५७६) व्यक्तिमत्व विकास

576) 56522025-grandpa-spending-time-with-grandson-portrait-of-senior-man-playing-football-with-his-grandchild-in-p          576) 155294468-612x612

५७६) व्यक्तिमत्व विकास

माणसाचा व्यक्तिमत्व विकास जन्मापासून सुरु असतो. त्यासाठी कोणत्याही सेमिनार – क्लासची गरज नसते. मूल  मोठे होताना त्याचे वेळोवेळी निरीक्षण केले तरी त्याची सध्याची personality किंवा व्यक्तिमत्व कळते.

मग गरज असते ती त्याच्या  व्यक्तिमत्वाला  योग्य वळण देण्याची. मुलांसाठी quality  वेळ देण्याची गरज असते. पालकांच्या वर्तणुकीतून मुले घडत असतात. त्यासाठी  कचेरीत quality output देणाऱ्या पालकांनी मुलांच्या समोर व घरातील आपले वागणे quality ह्या सदरात मोडते का हे प्रथम तपासून बघितले पाहिजे.

आजी – आजोबानी नातवंडांचे नुसते कौतुक न करता नातवंडांचे निरीक्षण केले पाहिजे कारण अनेकवेळा ते मूल  त्यांच्या संगतीत अधिक वेळ असते. अर्थात आजी –  आजोबानी सुद्धा स्वत:चे घरातील वागणे तपासले पाहिजे.

एक हौशी सल्लागार म्हणून मी नातवंडांच्या वर्तणुकीचे  विश्लेषण करतो व वेळोवेळी मोकळ्या मनाने मुलाला – मुलीला – सुनेला – जावयाला लिखित स्वरूपात  (written) फीडबॅक देतो. नंतर त्यांच्याशी चर्चा करतो. नातवंडांसाठी जे श्रेयस्कर आहे, ते न घाबरता लिहितो. हे दोष पालकांना सुद्धा कळलेले असतात, परंतु प्रेमापोटी – मोठेपणी सुधारेल म्हणून त्यांच्याकडून कठोर पावले उचलली जात नाहीत.

माझ्या ह्या वागणुकीचा सुरवातीला चुकीचा अर्थ काढला गेला हे मुद्दाम नमूद करतो. माझे म्हणणे एव्हडेच असते कि हे कोणीतरी सांगितले पाहिजे.  परंतु माझे म्हणणे कालांतराने त्यांच्या पचनी पडले व त्यांनी मुलाला योग्य वळण लागण्यासाठी प्रयत्न केले. आज काही वर्षांनी त्यांच्या  personality ला लागलेले चांगले वळण बघून माझे श्रम सार्थकी लागले असे मला वाटते.

आज किती आजी आजोबा हे करतील? हे सांगणे कठीण आहे. असो. हल्लींच्या ‘ हम दो हमारा एक ‘ च्या जमान्यात किती लोकांना  आपल्या मुलावर केलेली टीका आवडेल हा प्रश्नच आहे. पटलं  तर घ्या नाहीतर माझे विचार विसरून जा.

सुधीर वैद्य

२१०७२०१८

Advertisements

0 Responses to “५७६) व्यक्तिमत्व विकास”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s




Archives

August 2018
M T W T F S S
« Jul    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: