५८०) आई-वडिलांची शाळा …….

580) Father - son - beach

580) Father - son

५८०) आईवडिलांची शाळा …….

साधारणपणे प्रत्येक आई – वडिलांसाठी त्यांचा  मुलगा किंवा मुलगी हा त्यांच्या काळजाचा तुकडा असतो / असते. परिस्थितीनुसार त्याना मोठे करण्याचा- सोई सुविधा – सवलती देण्याचा प्रयत्न करतात. चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.

एक हौशी कौटुंबिक सल्लागार म्हणून मला असे आढळले आहे कि हल्लींच्या काळी खालील यादीमधील अनेक गोष्टी केल्या जातात, परंतु ती गोष्ट करताना वेळ, कारण आणि प्रमाण ह्याची गल्लत केली जाते आणि कालांतराने परिस्थिती बिघडते.

लहानपणापासून मुलाचा मित्र होण्याच्या नादात ,कालांतराने त्या मुलाला आपला बाप म्हणजे स्वत:चा लहान भाऊ असे वाटायला लागते आणि जेव्हा पाल्याला काही वेळा बापाकडून विरोध होतो, तेव्हा बरोबरीच्या नात्याने तो बापाशी बोलायला व भांडायला लागतो, हे कौटुंबिक सल्लागार म्हणून माझे निरीक्षण आहे.

ह्याचा परिणाम म्हणजे  तो आई -वडिलांना गृहीत धरायला लागतो. आई -वडिलांची परिस्थिती, त्यांचे प्रश्न – विवंचना, आर्थिक समस्या ह्या गोष्टीत त्याला काहीही इंटरेस्ट नसतो. (खरेतर मला कवडीचाही असे म्हणायचे आहे) आई – वडील म्हणजे मागितलेले सर्व देणारे ATM अशी त्याची धारणा होते.

मग पाल्याच्या  वाढत्या  वयात खटके उडायला लागतात. आई वडिलांनी आजपर्यंत घेतलेल्या श्रमांची त्याला फिकीर वाटत नाही. आजपर्यंत त्याच्यासाठी जीव गहाण टाकून, त्याला मोठे करण्याचा तो परिपाक असतो. अति कडक शिस्त लावायचा प्रत्यत्न केला तरी, मोठेपणी तो शिस्तीत वागेल ह्याची खात्री देता येत नाही.

माझे म्हणणे एव्हडेच आहे कि आपल्या परिस्थितीच्या मर्यादेत राहून त्याचे पालन पोषण करा. आपल्या परिस्थितीची जाणीव त्याला मोठे झाल्यांनतर – समजायला लागल्यानंतर  करून द्या.  हे करण्यात पालकांना कमीपणा वाटता कामा  नये.

खालील यादी वाचा. ह्यापैकी तुम्ही काय काय  आणि किती प्रमाणात करता ह्याचे अवलोकन करा. तुम्हाला योग्य वेळ, कारण आणि प्रमाण ह्याची सांगड घालता येते का? हे तपासा.

तुमचे बालपण आठवा. ह्या वयात तरी तुम्हाला तुमच्या आई – वडिलांचे वागणे पटते का? ह्याचा आढावा घ्या. त्यांच्या चुका तुम्ही करत नाही ना ? त्यांच्या इतके तरी तुम्ही वागता का ह्याचा अभ्यास करा.

आईवडिलांनी योग्य वेळी, योग्य कारणासाठी, योग्य प्रमाणात काय करावे
१) पाल्याचे मित्र व्हावे

२) त्यांच्या आनंदात सहभागी व्हावे

३) त्यांच्या आवड – निवड जपावी

४) चांगल्या शब्दात  त्यांच्या चुका दाखवाव्या

५) लाड करावे

६) शिस्त लावावी

७) कौतुक करावे

८) पाठीवर मायेचा हात फिरवावा

९) छंदाला प्रोत्साहन द्यावे

१०) पौष्टिक चांगले चुंगले खायला द्यावे

११) गुण – अवगुण ओळखावे

१२) दुर्गुणांवर मात करायला शिकवावे

१३) ध्येय ठरवायला मदत करावी

१४) ध्येयाची वेळोवेळी आठवण करून द्यावी

१५) अलिप्तता  शिकवावी

१६) त्यांच्या विजयात सहभागी व्हावे

१७) त्यांच्या पराभवात साथ द्यावी

१८) मोठा झाल्यानंतर त्यांच्या व्यवसायात मदत करावी

१९) मोठा झाल्यानंतर त्यांच्या  शिक्षणावर आणि अनुभवावर विश्वास ठेवावा

२०) प्रेम करावे

२१) कोठे थांबावे ह्याची शिकवण  द्यावी

आपला मुलगा जेव्हा बाप होतो, तेव्हा त्याला वडील होणे म्हणजे काय हे थोडे थोडे समजायला लागते. ……..  एक निरीक्षण

वडील आणि Guardian

वडील हे वडील असतात आणि Guardian हा  Guardian असतो. वडील हेच आपले खऱ्या अर्थाने  Guardian असतील, तर आयुष्य सुखकर जाते. वडिलांनी  Guardian नक्की झाले पाहिजे. परंतु  Guardian ने मात्र कधीही वडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न करू नये. निराशा अनुभवावी लागते. ……..  एक निरीक्षण

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
सुधीर वैद्य

२१०७२०१८

Advertisements

0 Responses to “५८०) आई-वडिलांची शाळा …….”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s




Archives

August 2018
M T W T F S S
« Jul    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: