५८६) स्पंदने आणि कवडसे – नागपंचमी – १५-०८-२०१८

39186591_1987928717894700_672752153848184832_n     39242270_1987928731228032_9192228168134557696_n.jpg

 

586) 1116023_611336032220649_1677556419_o    586) 1150526_611336145553971_1725453170_o

५८६) स्पंदने आणि कवडसे – नागपंचमी – १५-०८-२०१८

नागाचा फणा आणि ईगो:

काही माणसांचा ईगो नागाच्या फण्यासारखा उफाळून येत असतो. ज्याला स्वत:चा ईगो प्रमाणात ठेवता येतो तो यशस्वी होतो.

नागपंचमी:

जगात नाग चावून माणसे फार कमी मरतात ….पण नाग चावलाय ह्या भीतीनेच मरणारी लोकं जास्त आहेत..
~~~~~ आणि माणसाच्या विषारी बोलण्याने मात्र बरीच दुखावली जातात.

नागपंचमीची  शिकवण:

नागपंचमीच्या मुहूर्तावर जर प्रत्येकाने स्वत:च्या मनातील विषाला (विकार, वाईट विचार – आचार ) तिलांजली देण्याचा निर्धार केला तर, आपला समाज खऱ्या अर्थाने सुखी होण्यास मदत होईल.

प्रतिक्रिया:

माझ्या मनात एक विचार येतो कि जर का खरा नाग भक्तांना दर्शन देण्यास मंदिरात अवतरला तर काय होईल ? भाविकांची काय प्रतिक्रिया असेल ?

नागविषयी आणि सापाविषयी थोडेसे:

नाग – साप स्वत:हून हल्ला करत नाही, तर स्वत:चे रक्षण करण्यासाठी फणा काढतो. आपल्या इतकाच तोही घाबरलेला असण्याची शक्यता आहे.

नागाचे मुख्य खाणे म्हणजे उंदीर. पिकाचे रक्षण करून शेतकऱ्यांना तो मदत करतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी त्याची पूजा केली जाते. आपला धर्म सर्व समावेशक आहे. तो सर्व प्राणी – मात्रांवर, निसर्गावर प्रेम करा अशी शिकवण आपल्याला देतो. निदान एक दिवस त्याची आठवण आपल्याला होते यातच समाधान मानायची वेळ आली आहे

नागाबद्दलची शास्त्रीय माहिती उपलब्ध असूनही त्याला दुध पाजले जाते. सापाला – नागाला स्मरणशक्ती नसते तरी तो डूख धरतो अशी सुद्धा समजूत आहे. आज खरेतर नागाची – सापाची शास्त्रीय माहिती शोधून वाचली पाहिजे. पुराणातील माहिती आणि शास्त्रीय माहिती ह्याची सांगड घातली पाहिजे. सर्वच साप विषारी नसतात. आपल्या शहरात snake park असेल तर त्याला भेट दिली पाहिजे. अनेक वर्षांपूर्वी मद्रास आणि पुणे येथील snake park ला माझ्या प्रत्येक ऑफिस ट्रीपच्या वेळेस मी भेट देत असे, ह्याची आठवण झाली.

आठवणीतील  नागपंचमी:

आजही मला बालपणी आईने पाटावर चंदनाने काढलेली नागीण आणि तिची पिल्ले ह्यांचे चित्र आठवते. आई त्या चित्राची मनोभावे पूजा करायची.

सर्वाना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

सुधीर वैद्य 

१५०८२०१८

Advertisements

0 Responses to “५८६) स्पंदने आणि कवडसे – नागपंचमी – १५-०८-२०१८”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

August 2018
M T W T F S S
« Jul   Sep »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: