५६९)सहा शब्दांच्या लघु कथा  – #MySixWordStory 

569) Short Stories - 1.jpg

५६९) सहा शब्दांच्या लघु कथा  – #MySixWordStory 

अर्नेस्ट हेमिंग्वे नावाचा अमेरिकेचा एक प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि कादंबरीकार होता. एकदा त्याच्या सहकारी लेखकांनी त्याला आपल्या आयुष्याबद्दल सहा शब्दात लिहायचे आव्हान दिले. तेव्हा त्याने आपल्या रुमालावर पुढील वाक्य लिहले. For Sale: Baby Shoes, Never Worn. (अर्थ – विक्रीस उपलब्ध :बाळाचे बुट, कधीच न घातलेले.) तेव्हापासूनच ही पध्दत सुरु झाली. २००८ साली अशा स्टोरींसाठी एक स्वतंत्र वेबसाईटही बनवली होती. २ जुलैला या लेखकाचा स्मृतीदिन असतो.
===============================================

मला सुचलेल्या सहा शब्दांच्या कथा सादर करत आहे. हि प्रत्येक कथा तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करेल असा मला विश्वास आहे.

१) जे मिळाले आहे त्यावर प्रेम करा.

२) आयुष्यात हवे असलेले सर्व मिळते का ?

३) मान्सून आला, पण पाऊस  नाही आला.

४) देवाने माणसाला डोळे दिले, डोळसपणाचे काय?

५) पैसा हा जगण्यासाठी नक्की आवश्यक असतो.

६) पैसा  हे आयुष्याचे ध्येय असू शकत नाही.

७) मनात असलेले बोललेच पाहिजे असे नाही.

८) जे बोलाल ते मनात असले पाहिजे.

९) नात्यात पैसा आला कि नाती बिघडतात.

१०) पती – पत्नी एकमेकांचे मित्र असले पाहिजेत.

११) प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते.

१२) वैवाहिक आयुष्यात इतरांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो.

१३) देव भक्ताने मागितलेले सर्व देत नाही.

१४) भक्ताने न मागतासुद्धा देव त्याला देतो.

१५) देवाला आपली गरज चांगली ठाऊक असते.

१६) Success = combination of intelligence,efforts, luck.

१७) बचत हा सुद्धा एक प्रकारचा खर्च आहे.

१८) वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि विश्वास महत्वाचा.

१९) समोरचा  माणूस आवडण्याचे कारण कळले पाहिजे.

२०) भोगलेल्या दु:खाला मला  सुख मानावे लागले.

२१) इतके भोगले कि मला हसावे लागले.

२२) वेळ आल्याशिवाय खेळ उभा राहत नाही.

२३) उद्यापासून काही काळ फेसबुक सन्यास घेणार.

२४) रात्र थोडी आणि सोंगे  मात्र फार .

२५) माझे देशावर खऱ्या अर्थाने प्रेम आहे.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या भावना – विचार सहा शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करा आणि मला नक्की कळवा.
सुधीर वैद्य

Advertisements

0 Responses to “५६९)सहा शब्दांच्या लघु कथा  – #MySixWordStory ”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s




Archives

July 2018
M T W T F S S
« May    
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: