५५३) स्मशान यात्रा (Funeral)….. 

553) Funeral - 1

५५३) स्मशान यात्रा (Funeral)….. 

मला कल्पना आहे कि लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल.

गेल्या काही महिन्यात अनेकवेळा स्मशानात जाण्याचा ‘ योग ‘ आला. आयुष्यात अनेक गोष्टी ‘ योगावरच ‘  तर घडतात, म्हणून योग हा शब्द वापरला. असो. १९९६ सालापासून  संसारात राहून सुद्धा मी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आहे. मी कोणत्याही समारंभाला जात नाही. अपवाद फक्त स्वर्गवासी मित्राला, नातेवाईकाला, शेजाऱ्याला स्मशानात पोचविण्याचा.

माणसाला मरणाची नेहमी भीती वाटत असते. हे स्वाभाविकपण आहे. खरेतर हि भीती मरणाची असतेच, पण त्याहून जास्त भीती असते कि आपण लोळत पडणार का? आपली कोण सेवा करणार.? पत्नी आधी वारली असेल तर हि चिंता पराकोटीची असते. ह्यामुळेच ‘मरण’ हा शब्द उच्चारायला सुद्धा माणूस घाबरतो. अश्यावेळी मी मात्र चक्क स्मशान यात्रा  हा लेख लिहीत आहे.

विनोदाने बोलायचे तर आयुष्यात दोन गोष्टी नक्की आहेत, त्या म्हणजे मरण आणि कर. (Taxation). आपले आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या मधील प्रवास आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. Pascal (तत्ववेत्ता) म्हणतो कि मृत्यू नक्की आहे, फक्त वेळ अनिश्चित आहे. मग मृत्यूबद्दल काळजी करण्यात काय अर्थ आहे?

कै. विनोबा भावेनी आपल्या ‘भगवत गीता ‘ ह्या पुस्तकात मृत्यूबद्दल छान विवेचन केले आहे. माणसाला शांतपणे मरण येण्यासाठी ४ देवतांची कृपा आवश्यक  आहे.

१) Fire / अग्नी म्हणजे काम. माणसाने शेवटपर्यंत कार्यमग्न राहिले पाहिजे.

२) Moon / चंद्र म्हणजे चांगले, क्षमाशील मन असले पाहिजे.

३) Sun  / सूर्य म्हणजे सतत नवीन शिकणे. शिक्षणाचा / अनुभवाचा उपयोग लोकांसाठी करणे.

४) Space  /अवकाश म्हणजे वासना मेली पाहिजे. (detached attitude )

ह्या देवतांची मर्जी संपादन करण्यासाठी तरुण वयातच अभ्यास सुरु करावा लागेल.
हा अभ्यास वाटतो तेव्हडा सोपा नाही. पूजा अर्चा, कर्मकांड एकवेळ निभावता येईल, पण क्षमाशील मन, कार्यमग्नता, सेवेतील आनंद आणि वासनेवर विजय संपादन करणे, खूप कठीण. असो.

आता माझी काही निरीक्षणे तुमच्याशी share करतो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. अशीच निरीक्षणे इतरांनी सुद्धा केली असतील, पण शब्दबद्ध केली नसतील.

स्मशानात जाताना माणसे अचानक गंभीर होतात असे मला नेहमी जाणवते.  माझ्या चेहऱ्यावरील भाव सुद्धा गंभीरच असतात, परंतु मी डोळसपणे तो परिसर, माणसांची देहबोली, धार्मिक विधी, तेथील काम करणाऱ्या माणसांची बोलणी – देहबोली न्याहाळण्यात गर्क असतो. वेगवेगळ्या वेळी स्मशान वेग-वेगळे भासते, असे  माझे निरीक्षण आहे.

अनेकांच्या  डोळ्यात कधी एकदा हे धार्मिक विधी संपणार आहेत? असा भाव असतो. धार्मिक कार्य करणारा नातेवाईक सुद्धा अनेकवेळा यांत्रिकपणे विधी करत असल्याचे आढळते. गुरुजी नेमके कोणते मंत्र म्हणत आहेत ह्याकडे कोणाचे लक्ष असते?, हा खरेतर संशोधनाचा विषय आहे. अनेक जण मोबाईल मध्ये डोके खुपसतात आणि उरलेल्या दिवसाचे प्लॅनिंग सुरु करतात.  हिंदू धर्मात सुद्धा वेगवेगळ्या वेगवेगळ्या रीतीने धार्मिक संस्कार होत असतात.

प्रेताबरोबर रॉकेल न्यावे लागते. तशी स्मशानातील कर्मचाऱ्यांची ऑर्डरच असते. पण त्यातील निम्मे रॉकेल सुद्धा वापरले जात नाही. उरलेल्या रॉकेलचे काय  होत असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही, कारण मुळात शहरामध्ये पांढरपेशा माणसांच्या घरात रॉकेल असण्याची शक्यता फार कमी असते.

हल्ली स्मशानाचा परिसर थोड्याफार प्रमाणात स्वच्छ असतो. थोडेसे सुशोभीकरण केलेले असते. एका  स्मशानात  तर एव्हडे सुशोभीकरण केलेले होते कि प्रथम दर्शनी एखादे प्रेक्षणीय स्थळ वाटावे.

हल्ली बऱ्याच स्मशानात exhaust फॅन ची सोय केलेली असते त्यामुळे धूर पसरत नाही. शहरामध्ये महापालिका – नगरपालिका ह्यांच्या कडून लाकडे फुकट पुरविली जातात. माझ्या मनात नेहमी प्रश्न येतो कि खरेच तेव्हद्या वजनाची लाकडे प्रेत जाळण्यासाठी रचली जातात का?

अग्नी दिल्यानंतर बाहेर पडण्याच्या आधी नातेवाईकाला पुरविलेल्या लाकडाच्या चलन वर सही करावी लागते. तसेच रजिस्टर मध्ये सही करावी लागते. त्याचवेळी तो कर्मचारी आपल्या टेबलचा ड्रॉवर उघडतो, ह्याचा  काय अर्थ असतो? प्रेताला अग्नी देण्यास मदत करणाऱ्या लोकांना टीप दिल्याशिवाय स्मशाना बाहेर पडणे शक्य नसते, कारण दुसऱ्या दिवशी अस्थी नेण्यासाठी त्यांचीच मदत लागणार असते.

स्मशानात जाण्याचा  अनुभव माणसाने जिवंतपणी घ्यावाच म्हणजे आपण मेल्या नंतरचे दृष्य तो मनोमन बघू शकेल. मृत्यू बद्दलची भीती सुद्धा कमी होण्यास मदत होईल.

कोणत्याही माणसाचे एकदा प्राण गेले कि त्याची सर्व ओळख एक क्षणात पुसली जाते.  त्याला बॉडी म्हणून संबोधले जाते. बॉडी खरेतर इंग्लिश शब्द आहे. पण प्रेत हा शब्द फार कमी वेळा बोलला जातो. शिकलेला – न शिकलेला त्याला बॉडी म्हणूनच ओळखतात. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी व ती ओळख जगाने  मानण्यासाठी तो माणूस आयुष्यभर जीवाचा आटापिटा करत असतो. परंतु एक क्षणात सर्व संपते. त्याचा देह नष्ट होण्याआधी त्याची बॉडी झालेली असते.

मृत्यूच्या वेळी कोणते नक्षत्र लागले हे गुरुजी बघणार व त्याप्रमाणे विधी ठरणार. गुरुजींना विधीसाठी स्मशानात या अशी विनंती करायच्या वेळी सुद्धा अनेक मजेशीर अनुभव येतात. बरेच वेळा त्यांचा पहिला प्रश्न असतो कि पुढील दिवसांचे विधी कोण करणार? ते कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल तर स्मशानातील विधी करण्याची फी कमी घेतली जाते.  एकदा एक गुरुजी हटूनच बसले. मी त्यांना सांगितले  कि मी मयत माणसाचा शेजारी आहे व पुढील विशींसाठी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तुम्ही  आत्ता स्मशानात  जे विधी करायचे आहेत त्याची फी सांगा. कसेबसे मी त्या गुरुजींना स्मशानात येण्यास भाग पाडले.

जेव्हा स्मशानात एकही प्रेत आलेले नसते, तेव्हा तेथे निरव शांतता असते. हल्ली साधारणपणे स्मशानात बसायची सुद्धा चांगली सोय केलेली असते. एक दिवस मी स्मशानात बॉडी येण्याआधी पोचलो व थोडावेळ त्या परिसरात मी एकटाच शांतपणे बसलो होतो. खूप भारी वाटले. त्याच वेळी ह्या विषयावर एक दिवस लिहिले पाहिजे असे ठरवले. तो योग्य दिवस आज आला. आता माझी बॉडी कधी स्मशानात जाईल ह्याची मी वाट बघतोय. काय दचकायला काय झाले. तेच तर अंतिम सत्य आहे.

माणसाचा चंदनाशी फार जवळचा संबंध आहे. प्रत्येकाच्या घरातील देव्हाऱ्यात चंदनाचे  खोड असते. देवाला गंध लावल्याशिवाय पूजा होऊ शकत नाही. मरणानंतर चंदनाची थोडी तरी लाकडे चितेवर ठेवतात.

मरणाचा विषय निघालाच म्हणून सांगतो कि चितेसाठी लाकडे वापरणे बंद केले पाहिजे. अशीही विकासासाठी जंगल तोड चालूच असते. निदान आपण तरी हा प्रश्न आपल्यापरीने हलका करायचा प्रयत्न करूया. एकतर देहदान करूया नाहीतर इलेक्ट्रिक Furnace चा वापर करूया.

देहदानाकरता उपयुक्त पत्ते अथवा दूरध्वनी क्रमांक: http://bit.ly/oNWJF5

लेख फारच लांबला. जेव्हा ह्या विषयावर लिहिले पाहिजे असे वाटले तेव्हा ह्याची कल्पना नव्हती. 🙂


सुधीर वैद्य

०९-१२-२०१७

Advertisements

0 Responses to “५५३) स्मशान यात्रा (Funeral)….. ”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: