५७७) कलाकृती का आवडते किंवा  का आवडत नाही?

577) theater-1713816_1280_2

५७७) कलाकृती का आवडते किंवा  का आवडत नाही?

गेली काही वर्षे  मनोरंजन क्षेत्रात धुमाकूळ चालू आहे. वर्षाला साधारणपणे १५० ते २०० सिनेमे  निर्माण होतात. प्रत्येक शुक्रवारी ३ ते ४ सिनेमे एकदम प्रदर्शित होतात. ह्या गोष्टीवरून निर्माते – वितरक – सिनेमा गृहांचे मालक ह्यांच्यात  वाद – विवाद होतात. त्याचप्रमाणे अंदाजे ५० नाटके रंगभूमीवर येतात. टीव्ही  मालिकांची तर गणतीच करायला नको.

सिनेमा – नाटक आवडीने बघणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग असतो. अनेक जण नट  – नट्यांचे followers असतात. कोणाला  सिनेमातील देश – विदेशातील लोकेशन्स बघायला आवडते. काही जणांचा  दिग्दर्शक आवडीचा असतो.

करमणूक म्हणून नाटक – सिनेमा बघितला तर मला अनेक वेळा मनस्ताप होतो. कथाबीज मनाला पटले पाहिजे, असे माझे मत आहे. अभिनय, दिग्दर्शन, लोकेशन वगैरे गोष्टीं चांगल्या असल्या, तरी समाधान होत नाही. पैसे खर्च झाल्याची खंत मनाला जाणवते. नाटक – सिनेमा बघितल्यानंतर वेळ फुकट गेला असे वाटले, तर जास्तच  त्रास होतो.

पुढे मागे हे सर्व सिनेमे टीव्ही वर प्रदर्शित होतात. बरे वाटले तर इतर कामे करताना बघता – ऐकता येतात. वेळ फुकट जात नाही.

कथाबीज चांगले पाहिजे. समस्या दाखविली असेल तर त्याचे निराकरण कसे व्हावे –  कसे केले जावे ह्यावर भाष्य हवे, तरच नाटक – सिनेमा बघायला आनंद होतो.

मला वाटते मी फारच अपेक्षा करत आहे का ? 🙂
सुधीर वैद्य

२१०७२०१८

Advertisements

0 Responses to “५७७) कलाकृती का आवडते किंवा  का आवडत नाही?”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

August 2018
M T W T F S S
« Jul   Sep »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: