Archive for the 'Spandane Medical' Category

५२७) माझे ४८ वे ईबुक – वैद्यकीय ज्योतिषशास्त्र 

Doctor - 4                         Horoscope

५२७) माझे ४८ वे ईबुक – वैद्यकीय ज्योतिषशास्त्र 

सुप्रभात.

मला कळविण्यास आनंद होत आहे कि माझे ४८ वे ईबुक पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच माझ्या ब्लॉगवर अपलोड केले जाईल.

मी काही रूढ अर्थाने ज्योतिषी नाही.आयुष्यातील घटनांची सांगड घालण्यासाठी मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास सुरु केला. (१९८७) माझ्या दोन परम मित्रांनी मला ज्योतिष शास्त्राचे प्राथमिक धडे दिले. आज ते दोघेही हयात नाहीत. त्यानंतर  माझा व्यवसाय सांभाळून मी ह्या शास्त्राचा अभ्यास सुरु ठेवला. वेळोवेळी नोट्स काढत गेलो. माझ्या गुरूंबरोबर चर्चेचा सिलसिला चालूच होता. ज्योतिष शास्त्राचे गाईड बनविले, परंतु थोड्या वेगळ्या स्वरूपात. बरेचसे लिखाण माझ्या संकेत स्थळावर अपलोड केले.

CA चा व्यवसाय  सांभाळून मी पर्यायी वैद्यकीय शास्त्राचा सुद्धा अभ्यास एका प्रतिथयश डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली केला. (१९९७). त्यानंतर मेडिकलची  अनेक पुस्तके वाचून नोट्स काढल्या. हे लिखाण सुद्धा माझ्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे,

तेव्हापासून सहनिवासातील ज्येष्ठ नागरिक माझ्या घरी रक्तदाब तपासायला येतात. तब्बेतीच्या तक्रारी सांगतात. मी काही घरगुती उपाय सुचवितो. पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स समजावून सांगतो. त्या आजाराची माहिती व काय काळजी घेणे आवश्यक आहे ह्याचे मार्गदर्शन करतो. मुख्य म्हणजे त्यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारतो. त्यामुळे त्यांचा अर्धा आजार पळून जातो. हा उपक्रम १९९८ पासून चालू आहे. मी कोणतेही मानधन घेत नाही. खरेतर ह्या माझ्या छंदापायी मी खूप वेळ आणि पैसा खर्च केला आहे.

ह्या दोन विषयांचा अभ्यास केल्यानंतर  वैद्यकीय ज्योतिष शास्त्र शिकण्याचे माझ्या मनात आले. सुरवात तर केली पण काही ना काही कारणांमुळे योग्य ती गती मिळत नव्हती. शेवटी एकदाचा मी ह्या अभ्यासाच्या एका टप्प्यापर्यंत पोचलो आहे. कोणतेही शास्त्र म्हणजे सागरा सारखे असते. कितीही अभ्यास केला तरी अपूर्णच  असते. असो.

आजचा दिवस सर्वांना सुखाचा आणि समाधानाचा जो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य

१८-०६-२०१७


Archives

June 2017
M T W T F S S
« Apr    
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.