Posts Tagged 'Puja'

६१४) वारी 

६१४) वारी 

आषाढ महिन्यात वातावरण वारीमय झाले होते,  असे म्हटले तर वावगे होणार नाही. ह्यावर्षी विक्रमी संख्येने (अंदाजे १२ लाख) भाविकांनी  विठ्ठलाचे दर्शन घेतले.  सर्व वारकऱ्यांना आणि त्यांची सेवा करण्यासाठी राबणाऱ्या सरकारी यंत्रणेला माझा नमस्कार. मित्रांनॊ, विठ्ठलाची वारी हा मात्र ह्या लेखाचा विषय नाही.

आषाढी महिन्यात विठ्ठलाची वारी असते. परंतु ‘ वारी ‘ हा शब्द व्यवहारात अनेक अर्थाने वापरला जातो.

एका आरतीत वारी वारी जन्मा मरणाचे वारी, वारी पडले आता संकट निवारी असे शब्द आहेत.

एखादा मुलगा परीक्षेत वारंवार नापास होत असेल तर साहजिकपणे लोक विचारात कि काय ह्यावर्षी परत एकदा वारी का?

कोणाचे पोट  बिघडले असेल तर मग वारकरी का ? अश्या प्रकारे त्याच्या तब्बेतीची चौकशी केली जाते.

एखादया पाहुण्याला  विचारले जाते कि आता परत कधी वारी? (म्हणजे आता परत कधी येणार? )

नोकरीसाठी मुलाखतीसाठी भटकंती करावी लागत असेल तर, आज कोठे वारी? अशी विचारणा होते.

तरुण मुलगा किंवा मुलगी फिरायला निघाले असतील तर काय कोठपर्यंत वारी? (म्हणजे कोठे जाताय / कुठपर्यंत जाताय ?)

एकेका शब्दाची गंमत  असते. अनेक अर्थाने तो वापरला जातो. मराठीत हि गंमत जास्तच असते. काही वेळा शब्दाचा उच्चार सुद्धा वेग वेगळे अर्थ ध्वनीत करतो. हीच आहे मराठीची ताकद.

सुधीर वैद्य

०४-०८-२०१९

Vitthal

Advertisements

Archives

September 2019
M T W T F S S
« Aug    
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements