५६८) स्पंदने आणि कवडसे – २९

11061238_957382277616021_6443108461932109524_n_2

५६८) स्पंदने आणि कवडसे – २९

स्पंदने म्हणजे vibrations मनातील कंपने. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. काही विचार मनात घर करतात. वाचताना – दुसऱ्याशी बोलताना हि विचार धारा सुरु होते आणि काही काळ हि विचारांची कंपने मनात जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात. अशीच काही मनातील विचारांची कंपने आणि कवडसे  आपल्या समोर सादर करत आहे.

===============================================

ज्या माणसाला आपले कौतुक आहे असे वाटते , त्याच माणसाबरोबर संवाद करायला मन ओढ घेते. …… हौशी सल्लागाराचे एक निरीक्षण.

पूर्वी शाळा सुरु होणार म्हणून मुलांना आनंद होत असे आणि आता शाळा सुरु होणार म्हणून पालकांना आनंद होतो.

आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आयुष्यातील दुपार – उन्हाळा आठवतो, तेव्हा सध्याचा उन्हाळा तर काहीच नाही असे वाटते.

मुळात: माणसाने स्वत:साठी जगावे आणि त्याच्या बरोबरीने इतरांसाठी, जमेल तसे, जमेल तेव्हडे/

ज्याच्या साठी तुम्ही जगत आहात, त्याला जर जाणीव नसेल तर तुमची निराशा होते. बिरबलाने  सांगितलेली गोष्ट (माकडीण आणि तिची पिल्ले) कायम लक्षात ठेवा.

माझ्या मते  आपण जेव्हडा दुसऱ्यासाठी विचार करतो तेव्हडा समोरचा करत नाही असे अनेकवेळा निदर्शनात येते. आयुष्यातील अनुभवामुळे आपले विचार बदलावे लागतात.

प्रत्येक माणूस हा एका स्टेज नंतर  एकटाच असतो. तो एकटा येतो आणि एकटाच जातो. हे एकदा ध्यानात आले कि आयुष्य सोपे होते.

कोणत्याही प्रश्नाचे भावनेच्या  – प्रेमाचा जोरावर काढलेले उत्तर काळाच्या कसोटीवर टिकत नाही. प्रश्न सोडवताना  व्यावहारिक बाजूचा साकल्याने विचार करावाच लागतो. हौशी सल्लागार म्हणून केलेले निरीक्षण.

एखादा प्रश्न सोडवताना नवीन प्रश्न निर्माण होणार नाही, ह्याची काळजी घेतली पाहिजे.

माणुसकी म्हणजे  समोरच्या माणसाला माणसासारखे वागवणे.

डोळसपणा म्हणजे आयुष्यात दूर दृष्टी ठेवतानाच जवळच्या परिस्थितीची जाणीव असणे – ठेवणे.

जन्म आपल्या हातात नसतो पण जगावे कसे हे आपण ठरवायचे असते.

सोशल मीडिया वर स्टेटस दिसते तशीच असते असे नाही. सावधानता बाळगणे गरजेचे आहे असे मला वाटते.

ज्या नात्यांमध्ये अनेक वर्षे वैचारिक मतभेद असतात, ती नाती कोणाच्या सांगण्यावरून / एखाद्या घटनेनंतर, केवळ हातात हात घेऊन किंवा मिठ्या  मारून सुरळीत होत नाहीत. हौशी कौटुंबिक सल्लागार म्हणून केलेले एक निरीक्षण.

अनेक जणांना स्वत:च्या दिसण्याबद्दल  inferiority कॉम्प्लेक्स असतो, त्यामुळे जे आरश्यात दिसते त्यालाच ते सौन्दर्य मानतात. Beauty is not what you see in the mirror.

भूतकाळाचे अवलोकन करून, भविष्याकडे नजर ठेवून, वर्तमानात वाटचाल करावी लागते, कारण भूतकाळातून वर्तमानात जगायला प्रेरणा मिळतेच असे नाही.

चूक कबुल करताना जो मनाला त्रास होतो, तीच पुढील आयुष्यात  शक्ती ठरू शकते.

भांडणाचे एक शास्त्र असते. भांडणाचे नियम पाळले गेले तर नातेसंबंध जुळतात व मजबूत होतात.

हल्ली पैशाला किंमत राहिली नाही.

जर प्रेम कृतीतून दिसले तर प्रेमाची कबुली द्यावीच लागत नाही.

अनेक वेळा माणसाची खरी ओळख पटायला एक जन्म सुद्धा  पुरत नाही.

ज्यावेळी प्रत्येकाला सहवेदनेची जाणीव होईल, त्या दिवसापासून समाजमन जवळ येईल.

माणसाची वैचारिक खोली, तो रहात असलेल्या खोलीपेक्षा (रूम) मोठी असेल तर अनेक प्रश्न निर्माणच होणार नाहीत.

दर शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाचे पहिल्या आठवड्याचे तिकीट विक्रीचे आकडे पाहिले कि आपला भारत देश  – इंडिया गरीब आहे ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.

२७ मार्च जागतिक रंगभूमी दिवस. सर्व रंगकर्मींना आणि नाट्यरसिकांना शुभेच्छा.

खरेतर आपले आयुष्य म्हणजेच एक रंगभूमी असते आणि आपण सगळे रंगकर्मी.

आपण जिंकत असतो तेव्हा कोणीतरी हरत असतं हि जाणीव मनात असेल तर हरण्यातही मजा असते. आयुष्यात पर्मनंट काहीच नसते. खेळही त्याला अपवाद नाही.

देशात दर वर्षी राम  जन्माचा सोहळा अनेक ठिकाणी होतो. पण अजून रावणांची

संख्या काही कमी होत नाही. ….  असो.

Eyesight & Vision are different. Everyone may have eyesight but not necessarily vision.

विनाकारण विरोध न करणे म्हणजे सुद्धा समोरच्याच्या कार्यात सहभाग घेतल्यासारखे किंवा पाठिंबा दिल्यासारखे आहे.

माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा नवीन वर्षाएव्हडाच भारी असतो.

प्रत्येक दिवसाची सकाळ म्हणजे जन्म असतो आणि रात्रीची  झोप म्हणजे मृत्यू असतो. हा सिद्धांत एकदा मनात ठसला कि आयुष्य सोपे होऊन जाते.

एकाचे नुकसान – दुसऱ्याचा फायदा. Double entry accounting. 🙂

ती सध्या काय करतेय ? आणि तो सध्या काय करतोय ?

प्रेम करताना जर व्यावहारिक पातळीचे भान राखले, तर असे प्रेम विवाह यशस्वी होतात. … एक निरीक्षण

व्यक्तीला कळायला लागल्यानंतर त्याच्या भोवती  ‘ तू काय कर किंवा काय करू नकोस ‘  हे पिंजरे जेव्हडे कमी असतील तेव्हडे त्याचे आयुष्य सुखाचे जाते. अर्थात व्यक्तीला नेमके कधी कळायला लागले हे ओळखणे खूप कठीण असते. त्यामुळे हे पिंजरे पालकांकडून, समाजाकडून नकळतपणे उभारले जातात. बघा विचार करून…..

शिकवणे आणि शिकणे ह्यातील फरक कळणे आवश्यक असते.

जीव देणे, जीवाला जीव देणे आणि जीव घेणे  ह्यातील फरक कळणे आवश्यक असते.

ऐकणे
International Ear Care Day – 03-03-2018. सर्वाना खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला जन्मानंतर ऐकायला येते, पण काय ऐकायचे, कोणाचे ऐकायचे, कधी ऐकायचे हे कळण्यास कधी कधी एक जन्म सुद्धा अपुरा पडतो, हे वास्तव आहे.

आयुष्य 

आयुष्य सुखकारक होण्यासाठी – आयुष्याची मजा घेण्यासाठी, तीन गोष्टींची आवश्यकता असते — वेळ , energy आणि पैसा.

लहानपणी — वेळ , energy असते पण पैसा नसतो.

तरुणपणी  — energy व पैसे असतात, पण वेळ नसतो.

म्हातारपणी — वेळ व पैसा असतो, पण energy  नसते.

ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी वेळेचे व पैशाचे योग्य नियोजन करा. पैशाची योग्य गुंतवणूक करा. तब्बेतीकडे लक्ष द्या. मेडिटेशन करा. बघा विचार करून.

नाही म्हणण्याची कला मी लहानपणीच अवगत केली आहे. त्यामुळेच मी मनासारखे जगू शकलो.

जेव्हा सहन करण्याची आणि सोसण्याची सहनशक्ती संपते , तेव्हा समजावे कि आपले म्हातारपण सुरु झाले.

विस्मरण हे सुद्धा एका अर्थाने स्मरणशक्ती होती ह्याचा पुरावा आहे.

बघा विचार करून. 🙂

कोणाला पेन (pen)  द्या पण pain (वेदना) देऊ नका.

सुधीर वैद्य

Advertisements

0 Responses to “५६८) स्पंदने आणि कवडसे – २९”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

July 2018
M T W T F S S
« May   Aug »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: