Posts Tagged 'City'

४३६) निसर्गा पासून आपण काय शिकले पाहिजे?

P1140123

४३६) निसर्गा पासून आपण काय शिकले पाहिजे? 

निसर्ग म्हणजे निसर्ग असतो…

तुमचा आमचा सेमच असतो. 🙂

माणूस निसर्गात शहर वसवतो,

तेथील रहिवाशांची आणि निसर्गाची लावून  वाट.

शहरात  मात्र निसर्ग शोधावा लागतो, बाल्कनीतील तुळस आणि काही फुलझाडांच्या एक -दोन कुंड्यांत. 😦

निसर्ग आपला मित्र आहे. आपल्या आयुष्याच्या वाटचालीत निसर्गाचा खूप मोठा वाटा  आहे. निसर्ग आपल्या आजूबाजूला सुद्धा असतो पण त्याकडे आपण दुर्लक्षच करतो. वर्षातून एकदा सुटी  घेऊन निसर्गरम्य ठिकाणी जातो पण तेथे जाऊन आपले शौक पुरे करण्याचा अट्टाहास असतो. 😦

आपल्या अत्याचाराला कंटाळून निसर्ग आपल्यावर सूड उगवतो. मग आपण आपल्या सुपीक डोक्याने निसर्गावर आणखी अत्याचार करतो.

मनाची कवडे उघडी ठेवून निसर्गाला भेट द्या, त्याच्याशी हितगुज करा. मग बघा कि मन कसे पिसासारखे  हलके होते. ताजेतवाने व्हा आणि आपल्या ध्येय पूर्तीसाठी प्रयत्न करा. शक्य असेल तर वरचे वर एक – दोन दिवस कामातून सवड काढा. तेही नाही जमले तर आपल्या परिसरातील निसर्ग शोधण्याचा प्रयत्न करा करा. आपल्या शहरातून सुद्धा सूर्यास्त दिसतो. आपल्या परिसरात सुद्धा झाडे असतात, पानगळ होते, नवीन पालवी फुटते त्याचा आनंद घ्या.

निसर्ग डोळ्यात साठवा, कॅमेऱ्यात बंदिस्त करा. डोळ्यातील निसर्ग मनात रुजवा म्हणजे तो आपल्या चेहऱ्यावर पसरेल आणि आपल्या सर्व ताण  – समस्येवर शीतल छाया धरेल. बघ प्रयत्न करून.

निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. पण आपल्याला पुस्तकी शिक्षणाचा नको इतका अभिमान असतो आणि ह्या फुकट मौल्यवान मिळणाऱ्या शिक्षणाला आपण मुकतो.

आयुष्यातील समस्या – ताण  – तणाव मी निसर्गाच्या साथीने सोडवले.  सूर्यास्त बघणे हा माझा खूप जुना छंद आहे. निसर्ग हा माझा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा मित्र आहे. त्याचे बोट धरून मी आजपर्यंत वाटचाल केली आहे. माझ्या वडिलांना निसर्गाची खूप आवड होती. कदाचित त्यामुळे माझ्यात सुद्धा निसर्गाबद्दल एक हळुवार कोपरा तयार झाला असेल. वडिलांचे छत्र लहानपणी हरवल्यानंतर निसर्गाचाच मला आधार होता. आजही मी शहरात निसर्ग शोधत  असतो. माझ्या कचेरीच्या cabin मध्ये सुद्धा मी त्याला लहान प्रमाणात जपला होता. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो.

Life is like an ocean of sand. It will always slip through your fingers and always slip away from you. There will, however be a small part that stays in the palm of your hand. Be thankful for that…

आपले आयुष्य म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील वाळू सारखे आहे. वाळूसारखे आपले  आयुष्य क्षणोक्षणी निसटत असते. परंतु थोडी तरी वाळू हाताला चिकटते. तसेच आपल्याला आयुष्यात जे जे काही मिळाले आहे, त्याच्यावर प्रेम करा व त्याबद्दल देवाचे आभार माना.

”Waves are inspiring, Not because they Rise & Fall, But because they Never Fail to Rise Again”

लाटा खूप सकारात्मक दृष्टीकोन शिकवतात. लाटा  केवळ उंच उडतात आणि फुटतात म्हणून नाही, तर त्या परत परत उंच उडण्याचा प्रयत्न सोडत नाहीत.

Lovely thing to learn from Water! “Adjust yourself in every situation”. But most importantly, always find out your “own way to flow” &take everything within it which come with it.

पाण्याप्रमाणे आपल्याला आयुष्यात तडजोड करता आली पाहिजे. पाणी कोठे थांबून राहत नाही. पाणी अडले असता कोठून तरी मार्ग काढ्याचा प्रयत्न करत असते. संकटे आली -समस्या आल्या तरी आपण मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे.

Sun does not give heat to itself. Flower don’t spread fragrance for  themselves. Living for others is d way of LIFE.

सूर्य आहे म्हणून जग आहे. सूर्य  सर्व सृष्टी साठी प्रकाश देतो. फुले आपल्याला  सुगंघ देतात. दुसऱ्यांसाठी जगण्यातील हि गंमत आपल्याला कळली  पाहिजे.

In the confrontation between the Stream & the Rock, The Stream always wins …. Not through Strength, but through Persistence…..With that Determination & Cheer

Good relationships are like Trees. They demand attention & care in the beginning but once they blossom, they provide u shade in all situations of life.

चांगले नातेसंबंध एखाद्या झाडाप्रमाणे असतात. नातेसंबंध नवीन निर्माण होताना पुरेशी काळजी घेतली तर हेच नातेसंबंध आपल्याला आयुष्यभर साथ देतात.

पाऊस म्हणजे नुसते पाण्याचे थेंब नाहीत. हे थेंब म्हणजे आकाशाचे पृथ्वीवर असलेले प्रेम आहे. आकाश आणि पृथ्वी एकमेकाला भेटू शकत नाहीत. म्हणून आकाश हे प्रेम पावसाच्या रुपात व्यक्त करते.

वादळात मोठी झाडे उन्मळून पडतात कारण ती परिस्थिनुसार adjust करू शकत नाहीत. पण लहान झाडे, रोपे मात्र सही सलामत राहतात. आपल्यालाही कठीण प्रसंगात नमते घेता आले पाहिजे म्हणजे आपला टिकाव लागू शकतो. बघा विचार करून.

निसर्गाची प्रत्येक ऋतूतील विविध रूपे आपल्याला अचंबित करतात. परंतु एक-दोन महिन्यानंतर पाऊस  जेव्हा थोडी विश्रांती घेतो, तेव्हा निसर्गाचे रूप सर्वानांच खूप आवडते. नजर जाईल तेथे हिरवळ उगवलेली असते. भाताची लहान रोपे

वाऱ्यावर डोलत असतात. आकाशात पावसाच्या काळ्या ढगांचा आणि रवीचा

लपंडावाचा खेळ रंगत असतो.कधी जोराचा वारा येतो  आणि सर्व ढगांना पळवून

लावतो. कीटक वारुळे तयार करतात. नदी, नाले, ओढे, तलाव  सौदर्यात अधिकच भर

घालतात.

जेव्हा मनातील निसर्ग आणि सृष्टीतील निसर्ग ह्यांची गळाभेट होते, तो क्षण आणि ती वेळ शब्दात वर्णन करता येत नाही. ती अनुभूती परत जगण्याचा

प्रयत्न करायचा.

Album Link: https://picasaweb.google.com/118438918093032772576/NatureLifeFebruary262015?authuser=0&feat=directlink

शांत चित्ताने फोटो बघा आणि फ्रेश व्हा. कशी वाटली idea ची कल्पना.

सुधीर वैद्य

१८-१०-२०१५

Advertisements

Archives

December 2018
M T W T F S S
« Sep    
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements