Archive for December 8th, 2017

५५२) सुखाची किंमत 

549) Judjement - 2

 

५५२) सुखाची किंमत 

प्रत्येक जण सुखाच्या शोधात असतो. पण खरे सुख म्हणजे आहे? कोठे मिळेल? कधी मिळेल? त्यासाठी काय करावे लागेल? ह्यातील एकही प्रश्नाचे समर्पक उत्तर आपल्यापाशी नसते. आपण सुखाकडे एकाच बाजूने बघून बघतो. सुखाची  दुसरी बाजू आपल्याला विचारात घ्यायची नसते.

सुख आणि दु:ख ह्या एकाच नाण्याच्या दोन  बाजू आहेत. नाण्याची कड म्हणजे आपले नशीब. सुख आणि दु:ख एकमेकांशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. ह्या जगात काहीच चिरकालीन (पर्मनंट) नसते.

जगात फुकट काहीच मिळत नाही. जन्माबरोबर नाती मात्र फुकट मिळतात आणि शक्यतो निभवावी लागतात. प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावी लागते – कधी पैशाच्या रूपात तर कधी इतर गोष्टींनी.

भौतिक सुखाची साधने आपल्या मनाला सुख देतात, पण ते चिरंतन नसते. त्या सुखाची किंमत आपण पैशात मोजलेलीच असते. पण त्याचे इतरही काही परिणाम आपल्या लगेच लक्षात येत नाहीत. प्रत्येक सुखात एक दु:ख दडलेले असते. सुखाबरोबर ते फुकट मिळते. नको म्हणून चालत  नाही, घ्यावेच लागते.

सुख मागून मिळत नाही व दुःख न मागता सुद्धा मिळते. कारण देवाला आपली गरज आपल्यापेक्षा जास्त चांगली माहीत असते.

ज्या माणसाला सुखाची किंमत ओळखता येतो तो भौतिक सुखाच्या मागे स्वत:ची फरफट करून घेणार नाही. बघा विचार करून.
सुधीर वैद्य

०८-१२-२०१७

Advertisements

Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements