५८८) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी (मृत्यू २१-०८-१९६९)

Dada-21082009380-002

 

५८८) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी (मृत्यू २१०८१९६९)

माझ्या वडिलांना निवृत्तीपूर्वी २ महिने (वयाच्या ५८ व्या वर्षी) मृत्यूने गाठले होते. त्यावेळी मी १८ वर्षांचा होतो. (१९६९) मला वडिलांचा सहवास फार कमी मिळाला. मधुमेहाने बरीच वर्षे आजारी असल्यामुळे त्यांच्या आयुष्याची दोरी कमजोर होती. वडील फार थोड्या वर्षांचे सोबती आहेत हे लहानपणी कळल्यानंतर त्यांच्या मृत्युच्या छायेत मी मोठा झालो. मृत्युची भीती त्यांच्या डोळ्यात दिसत असे. मुलाबाळांची काळजी सुद्धा डोकावत असे.

पण एवढ्या कमी वर्षात त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले, ती शिदोरी मला आजपर्यंत पुरली आहे.

आज सकाळपासून माझे मन त्यांच्या आठवणीत चिंब भिजते आहे. मन सतत भूतकाळात डोकावत आहे. माझे बालपण उलगडले जात आहे. त्यावेळी मी अंदाजे ६ वर्षांचा असेन. (१९५७) आम्ही सर्व भावंडे पुण्याला काकांकडे राहत होतो. कारण माझ्या दादांना TB झाला होता आणि त्यामुळे ते तळेगावच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. (ह्या हॉस्पिटलला ऑगस्ट १९७५ मध्ये मी १००० रुपये donation पाठविले. माझ्या नोकरीचा तो दुसरा महिना होता आणि माझा पगार १२५० रुपये होता.

एक दिवस मोठ्या माणसांच्या दबक्या आवाजातील बोलणे मला ऐकू आले . माझे दादा जरी बरे झाले तरी फार वर्षे जगणार नाहीत. हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या चेहऱ्यावरील हसू मावळले. मला बालपण होते का? 😦

त्यामुळे असेल कदाचित, पण दर रविवारी मी चौपाटीवर सूर्यास्त बघायला जात असे. अगदी लहान असताना वडिलांबरोबर, मग भावाबरोबर आणि नाहीतर एकटा. माझे व सूर्यास्ताचे लहानपणापासून फारच जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

मी एकलकोंडा झालो, मला नेमके काय होते आहे, हे मी सांगू शकत नव्हतो आणि लोकांना ते समजत नव्हते. मला अंधार आवडू लागला. मी अंधाऱ्या जागी लपून बसू लागलो. मला आजही अंधार खूप आवडतो. अंधारात मी स्वत:शी संवाद साधतो, माझा भूतकाळ आठवतो, दादांबरोबराचे सोनेरी दिवस मनात गोळा करतो, मला ज्यांनी लहानपणी त्रास दिला त्यांचे स्मरण करतो (ज्यांच्या मुळे माझी जगण्याची उर्मी आजपर्यंत कायम आहे ) कालांतराने दादा बरे झाले.

मी त्यांची खूप सेवा केली. वयाच्या ७ व्या वर्षापासून मी त्यांना इन्सुलिन चे injection देत असे. ओषधांच्या सहवासात मी रमू लागलो. मोठेपणी डॉ होण्याची स्वप्ने बघू लागलो. अर्थात आर्थिक परिस्थिती आणि वडिलांचे आजारपण बघून माझे स्वप्न हवेत विरले. शेवटी त्यांच्या वयाच्या ५८ व्या वर्षी १९६९ साली ते देवाघरी गेले. (हे लिहिताना माझे डोळे कधी पाणावले हे मला कळलेच नाही.) आजही ४९ वर्षांनंतर त्यांची आठवण माझ्या मनात ताजी आहे. असो .

वैद्यकीय माहिती मिळविण्याची माझी हौस मोठेपणी पूर्ण केली. १९९७ साली पर्यायी वैद्यक शाखेचा अभ्यास एका प्रथित यश डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली केला. पर्यायी वैद्यकीय शास्त्राची पुस्तके वाचली. नोटस काढल्या. अनेक लेख लिहिले. (Refer my website) १९९८ पासून (माझा CA चा व्यवसाय सांभाळून) नियमितपणे सोसायटीतील लोकांचे BP & Pathological Reports तपासू लागलो. आजारी माणसाला वैद्यकीय सल्ला व धीर देऊ लागलो. म्हाताऱ्या लोकांसाठी वेळ काढू लागलो. बरेच ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे येऊन मन मोकळे करतात. नाहीतरी त्यांचे ऐकायला घराच्या मंडळीना वेळ कोठे असतो? हे व्रत आजतागायत चालू आहे.

आजही आयुष्यात अडचणी आल्या की ध्यान करून मी वडिलांची आठवण करतो आणि मी जेव्हा डोळे उघडतो तेव्हा मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असते. त्यांच्या death anniversary च्या दिवशी मी ध्यान करून त्यांच्या सहवासातील दिवस आठवतो. मनाची ताकद एवढी मोठी आहे की अवघ्या १५ मिनिटात मी बालपणातल्या १०-१२ वर्षांना स्पर्श करून येतो. आज त्यांच्या मृत्यूला ४९ वर्षे झाली तरी त्यांची आठवण माझ्या मनाच्या कोपऱ्यात लपली आहे.

माझे संकेत स्थळ त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे. ‘माझे वडील’ हा लेख माझ्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

मी त्यांना ३१-१२-२००९ व २१-०८-२०१८ रोजी लिहिलेले पत्रही माझ्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

डॉ. सलील कुलकर्णींची जेव्हा दोन गाणी कानावर पडतात तेव्हा मला प्रकर्षाने वडिलांची आठवण येते. (दूर देशी गेला बाबा आणि दमलेल्या बाबाची कहाणी)
सर्व भावांचे यश आणि फुलणारा संसार बघायला तुम्ही हवे होतात. खरेतर आम्ही कोणीच त्यांना विसरलोच नाहीये. I really miss my father. 😦

दादा तुम्ही मला ४९ वर्षांपूर्वी सोडून गेलात तेव्हापासून माझ्यासाठी तरी रोजच पितृदिन असतो. असा एकही दिवस जात नाही जेव्हा मला तुमची आठवण येत नाही. तुमची उणीव मला नेहमीच भासते. परंतु तुम्ही दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर मी आजपर्यंतची मार्गक्रमणा केली आहे. परंतु तुम्हाला भेटायची मला ओढ लागली आहे. मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत. तुमच्या बरोबर गरमगरम कॉफी प्यायची आहे. तुमच्या सहवासातील जुन्या दिवसांना उजाळा द्यायचा आहे. असो. काळजी घ्या.

सुधीर वैद्य

२१०८२०१८

Advertisements

0 Responses to “५८८) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी (मृत्यू २१-०८-१९६९)”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

August 2018
M T W T F S S
« Jul   Sep »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: