५८९) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी – २१-०८-१९६९

Dada-21082009380-002

५८९) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी – २१-०८-१९६९

स्नेहलने (माझ्या पुतणीने) आजोबांबद्दल फॅमिलीच्या wa ग्रुप वर लेख लिहिला होता.

स्नेहल तुझा लेख खूप खूप आवडला. खूप छान. मी रात्रीच २.३० वाजता एका झोपेवर तुझा लेख वाचला आणि त्यानंतर सकाळपर्यंत मी फक्त आणि फक्त दादांच्या आठवणीत रमलो होतो. समजायला लागल्यानंतरची बालपणीची १०-१२ वर्षे परत एकदा मस्त जगलो.

तुझे कौतुक एव्हड्यासाठीच कि हल्लींच्या जमान्यात मी आणि माझे, ह्या पलीकडे विचार न करणारी पिढी, अगदी स्वत:च्या आई – वडिलांच्या सुख – दु:खाचे सुद्धा ज्यांना देणे घेणे नसते, अश्यावेळी तुला आजोबांबद्दल लिहावेसे वाटले हे बघून बरे वाटले.

माझे दादा खऱ्या अर्थाने बाप माणूस होते. (बाप म्हणजे  फादर आणि बाप म्हणजे ग्रेट.) ते माझे हिरो होते, आहेत आणि मरेपर्यंत राहतील.

दादा फणसासारखे होते. प्रथम दर्शनी काटे दिसायचे, काटे टोचायचे सुद्धा, परंतु तेव्हडेच प्रेमळ आणि कर्तव्य दक्ष. संकटाचा सामना व्यावहारिक पातळीवर कसा करावा ह्याचे प्रात्यक्षिक स्वत:च्या जगण्यातून त्यानी दाखविले. त्यांचे बोलणे थोडे फटकळ वाटेल  असे होते कारण ते बोलणे ‘श्रेय ‘ ह्या वर्गातील होते. समोरच्या साठी जे श्रेयस्कर (त्याच्या फायद्याचे ) असेल ते बोलण्यास त्यांना  संकोच वाटत नसे. हल्लींच्या जमान्यात तोंडावर गोड  गोड बोलणे (प्रेय – प्रिय ) आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे.

आयुष्याच्या एक टप्प्यावर जेव्हा आपला मृत्यू अटळ आहे हे समजल्यानंतर त्यांनी Life style मध्ये बदल केला, परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता.

त्यांनी माणसाला माणसासारखे वागविले. उच्च नीच, गरीब – श्रीमंत असले भेद कधी मानले नाहीत. त्यामुळेच त्यांनी पैसा  जेव्हडा मिळवला नसेल, तेव्हडी माणसे जोडली.

आम्हा मुलांचे ते मित्र होते परंतु कितीही झाले तरी मी तुमचा बाप आहे, हि लक्ष्मण रेषा त्यांनी ओलांडली नाही. मला परत हल्लींच्या आई – वडिलांबद्दल लिहण्याचा मोह आवरता  येत नाहीये. हल्ली बाप म्हणजे मुलाचा एव्हडा मित्र होतो, कि कालांतराने तो मुलगा  बाप म्हणजे आपला लहान भाऊ आहे असे बापाशी वागायला आणि बोलायला लागतो.

दादांसाठी  काम हे फक्त काम होते. मग ते कोणतेही काम असो. (ऑफिसचे, घरातील, बाजार रहाट, शेतातील) प्रत्येक कामात ते झोकून देत. ते काम चांगलेच झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. ते खऱ्या अर्थाने कर्म योगी होते.

त्यांच्या बद्दल काय लिहू  आणि किती लिहू अशी माझी अवस्था आहे. असो.

सर्व मुलांचे  यश आणि फुलणारा संसार बघायला तुम्ही हवे होतात. खरेतर आम्ही कोणीच तुम्हाला  विसरू शकत नाही I really miss you दादा.

स्नेहल परत एकदा तुझे अभिनंदन करतो. माझी ह्या कट्ट्यावरील प्रत्येकाला विनंती आहे कि त्यांनी दादांबद्दलच्या आठवणींना उजाळा द्यावा.

सुधीर वैद्य

२१-०८-२०१८

Advertisements

0 Responses to “५८९) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी – २१-०८-१९६९”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

August 2018
M T W T F S S
« Jul   Sep »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: