Archive for the 'Uncategorized' Category

७०) बालपण 

७०) बालपण 

बालपण हे बालपण असते

असले तरी प्रत्येकाचे वेगळे असते

पण काही जणांना बालपणच नसते 😦

बालवयातच ते मोठे होतात

बालपणातल्या आनंदाला पारखे होतात

मोठेपणी नातवंडांच्यात बालपण शोधतात

पण स्वत;च्या बालपणाला पारखेच राहतात.

स्वत:ची  उगाच समजूत घालत बसतात.

नित्य नवीन वस्तूंचा भूल भुलैया फिरत असतो.

बालमनाला भुरळ घालत असतो.

मोठ्या माणसाला हि बालमन असते.
पण परिस्थितीचे – समाजाचे  मनावर दडपण आणते.

मग दुधाची तहान ताकावर भागवावी लागते.
मोबाईलचे कव्हर बदलून हौस भागवावी लागते.

नित्य नवीन गोष्ठीसाठी मन घायाळ असते.
उपयुक्ततेचे भूत मानेवर असते.

आयुष्याच्या संग्रामात बालमन हरवलेले असते.
परत बालपण मिळण्यासाठी पुनंर्जन्माचीच आशा असते.

बालपण हे बालपण असते

असले तरी प्रत्येकाचे वेगळे असते

पण काही जणांना बालपणच नसते 😦

सुधीर वैद्य

१४-११-२०१७

Advertisements

Archives

July 2019
M T W T F S S
« Jun    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements