५७९) कात टाकणे 

579) Snake Kat - 1        579) Snake Kat - 128628417

 

579) snakeskin9

५७९) कात टाकणे 

‘ कात टाकणे ‘ हा शब्द ऐकला कि पहिला विचार येतो तो सापाने टाकलेल्या कातीच्या. अनेक जणांनी सापाची कात फोटोतच बघितली असेल. अनेक वर्षांपूर्वी मला घराच्या परिसरात सापाची कात मिळाली. चांगल्या अवस्थेत होती. आजही एक लिफाफ्यात  ती कात जपून ठेवली आहे व माझ्या ऑफिसच्या  रेकॉर्डच्या जवळ तो लिफाफा ठेवला आहे.

नुकतेच ऑफिस रेकॉर्ड साफ करताना ती कात मी परत एकदा न्याहाळली. अजूनही चांगल्या अवस्थेत आढळली. मनात अनेक  विचार आले.

खरेतर माणूस सुद्धा कात टाकतो असे म्हटले तर आश्चर्य वाटेल. आपल्या त्वचेचा वरील थर थोड्याफार प्रमाणात नियमितपणे विरघळत असतो. दर  १२ वर्षांनी शरीरातील सर्व पेशी मरतात  व नवीन पेशी त्यांची जागा घेतात असे वाचले आहे.

माणसाचे विचार, वर्तणूक वयानुसार – शिक्षणानुसार कात टाकत असते. ह्यासाठी तुम्हाला ‘ कात ‘ ह्या शब्दाकडे व्यापक अर्थाने बघावे लागेल. माणसाचा आर्थिक स्तर सुद्धा कात टाकतो. नातेसंबंध सुद्धा ह्याला अपवाद नाहीत. कालानुरूप माणसाच्या  दृष्टीकोनात फरक पडतो.

थोडक्यात ह्या सर्वाला आपण म्हणतो कि माणूस बदलला. पण हे स्वाभाविकच आहे. बदल हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बदल होत असतो – कधी कळतो तर कधी कळत नाही. बदलाचे स्वागत करावेच लागते. बदल स्वीकारायचा नसेल, तर परिस्थिती बदलावी लागते. ते प्रत्येक वेळेला शक्य नसते. त्यामुळे स्वत:ला कमी त्रास होईल अश्या रीतीने स्वत:लाच बदलावे लागते. असे केले नाही, तर बदल आपल्यावर आक्रमण करतात. बदल स्वीकारला म्हणून समाधानी राहून चालत नाही कारण परत एकदा नवीन बदलला सामोरे जायचे असते.

वर्षामागून वर्षे जातात आणि आपले कात टाकणे असेच चालू राहते.

सुधीर वैद्य

२१०७२०१८

Advertisements

0 Responses to “५७९) कात टाकणे ”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s




Archives

August 2018
M T W T F S S
« Jul   Sep »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: