५६६) आज आमच्या लग्नाचा ३४ वा वाढदिवस. !!!!! ११ मे

18556266_1477624618925115_457058285010436990_n

५६६) आज आमच्या लग्नाचा ३४ वा वाढदिवस. !!!!! ११ मे

मित्रानो, सुप्रभात.
आज आमच्या लग्नाचा ३४ वा वाढदिवस. !!!!!

आमचा जगावेगळा, रूढी बाह्य, चालीरितीना पूर्णपणे फाटा देऊन नोंदणीकृत पद्धतीने केलेला विवाह, चार स्टार हॉटेलात फक्त ५० मित्र – नातेवाईकांच्या उपस्थितीत ११ मे रोजी संपन्न झाला. अंदाजे खर्च झाला रुपये ३०००/- फक्त.

हे लग्न ३० दिवससुद्धा टिकणार नाही असा आशीर्वाद असताना सुद्धा, हे लग्न ३४ वर्ष कसे व का टिकले? ह्याचे अवलोकन इतर जोडप्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल.

महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघांनीही एकमेकांची वैयक्तिक स्पेस  जपली,

त्यामुळे आम्ही वैवाहिक स्पेसला योग्य न्याय देऊ शकलो. त्याच वेळी

लग्नाआधीपासून असलेले मैत्रीचे नाते शाबूत ठेवले, त्यामुळे पती – पत्नीच्या नात्याचे बॅलन्सिंग चांगले झाले.  तसेच आमचे मतभेद आम्ही कोणाच्याही मदतीशिवाय

सोडविले,

 

नवरा बायकोचे प्रेम हे ओजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम खूप प्रेम म्हणून आम्ही कधी हि ओंजळ बंद करून एकमेकांच्या स्पेस वर आक्रमण केले नाही.

मी सर्व निर्णय डोक्यानेच घेतले आणि आजपर्यंतच्या आयुष्यात तरी माझा अनुभव चांगला आहे. हृदयाने घेतलेले निर्णयच काही वेळा लाभदायक ठरले नाहीत.

 

There are three stages of Marriage namely

MAD for each other /MADE for each other /MAD because of each other. आम्ही मात्र अजून दुसऱ्याच स्टेज मध्ये आहोत.

 

आमच्या  आयुष्यात वाद विवादाचे प्रसंग बरेच वेळा आले. काही वेळेला वाद विवाद करताना मुळ विषय बाजूला पडतो आणि ह्या वाद विवादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयक्तिक पातळीवर उतरते. इगो दुखावला जातो. अश्या वेळी आम्ही आरोप प्रत्यारोप न करता, शांतपणे चर्चा केली. कारण आरोप प्रत्यारोपाचा उद्देश कोण बरोबर हे ठरवण्याचा असतो. त्यात कोणाचाच फायदा नाही. चर्चा केल्यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते.

 

काही वेळा उलट्या बाजूने विचार सुरु केला त्यामुळे समोरच्या माणसाची बाजूपण समजून घ्यायला मदत झाली.

 

ज्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत ते प्रश्न विसरून गेलो. उत्तर वेळेवर मिळण्यात जी मजा आहे, ती मजा उत्तर ओरबाडून घेण्यात नाही.

 

आपल्या समोरील समस्येच्या बाजूला दुसऱ्या माणसाच्या मोठ्या समस्येची रेषा आखली कि आपली समस्या हि समस्याच नसून देवाने आपल्याला परीक्षा देण्यासाठी संधी दिली आहे असा भास होतो. ह्या तत्वाचा अवलंब केला.

 

आम्ही कधीच एकमेकांना गृहीत धरले नाही. चूक कबूल करायला धैर्य लागते. चूक कबूल करताना आपल्या मनाला ज्या वेदना होतात, तीच आपली कालांतराने शक्ती बनते आणि आपण नवीन चुक करण्यापासून परावृत्त होतो.

 

नाते आणि पैसा दोन्हीही आपापल्या जागी योग्यच. पण नात्यात पैसा आला किंवा पैशात नाते लुडबुड करायला लागले कि प्रश्न निर्माण होतो. हे आम्ही टाळले. नाते आणि पैसा दोन्हीही आपापल्या जागीच ठेवले.

 

मन मारून शक्यतो काहीही केले नाही. जे करायचे ते मनापासून आणि मनाचा कौल जाणून केले. जे आपल्या मनाला पटते तेच केले, पण दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी मात्र घेतली.

 

चांगल्या शारीरिक आरोग्यासाठी आणि मनाच्या शांती साठी जिभेवर नियंत्रण ठेवले. वेळोवेळी काही दिवसांकरिता मौन व्रत अंगिकारले.

 

स्वत:ची कामे शक्यतो स्वत: स्वत: केली. जेव्हा तुम्ही फार कमी गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहता, तेव्हा तुमची बरीच tension साहजिकपणे कमी होतात.

 

सुखी होण्याचा एक मार्ग म्हणजे आपले कोणावाचून अडता कामा नये. हा नियम आम्ही पाळला. आपण दुसऱ्याची मदत जरूर घ्यावी पण अवलंबून राहू नये. हि विचार धारा एकदा समोरच्याला कळली की तुम्हाला कोणीच त्रास देत नाही.

 

दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे. आम्ही आपापला इगो आकारात ठेवला.

 

अनेकवेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा  कौल ) ऐकला.

भांडणामुळे नवरा – बायकोचे नाते ताजे राहते. भांडणाचे सुद्धा एक शास्त्र आहे.

जर आपल्या वागणुकीचा त्रास दुसर्यांना  होत नसेल, तर आपल्या मनाप्रमाणे वागायला हरकत नाही . लोगोका काम है कहेना !!!

 

नवरा – बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा केली. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार केला, पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व दिले नाही. अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार केली. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी कोणत्या अपेक्षा पूर्ण  करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील याची कल्पना दिली.

 

आयुष्यात मानसिक शांततेसाठी नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली .

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती – कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की केले.

 

जोडीदाराला गुण आणि दोषांसकट स्वीकारले त्यामुळे वैवाहिक आयुष्य सुखाचे गेले गेले. बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक बालपण सर्वांचेच संपते. पण मनातील बालपण आणि निरागसता हरवणार नाही ह्याची काळजी

घेतली.

 

स्त्री हि खरेतर पुरुषा पेक्षा जास्त काटक  असते. स्त्री हि व्यवस्थापन गुरु असते. हि वस्तुस्थिती मला मान्य होती. आम्ही आयुष्यभर – सुखात दु:खात, वेदनेत एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो.

 

३४ वर्षे एकत्र गेली. किती राहिली माहित नाही. 🙂

 

 

सुधीर वैद्य
११-०५-२०१८

Advertisements

0 Responses to “५६६) आज आमच्या लग्नाचा ३४ वा वाढदिवस. !!!!! ११ मे”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

May 2018
M T W T F S S
« Feb   Jul »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: