१८) The Second Sex / द सेकंड सेक्स Simone De Beauvoir /मराठी अनुवाद – करुणा गोखले

Image

१८) The Second Sex / द सेकंड सेक्स

Simone De Beauvoir /मराठी अनुवाद – करुणा गोखले /पद्मगंधा प्रकाशन /०१-०५-२०१० /Rs ४५०/- पृष्ठे ५५९/

नुकतेच  हे  पुस्तक वाचून संपवले. पुस्तक खूप मोठे आहे त्यामुळे बरेच दिवस लागले.  पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

दोन शब्द लेखिकेबद्दल:

स्त्रियांवर ग्रंथ लिहावा हे  सिमोनच्या आयुष्याचे ध्येय नव्हते. द सेकंड सेक्स  हे काही तिचे एकमेव पुस्तक नव्हे. द सेकंड सेक्स हे पुस्तक १९४९ साली प्रसिद्ध झाले. त्या आधी तिने लिहीलेल्या ४ कादंबर्यांमुळे ती प्रतिथयश लेखिका म्हणून मान्यता पावलेली होती. आज स्त्री विषयक ग्रंथामध्ये  द सेकंड सेक्स ला जरी अग्रक्रम  असला व सिमोनला स्त्री मुक्ती चळवळीची अग्रणी मानले जात असले, तरी हे एक पुस्तक सोडल्यास इतर साहित्यात तिने उघडपणे स्त्रीवादी भूमिका घेतलेली नाही.

सर्व सामान्य स्त्रीपेक्षा सिमोन फार वेगळे आयुष्य जगली.
समाजाच्या  टीकेकडे दुर्लक्ष करून स्वत: च्या बुद्धीला जे पटेल ते तिने केले. ती प्रवाहा बरोबर वाहत गेली नाही. एका मुलाखतीत तिने सांगितले कि ती स्त्रियांच्या सुखासाठी लढत नसून त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.

हा ग्रंथ लिहिणारी सिमोन स्वत: मात्र रूढार्थाने स्त्रीचे जीवन न जगता खूप प्रमाणात पुरुषाचे जीवन जगली. तिने विवाह केला नाही.

आर्थिक स्वावलंबन, स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे धाडस, प्रयोगशीलता,  नेतृत्व क्षमता इत्यादी गुणांचे सिमोनला कौतुक होते व हे गुण स्त्रियांमध्ये   नसतात म्हणून तिने स्त्रीयांना दोषहि दिला आहे. हे गुण नसण्याची कारणे हि तिने विषद केली आहेत. पुस्तकात  पुरुषांचे स्वार्थी, हीन वृतीचा प्राणी असे वर्णन केल्यामुळे पुरुषांची पण ह्या पुस्तकाबद्दल तक्रार आहे.

आता थोडे पुस्तकाबद्दल:

हे पुस्तक १९४६ ते १९४८ ह्या कालखंडात लिहिले आहे व १९४९ साली प्रसिद्ध झाले. स्त्री वादावरचा हा ग्रंथ आहे. लेखिकेने माणसातील नर- मादी ह्या दोन वर्गांचा शारीरिक , मानसिक, राजकीय व सांस्कृतिक  अंगांनी उहापोह केला आहे. हा ग्रंथ जगभर वेगवेगळ्या कारणांनी गाजला.

ह्या ग्रंथातील निरीक्षणे विदेशातच नाहीत  तर आपल्या संस्कृतीतहि दिसतात. ग्रंथ जुना असला तरी आजहि ह्या निरीक्षणांत आमुलार्ग बदल झालेला दिसत नाही. स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते हे ह्या ग्रंथाचे  सूत्र आहे व लेखिकेने उत्तम  उदाहरणे देऊन ते पटवून हि दिले आहे.

लेखिकेने स्त्रीच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आढावा घेतला आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात (बालपण, नवतरुणी, पौगंडावस्था, लैंगिक जीवनाची सुरवात) स्त्रीत होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल आणि तिच्यावर केले जाणारे संस्कार यांचा  सुरेख मागोवा घेतला आहे.

तसेच स्त्रीचा विविध भूमिकांमधील वावर  (विवाहित स्त्री, माता, सामाजिक जीवन, वेश्या – गणिका, प्रोढा – वृद्धा, परिस्थिती आणि व्यकीमत्व )         नेमकेपणाने शब्द बद्ध केला आहे.

पुस्तक वाचताना लेखिकेने  केलेली निरीक्षणे आपल्या अंगावर येतात. खरेतर  बरीचशी निरीक्षणे आपल्या परिचयाची असतात व त्यामुळे आपण पुस्तकात गुंतून जातो.  पुस्तकातील निरीक्षणांवर जर आपण विचार केला, भोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन केले, आपल्या आयुष्यात डोकावून बघितले तर आपल्याला खूप गोष्टी आपल्या घरापासूनच सुधारता येतील.

स्त्रियांच्या संदर्भात वाचनात आलेले एक वाक्य देण्याचा मोह मी टाळू शकत नाही. ह्या एका वाक्यात स्त्री चे वर्णन केले आहे.

A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she’s happy and laughs when she’s afraid. Her love is unconditional!! There’s only 1 thing wrong with her, she sometimes forgets what she is worth…..

आजच्या स्त्रियांची खरेतर हीच शोकांतिका आहे. लग्न हे बरेच वेळा आयुष्याचे ध्येय बनते – लादले जाते. चांगेल दिसणे, शिकणे, नोकरी  करणे, स्वभावाला  मुरड  घालणे, गृह कृत्य दक्ष होणे हे केवळ लग्न होऊन सासरी जाणे ह्यासाठीची गुंतवणूक असते.  हे सर्व करताना स्त्री स्वत:चे स्व विसरत असते किवा  दुसऱ्या गोष्टीत शोधत राहते. सासर हेच तिचे घर हे लहानपणापासून तिच्या मनावर ठसविले जाते. सासरी गेली कि ती माहेरला पारखी होते. (कौतुकासाठी माहेर असते पण मुलीच्या संसारात समस्या आली तर मात्र तिला माहेरचा आधार मिळेल याची खात्री नसते.) कित्येक वेळा स्त्रीच स्त्रीची शत्रू असते – बनते. अशावेळी जर पुरुषाने स्त्रीला पाठींबा दिला तर तिचे आयुष्य सुखकारक होईल.

पुस्तकात जीवनातील बऱ्याच Anomalies of Human Behaviour  वर भाष्य केले आहे.

सिमोनच्या निरीक्षणशक्तीची ताकद एवढी प्रचंड आहे कि हे पुस्तक वाचल्यानंतर मग ती स्त्री असो किवा पुरुष, एका निराळ्या व  चांगल्या नजरेने स्वत:कडे आणि भिन्नलिंगी व्यक्ती कडे बघू लागते.

जगभर गाजलेला हा ग्रंथ मराठी उपलब्ध केल्याबद्दल पद्मगंधा प्रकाशनाचे आभार. करुणा गोखलेनी पुस्तकाचा अनुवाद छानच केला आहे.

मित्रानो, वेळात वेळ काढून हा ग्रंथ नक्की वाचा. तुमचा वेळ फुकट जाणार नाही ह्याची खात्री मी देतो. पण ग्रंथ खुल्यामनाने वाचणे आवश्यक आहे.

सुधीर वैद्य
२७-१२-२०११  

प्रकाशक :
अरुण जाखडे
पद्मगंधा प्रकाशन
३६/११, धन्वंतरी सोसायटी,
पांडुरंग colony , Erandavan ,
पुणे ४११०३८
Tel ०२०-२५४४२४५५

3 Responses to “१८) The Second Sex / द सेकंड सेक्स Simone De Beauvoir /मराठी अनुवाद – करुणा गोखले”


  1. 1 Govind rahate March 6, 2013 at 7:02 am

    He pustak mi nakki vachnar.


Leave a comment




Archives

April 2012
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.