१५०) रोश  विरुद्ध अॅडॅम्स / स्टॅन्ले अॅडॅम्स

150) Photo6252

१५०) रोश  विरुद्ध अॅडॅम्स / स्टॅन्ले अॅडॅम्स /अनुवाद डॉ सदानंद बोरसे / राजहंस प्रकाशन / प्रथम आवृत्ती १२-१०-१९८६ / रुपये ४० / पृष्ठे १५२

एका बहुराष्ट्रीय औषधकंपनी विरुद्धच्या एकाकी लढतीची हि सत्यकथा आहे.

२०१८ साली सुद्धा औषधे, जीवन सत्वे, त्याची गरज, किंमती, उपलब्धता वगैरे गोष्टींबद्दल उलट सुलट चर्चा सुरु असतात. त्याच बरोबरीने ह्या धंद्यातील अर्थकारण, राजकारण ह्याची सुद्धा चर्चा असते. पेटंट संदर्भात न्यायालयीन खटले सुरु असतात. देशाचे राजकारण, सरकारच्या  आरोग्यविषयक policy, बजेट मधील तरतूद, वैद्यकीय व्यवसायातील लूटमार (काही अपवाद वगळता) सुद्धा ह्या सर्व घडामोडीचा भाग बनतात. सामान्य रोगी मात्र हि लूटमार सहन करत असतो.

औषधी कंपनीच्या कारभारावर नाराज होऊन श्री स्टॅन्ले अॅडॅम्स (वरिष्ठ मॅनेजर) कंपनी विरुद्ध १९७३ मध्ये युद्ध छेडतो. त्याचे निरीक्षण आणि रिपोर्ट सत्य असताना सुद्धा तो देशोधडीला लागतो. त्याला तुरूंगवास  होतो. एका देशाविरुद्ध आणि कंपनी  विरुद्ध तो हतबल  होतो.

पुस्तकाच्या शेवटी तो संदेश देतो कि — म्हणूनच मला वाटतं, तुच्याकडे सांगण्यासारखे काही असेल, तर सांगत राहा. गुडघे टेकणाऱ्या लाचार जगण्यापेक्षा मान ताठ ठेवणारा मृत्यू लाख पटींनी चांगला .

हे पुस्तक प्रत्येक व्यावसायिकाने – प्रोफेशनल मॅनेजर्स, व्यवस्थापनाचा अभ्यास करणारे विद्यार्थी ह्यांनी नक्की वाचले पाहिजे.

हे पुस्तक वाचून जर प्रत्येकाने असा निर्धार केला कि माझ्या आजूबाजूला काही गैर घडत असेल तर त्याच्या विरुद्ध माझ्या  शक्तीनुसार मी लढेन. हल्ली अनेक मोठ्या कंपन्यात  Whistle  blower policy असते.

पुस्तकाचा फॉन्ट मोठा आहे. पुस्तक एका बैठकीत वाचून होते. असे चाकोरीबाहेरचे  पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल राजहंस प्रकाशनचे आभार. स्टॅन्ले अॅडॅम्सला सलाम. डॉ सदानंद बोरसेनी सुंदर अनुवाद केला आहे.

सुधीर वैद्य

१२-०२-२०१८

Advertisements

0 Responses to “१५०) रोश  विरुद्ध अॅडॅम्स / स्टॅन्ले अॅडॅम्स”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s




Archives

February 2018
M T W T F S S
« Jan   May »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: