिक झाला का हे कळवायला विसरू नका. ​


​​सुधीर वैद्य

०१-०४-२०२२​

Time Permitting, Follow me on …..

https://spandane.wordpress.com


Archives

May 2024
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.