Posts Tagged 'batsman'

५६०) नशीबाची खेळपट्टी

560)Photo6160

५६०) नशीबाची खेळपट्टी

आज सकाळी जॉगिंग ट्रॅक वर फिरायला न जाता, सहनिवासातील मैदानावर फिरायला गेलो. मैदानात  पावसाळयात बरेच गवत उगवले होते. नुकतेच सेवकांनी मैदानातील गवत कापण्याचे काम पूर्ण केले. पावसाळ्यात क्रिकेटच्या खेळपट्टीचे

फारसे नुकसान  झाले नाही हे बघून बरे वाटले. मी पीचच्या बाजूने फिरायला सुरवात केली. सहज मनात विचार येत गेले.

प्रत्येक जण स्वत:चे  नशीब घेऊन जन्म घेतो. क्रिकेटची खेळपट्टी आणि नशीब ह्यात खूप साम्य आहे. जशी खेळपट्टी मिळेल तसे खेळाडूला आपल्या अंगभूत स्किलचा वापर करून खेळावे लागते. आपल्या आयुष्यात सुद्धा असेच असते. क्रिकेटच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन जशी batting करावी लागते, त्याचप्रमाणे नशिबाच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊनच आयुष्यात ध्येय ठरवावे लागते.

यश मिळवायचे असेल तर भरपूर प्रयत्न, किमान बुद्धिमत्ता आणि नशिबाची साथ आवश्यक असते. नशिबाचा अंदाज आपल्याला येतो. फक्त गरज असते मिळालेल्या

नशिबाला स्वीकारण्याची. जन्म आपल्या हातात नसतो पण जगावे कसे हे मात्र आपण नक्की ठरवू शकतो. नशिबावर मात करून मिळवलेले यश हे खास असते. तुमचे यश हे तुम्ही कोठे पोचलात ह्यावरून न ठरवता, हि सुरवात आपण कोठून केली ह्यावर मोजले पाहिजे.

तुमच्या यशाची तुलना दुसऱ्याच्या यश्याबरोबर करू नका. मनापासून प्रयत्न करा व संकटांनी विचलित न होता ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. तुमहाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ह्याची मला खात्री आहे. स्वत:शीच तुलना करा व यशाची नवीन शिखरे पादाक्रांत करा. माझ्या शुभेच्छा आहेतच. 🙂

सुधीर वैद्य

२९-१२-२०१७

Advertisements

Archives

April 2018
M T W T F S S
« Feb    
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements