Posts Tagged 'inventions'

१५९) चाहूल उद्याची / लेखक सुबोध जावडेकर

159) 01

१५९) चाहूल उद्याची / लेखक सुबोध जावडेकर / मॅजेस्टिक प्रकाशन / प्रथम आवृत्ती एप्रिल २०१८ / रुपये २५० / पृष्ठे २३८ / विज्ञान कथा संग्रह 

दोन शब्द लेखकाबद्दल:

पुस्तकात लेखकाचे मनोगत तसेच प्रस्तावना नाही. विज्ञान कथा मला आवडतात. त्यामुळे पुस्तक वाचायचे होतेच. गूगल search मध्ये लेखकाची माहिती शोधली. विकिपीडिया मध्ये खालील माहिती मिळाली.

सुबोध प्रभाकर जावडेकर (इ.स. १९४८:इस्लामपूर, महाराष्ट्र – ) हे मराठी भाषेत लिहिणारे एक विज्ञान कथा लेखक आहेत.

जावडेकरांची आईवडील शिक्षक होते. त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे जावडेकरांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातल्या  इस्लामपूर येथे आणि त्यानंतरचे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीला झाले.

ते चिकुर्डे गावातून मॅट्रिक झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटर झाल्यावर त्यांनी मुंबई आयआयटी मधून १९७१ साली रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यांनतर जावडेकरांनी जेकब्स या अमेरिकन कंपनीत नोकरी केली.

जावडेकरांनी पहिली विज्ञानकथा १९८२ साली लिहिली. या रचनेस मराठी विज्ञान परिषदेतर्फे (मविप) दर वर्षी भरत असलेल्या विज्ञान रंजन कथा स्पर्धेमध्ये दुसरे बक्षिस मिळाले.सुबोध जावडेकरांची २०१२ सालापर्यंत १६ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

गुगली ह्या पहिल्याच कथा संग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला.

दोन शब्द पुस्तकाबद्दल:

ह्या कथा संग्रहात ११ कथा आहेत. ह्या सर्व कथा ह्यापूर्वी दिवाळी अंक किंवा इतर मासिकात प्रसिद्ध झालेल्या आहेत.

कथा संग्रहातील सर्वच कथा ह्या विज्ञान कथा नसून, काही कथा कॉर्पोरेट जगातील सुद्धा आहेत.

बरेच वेळा विद्यान कथा म्हणजे बुद्धी चातुर्याने केलेला कल्पना विलास असतो. परंतु हे पुस्तक ह्या गृहीतकाला  छेद देते. ह्या कथेतील विज्ञानाचे सूत्र हे सत्यांशावर आधारित आहे असे वाटते.

कथा सर्वांच्या परिचयात असणाऱ्या पार्श्वभूमीत  म्हणजे घरी, ऑफिस येथे सुरु होते. संवादाच्या माध्यमातून कथा उलगडत जाते. त्यामुळे कथानक डोळ्यासमोर घडत आहे असा भास होतो. हळूहळू कथा विज्ञानाकडे झुकू लागते. आपण कथेत रमत जातो, तोच कथेत रहस्यमय वळण येते आणि काही वेळा कथेचा  शेवट भयकथेकडे झुकतो. फार कमी वेळा अशी मांडणी आढळते.

महत्वाचे म्हणजे ह्या विज्ञानामुळे समजा असे घडले तर काय प्रसंग ओढवेल हि शंका / भीती  लेखक  आपल्या मनात पेरतो. आपण सुद्धा ह्या गोष्टीवर विचार करू लागतो. माझ्या मते हेच पुस्तकाचे यश आहे.

असे पुस्तक प्रसिद्ध केल्या बद्दल प्रकाशकाचे आभार. मुखपृष्ठ समर्पक आहे. पुस्तकाचा फॉन्ट मोठा आहे. एक वाचनीय पुस्तक असे  वर्णन करता येईल.

सुधीर वैद्य

२१-०६-२०२०


Archives

May 2024
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.