५६५) गोष्ट एका कावळ्याची …….. 

565) 31960822_1844302372257336_4660811540826423296_o

565) 32186640_1844302492257324_5570995860528955392_n

565) 32073902_1844302515590655_2203601484531105792_n

५६५) गोष्ट एका कावळ्याची …….. 

मित्रांनो, घाबरू नका. लहानपणी ऐकलेल्या कावळा चिमणीची गोष्ट तुम्हाला सांगणार नाहीये. कावळ्यावरील लोकप्रिय निबंधाचासुद्धा ह्या लेखाशी काहीही संबंध नाहीये.

खरेतर हि गोष्ट मी पाच वर्षांपूर्वीच सांगायला हवी होती. असो. आज हि गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे काल  मला त्या कावळ्याचा फोटो काढता आला. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ह्यात काहीच शंका नाही. सगळेच कावळे काळे असतात, काव काव ओरडतात, मग ह्या कावळ्यात काय वेगळेपण आहे?

मित्रांनो, त्याच वेगळेपणाची हि गोष्ट आहे.

ह्या कावळ्याचा जन्म आमच्या बागेतील आंब्याच्या झाडावर पाच वर्षांपूर्वी झाला. थोडा मोठा झाल्यावर सुद्धा त्याला चांगले उडता येत नव्हते. त्याला उडण्याचे प्रशिक्षण त्याच्या आईने नेटाने दिले, उडायला  लागला कि हा कावळा खाली पडे. थोडा वेळ विश्रांती घेऊन परत कसरत सुरु होई. तीन चार तास हा प्रकार चालू असे. ह्या सर्व झटापटीत त्याच्या छातीची काही पिसे गळून  पडली. आम्हाला वाटले कि त्याला परत पिसे येतील. परंतु तसे झाले नाही. कावळ्याला हि चांगले उडता येऊ लागले.

त्याच्या  आईने  बहुतेक स्थलांतर केले असा अंदाज आहे. परंतु हा कावळ्याने मात्र आमची बाग  काही सोडली नाही. त्याच्या दाणा पाण्याची सोय चांगली झाली होती. आमच्या बागेत आंब्याची दोन झाडे, नारळाचे झाड, पपई, केळी, कडुलिंब, रबर अशी मोठी झाडे व इतर फुलझाडे, शोभेची झाडे आहेत. खाण्याची ददाद नाही. पिण्यासाठी पाणी ठेवले जाते. त्यामुळेच ह्या कावळ्याला आमची बाग सोडून जावेसे वाटले नाही. त्याच्या छातीवरील पिसे गळल्यामुळे आम्ही त्याला आजही ओळखू शकतो.

ह्या वर्षी आम्ही पाणी खिडकीत ठेवले आहे. कारण बागेत खारी सुद्धा पुष्कळ आहेत. पाण्याचे भांडे वारंवार उपडे करतात. तसे झाडावर  सोसायटीने पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे त्यांचे काही अडत नाही.

ह्या कावळ्याला आंबे खूप आवडतात. रात्री एखादा तरी आंबा खाली पडतोच. सकाळपर्यंत मस्त मेजवानी चालू असते. मग खिडकीतीळ पाणी पिउन स्वारी आराम करायला बागेत पळते.

काल त्याला आंबा मिळाला नाही. घरात एका आंबा थोडा खराब झाला होता. बायकोने त्या आंबाच्या फोडी करून खिडकीत ठेवल्या. अपेक्षेप्रमाणे आमचा पाळलेला कावळा आंबा खायला आला व मी त्याला कॅमेऱ्यात कैद केले. आजपर्यंत पाणी पिताना तो  सतर्क असे, त्यामुळे त्याचा फोटो काढता आला नाही. बागेत फोटो काढायला गेले कि उंच फांदीवर लपून बसे. असा आमचा लपाछपीचा खेळ पाच वर्षे सुरु होता. काल  ह्या खेळात मी जिंकलो व त्यामुळे आज लेख लिहायला घेतला.

हे लिहिता लिहिता माणसाच्या मूलभूत गरजांची आठवण झाली. प्रत्येकाला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा हेच तर हवे असते. हे सर्व काही लोकांना खूप प्रमाणात मिळते, तर काही लोकांना फारच थोड्या प्रमाणात मिळते, तर काहींना मिळतच नाही. ह्या गोष्टी आपल्याला जेव्हा  मिळतात तेव्हा जर ‘ नाही रे ‘ गटाची दु:खे आठवली तर आपले पाय नेहमी जमिनीवर राहतील. बघा विचार करून.

सुधीर वैद्य

०९-०५-२०१८

Advertisements

0 Responses to “५६५) गोष्ट एका कावळ्याची …….. ”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

May 2018
M T W T F S S
« Feb   Jul »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: