५५४) मुलींच्या  आयुष्यातील एक गुंता – शिक्षण, करिअर आणि लग्न … 

Education

career

५५४) मुलींच्या  आयुष्यातील एक गुंता – शिक्षण, करिअर आणि लग्न … 

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी – व्यवसाय – घर – लग्न – संसार – मुलाबाळांची काळजी – वडीलधाऱ्या मंडळींची काळजी / सेवा  असे ठराविक टप्पे असतात. आयुष्य ह्याच टप्प्यांप्रमाणे गेले किंवा  हे टप्पे ह्याच क्रमाने पार पडले, तर आयुष्य सुखकर होण्याची  शक्यता असते.  हा क्रम थोडा पुढे मागे झाला तरी फारसे बिघडत नाही. परंतु मुलीच्या आयुष्यात मात्र हा क्रम थोडा पुढे मागे झाला, तर समस्या निर्माण होतात, मनःस्ताप होतो – तिला आणि इतरांनासुद्धा.

आपला समाज केवळ जातीभेदाने विभागाला गेलाय असे वाटत असेल, तर ते चूक आहे. आपला समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर विभागाला गेला आहे. उ.ह. गरीब-श्रीमंत, अशिक्षीत – शिक्षित, काळा – गोरा, कमावणारा – बेकार, शहरात राहणारा-ग्रामीण, इंग्लिश येणारा – न येणारा, भारतात नोकरी करणारा – परदेशात नोकरी करणारा, कॉम्पुटर शिकलेला – कॉम्पुटर न  शिकलेला, लग्न झालेला – लग्न न झालेला, मुलेबाळे असलेला – निपुत्रिक, सौभाग्यवती – विधवा स्त्री – परित्यक्ता, मुली असलेला- मुलगे असलेला इत्यादी. मित्रानो, समाजातील  हे भेद  जाती पातीच्या भेदा इतकेच भयाण आणि भीषण आहेत.

पण ह्या भेदा पलीकडे सुद्धा एक प्राथमिक भेद आहे आणि तो म्हणजे पुरुष आणि स्त्री. वरील पैकी प्रत्येक ग्रुप मध्ये हा भेद अटळ आहे. पहा विचार करून. खरेतर पुरुष आणि स्त्री हा भेदभाव ज्या दिवशी नष्ट होईल तो सर्वांसाठी सुदिन असेल.

स्त्रियांच्या नशिबाचे भोग कधी जाणून घेण्याचा प्रयत्न, पुरुष जातीने केला आहे का? उत्तर नकारार्थीच आहे.  स्त्रीची कुचंबना तुम्हाला कधी जाणवली आहे का ?

स्त्रियांच्या संदर्भात वाचनात आलेले एक वाक्य देण्याचा मोह मी टाळू शकत नाही. ह्या एका वाक्यात स्त्री चे यथार्थ वर्णन केले आहे.

A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she is happy and laughs when she is afraid. Her love is unconditional!! There’s only one thing wrong with her, she sometimes forgets what she is worth…..

आजच्या स्त्रियांची खरेतर हीच शोकांतिका आहे. लग्न हे बरेच वेळा आयुष्याचे ध्येय बनते – लादले जाते. चांगेल दिसणे, शिकणे, नोकरी  करणे, स्वभावाला  मुरड  घालणे, गृह कृत्य दक्ष होणे हे केवळ लग्न होऊन सासरी जाणे ह्यासाठीचीच गुंतवणूक असते.  हे सर्व करताना स्त्री स्वत:चे स्व विसरत असते किवा  दुसऱ्या गोष्टीत शोधत राहते. सासर हेच तिचे खरे घर हे लहानपणापासून तिच्या मनावर ठसविले जाते. सासरी गेली कि ती माहेरला पारखी होते. (कौतुकासाठी माहेर असते पण मुलीच्या संसारात समस्या आली तर मात्र तिला माहेरचा आधार मिळेल याची खात्री नसते.) कित्येक वेळा स्त्रीच स्त्रीची शत्रू असते – बनते. अशावेळी जर पुरुषाने स्त्रीला पाठींबा दिला तर तिचे आयुष्य सुखकारक होते.

मुलगा आणि मुलगी ह्यांच्या ability / capacity  मध्ये फरक नसतो. पण मुलीला घडवले जाते हि शोकांतिका आहे. तिच्या वागणुकीचे मापदंड ठरवले जातात.

ह्या परिस्थितीमुळे प्रत्येक मुलीने आपल्या आयुष्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मुलगी हुशार असेल तर हे प्रश्न भविष्यात खूप उग्र रूप धारण करतात. प्रत्येक हुशार मुलीने आयुष्याचा फोकस योग्य  राहील ह्याची काळजी घेतली पाहिजे.

उच्च शिक्षणाचे ध्येय ठेवताना, आपली बलस्थाने, कमजोर स्थाने  (SWOT) तपासली पाहिजेत. कारण जर अपेक्षेप्रमाणे उच्च शिक्षण योग्य वयात पूर्ण झाले नाही तर पुढे काय? आई -वडील तर आता लग्न  करून घे  व मग शिक्षण सुरु ठेव असा आग्रह करणार. तुमची स्वत:ची  काय भूमिका आहे? लग्न करायची निकड तुम्हाला

भासते आहे का? कि आई- वडिलांना  जबाबदारीतून  मुक्त करण्यासाठी तुम्ही विवाहाला तयार आहात? हि संपूर्ण प्रोसेस एकमेकात गुंतलेली आहे.

SSC ला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर शिक्षणाचा निर्णय घेताना कमीत कमी पुढील दहा वर्षांच्या कालावधीचा विचार केला गेला पाहिजे. सगळ्या शक्यतांचा  विचार झाला पाहिजे. उ.हा. शिक्षण वेळेवर पूर्ण होईल, नोकरी लागेल, मग लग्नाचे बघता येईल. ह्या गोष्टी क्रमाने घडण्याची शक्यता किती?  जर असे घडले नाही म्हणजे शिक्षण  पूर्ण होण्यास  किंवा अर्धवट सोडण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर किती कालावधी देण्याची तुमची तयारी आहे?.  जर का उच्च शिक्षण पूर्ण झाले नाही तर मिळेल ती नोकरी कधी पत्करायची? नोकरीच्या बरोबरीने शिक्षण चालू ठेवायचे का? लग्नाचा विषय किती वर्षे बाजूला ठेवायचा? अर्धवट पूर्ण केलेले उच्च शिक्षण, व मनासारखी नसलेली  नोकरी, अश्या परिस्थिमुळे चांगल्या स्थळांकडून होकार येण्याची शक्य दुरावते. अश्या परिस्थितीत लग्नाचा विचार झाला (वय उलटून जाईल ह्या भीतीने) तर हा गुंता सोडवणे कठीण जाते. लग्न झाल्यानंतर सुनेकडून आणि नवऱ्याच्या बायकोकडून अपेक्षांची यादी डोळ्यासमोर येते. ह्या परिस्थितीत सासरकडून पाठिंबा गृहीत धरणेच चूक आहे. असा हा चक्रव्यूह आहे.

हा गुंता एक हौशी कौटुंबिक सल्लागार म्हणून खूप जवळून मी बघितला आहे. जेव्हा संसारात समस्या निर्माण होतात, तेव्हा त्याचे मूळ ह्या न सोडविलेल्या गुंत्यात (बदललेल्या अग्रक्रमात – संसार, मुले – बाळे  – नवरा – आपले शिक्षण – नोकरी वगैरे) मला सापडते.  ज्या मुलीने उच्च शिक्षणाचे स्वप्न बघितले असेल व त्या अनुषंगाने नोकरी- संसाराची स्वप्ने पहिली असताही तिच्यासाठी हा अग्रक्रम मनाला त्रास न होता स्वीकारणे खूप जड जाते. मग दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. मनाची समजूत काढावी लागते. नवरा तर चांगला आहे,  मुले वेळेवर झाली आहेत – हुशार आहेत – त्यांचे संगोपन मलाच केले पाहिजे, शिक्षण काही फुकट जात नाही, नवरा रग्गड कमावतो आहे, माझ्या सर्व हौशी – मौजी – शॉपिंग होते आहे. मग मी कशाचे दु:ख करू ? वर वर बघता हे खरे आहे पण तुम्ही हि सर्व परिस्थिती मनापासून कायमची स्वीकारली आहे का ? ह्याचे उत्तरही तयार  ठेवा.

मुख्य प्रश्न career  स्त्री चा असतो. career च्या एका टप्प्यावर तिला लग्नही करायचे असते, पण मुला-बाळांची जबाबदारी नको असते. पण वडिलधाऱ्या मंडळींच्या अपेक्षांमुळे हे शक्य होत नाही. समजा बाईला  मुले आपल्या career च्या मध्ये अडथळा होतील म्हणून नको असतील आणि जरी नवरा व सासू -सासऱ्यांना  हे मंजूर असेल, तरी काही काळाने स्त्रीला तिचे मन खात राहते कारण मातृत्व हे प्रत्येक स्त्रीला हवे असते. पण हे उमगेपर्यंत स्त्रीचे वय वाढलेले असते आणि त्यातून परत अनेक प्रश्न निर्माण होतात.

समजा  वेळेवर मुले बाळे झाली आणि career परत सुरु झाली , तरी जेव्हा मुल आजारी पडते – त्याला भावनिक दृष्ट्या आईची गरज असते, तेव्हा ती स्त्री पुरेसा वेळ मुला – बाळांसाठी वेळ देऊ शकत नाही आणि हे वास्तव तिचे मन पोखरत राहते. ती स्वत:ला अपराधी समजते.

अनेक वेळा अशी career woman  वेगळाच मार्ग स्वीकारते. career च्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी मेहनत करावी लागते आणि हे करण्याची त्या स्त्रीची तयारी नसते.  पण मनमोकळेपणी हे मान्यही करायचे नसते. अश्यावेळी त्या मुलाची ढाल करून परत career सुरु करायाला  स्त्री नकार देते, पण आयुष्यभर स्वत:ची career बरबाद झाली म्हणून लग्नाला आणि पर्यायाने नवऱ्याला  दोष देते.

ह्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे तसेच हा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु उर्वरित आयुष्य सुखाचे जावे, मन:शांतीचे जावे असे वाटत असेल तर वर चर्चा केल्याप्रमाणे विचार केला पाहिजे हे सांगण्यासाठी ह्या लेखाचे प्रयोजन  आहे.


सुधीर वैद्य

११-१२-२०१७

Advertisements

0 Responses to “५५४) मुलींच्या  आयुष्यातील एक गुंता – शिक्षण, करिअर आणि लग्न … ”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: