Posts Tagged 'function'

६०९) आज माझ्या नातवाचा (आयुष) १० वा वाढदिवस.

६०९) आज माझ्या नातवाचा (आयुष) १० वा वाढदिवस.

मित्रानो, सुप्रभात,

आज माझ्या नातवाचा (आयुष) १० वा वाढदिवस. (जन्म १०-०६-२००९)     तो तुम्हाला नमस्कार करून आशीर्वाद मागत आहे. ह्या वर्षापासून तो पाचवीच्या वर्गात असेल.

त्याच्या पहिल्या वाढदिवसाला (१०-०६-२०१०) व दुसऱ्या वाढदिवसाला( १०-०६-२०११) व पाचव्या वाढदिवसाला (१०-०६-२०१४) मी त्याला पत्र लिहिले होते. तो जेव्हा मोठा होईल तेव्हा हि पत्रे म्हणजे त्याच्यासाठी आठवणींचा खजिना असेल, ज्याचे मुल्य पैशात करता येणार नाही.

मला वाटत नाही की एक-दोन वर्षाच्या नातवाला कोणत्याही आजोबाने पत्र लिहिले असेल. ह्या पत्रात मी त्याच्यासाठी आत्मचरित्र लिहून ठेवीन असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्याच्या दुसऱ्या वाढदिवसाला (१०-०६-२०११) मी ४०० पानाचे आत्मचरित्र लिहून पूर्ण केले. मोठा झाल्यावर त्याला जर आजोबाला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असेल, तर ती सोय मीच करून ठेवली आहे.

आयुष अभ्यासात हुशार आहेच पण त्या बरोबरीने खेळात सुद्धा त्याला गती आहे. गेली ४ वर्षे तो नियमितपणे फुटबॉल खेळत आहे. त्याच्या शाळेच्या अंडर १० संघाचा तो कर्णधार होता. तो ड्रम सुद्धा सुंदर वाजवतो. तो बुद्धिबळ सुद्धा चांगले खेळतो.

त्याची वडिलांबरोबर खूप दोस्ती आहे. त्याचे पपा हे त्याचे फुटबॉल खेळातील पहिले गुरु आहेत. पाच वर्षापर्यंत तो मल्लखांबावर सुंदर कसरती करत असे.

आयुष खूप मोठा हो, पण मोठा झाल्यानंतर समाजाचे ऋण फेडायला विसरू नकोस. माझे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत.

शुभदिन.

सुधीर वैद्य

१०-०६-२०१९

Advertisements

Archives

September 2019
M T W T F S S
« Aug    
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements