५६४)’असेही एकदा व्हावे` …… 

What

५६४) ‘असेही एकदा व्हावे` …… 

प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगायला मिळावे अशी अपेक्षा असते. काही वेळा  हे शक्य होते, तर अनेक वेळा वाट्याला आलेले आयुष्य गोड मानून घ्यावे लागते. काही वेळा अनेक विचार मनात येतात. ते विचार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कमीच असते. तरीही मनाला वाटत राहते कि ‘असेही एकदा व्हावे` !!!!
अश्याच काही मनातील विचारांचे हे संकलन आहे. वरवर दिसायला हे विचार जरी आशादायी वाटले, तरी त्याला निराशेची किनार आहे.

—————————————————————————

‘असेही एकदा व्हावे`

——- कटुंबातील नातेसंबंध खऱ्या अर्थाने मजबूत व्हावे

‘असेही एकदा व्हावे`

…….. सासूने सुनेला मुलीसारखे प्रेम द्यावे.

‘असेही एकदा व्हावे`

…….. सुनेने सासूला खऱ्या अर्थाने आई मानावे.

असेही एकदा व्हावे`

…….. मालकाला कर्मचाऱ्यांचे नेमके प्रश्न समजावे

‘असेही एकदा व्हावे`

…….. परीक्षांचे  निकाल वेळेवर लागावेत.

‘असेही एकदा व्हावे`

…..  आई – वडिलांना मुलाचे योग्य मूलमापन करता यावे.

‘असेही एकदा व्हावे`

…… आई – वडिलांनी मुलांबरोबर गुणात्मक (quality) वेळ घालवावा.

‘असेही एकदा व्हावे`

……  दूरदर्शन मालिका फक्त १३ भागांच्या असाव्या.

‘असेही एकदा व्हावे`

……  मुलाने बापाची दु:खे – समस्या  समजून घ्याव्या.

‘असेही एकदा व्हावे`

……..  मुलीने आईचे मन ओळखावे.

‘असेही एकदा व्हावे`

……  एकदा समजावून सांगितल्यानंतर मुलांनी तीच चूक परत करू नये.

‘असेही एकदा व्हावे`

………  जाती विरहित समाज जन्माला यावा.

‘असेही एकदा व्हावे`

……..  स्त्रीला खऱ्या अर्थाने पुरुषाच्या बरोबरीचा दर्जा मिळावा म्हणजे जागतिक महिला दिवस साजरा करावा लागणार नाही.

‘असेही एकदा व्हावे`

………  लग्नानंतर नवऱ्याने पाच वर्षे घरजावई म्हणून राहावे म्हणजे लग्नानंतर  बायकोला किती तडजोड करावी लागते ह्याचा वस्तुपाठ पुरुष जातील मिळेल.

‘असेही एकदा व्हावे`

………. सर्वांनी पांढऱ्या रंगाचे श्रेष्ठत्व मानावे.

‘असेही एकदा व्हावे`

……..  प्रत्येकाला मनासारखे जगून झाल्यावर इच्छा मरणाचा अधिकार असावा.

‘असेही एकदा व्हावे`

……..  विरोधी मताचा किंवा प्रिय नसलेल्या मताचा आदर केला जावा.

‘असेही एकदा व्हावे`

……  बलात्कार करणाऱ्याला लवकरात लवकर फाशी व्हावी.

‘असेही एकदा व्हावे`

…..  बालपणीचे दिवस परत एकदा अनुभवता यावे.

‘असेही एकदा व्हावे`

……..  जग सोडून गेलेल्या प्रिय व्यक्तीला एकदा भेटता यावे.

‘असेही एकदा व्हावे`

… सगळेच घरी जेवू लागावे व हॉटेल ओस पडावे.

‘असेही एकदा व्हावे` …..

सुधीर वैद्य

Advertisements

0 Responses to “५६४)’असेही एकदा व्हावे` …… ”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s




Archives

May 2018
M T W T F S S
« Feb   Jul »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: