५४९) मत – Judgment

549) Judjement - 2        549) Judjement - 1

५४९) मत – Judgment

आयुष्यात अनेक वेळा आपण समोरच्या माणसाबद्दल मत प्रदर्शन करत असतो. समोरचा माणूस जेव्हा प्रथमच आपल्याला भेटतो, तेव्हा त्याच्या बाह्य रुपावरुन,   देहबोलीतून, त्याच्या कपड्यांवरून आपण मनातल्या मनात त्याच्या बद्दल एक प्रतिमा तयार करतो व आपली पहिली प्रतिक्रिया देतो.

जेव्हा संवाद वाढतो, विचारांचे आदान  – प्रदान होते, तेव्हा आपले प्रथम मत बदलू लागते.  काही वेळा तो माणूस प्रत्येक भेटीत वेगळा भासू लागतो व आपण चक्रावतो, काही वेळा असे होत नसताना सुद्धा आपली त्या माणसाच्या बाबतीतील  मते विनाकारण  / काही कारणांमुळे बदलत असतात.

अर्थात हि सगळी कसरत चाललेली असते ती केवळ काही तर्कावर, अश्याच प्रकारच्या अनुभवावर. त्यामुळेच हि मते बदलत राहतात.

आपण जेव्हा म्हणतो कि मी अमुक माणसाला ओळखतो. कधी विचार केला आहे कि ह्याचा नेमका अर्थ काय ? आपण किती टक्के त्या माणसाला  ओळखतो? ह्या प्रश्नाचे उत्तर आत्मविश्वासाने आपण देऊच शकत नाही, कारण खऱ्या अर्थाने आपण त्याला ओळखतच  नसतो. त्याची बाजू, त्याला आलेले अनुभव, त्याची जडण घडण आपल्याला माहित नसते.

त्या माणसाने अंगिकारलेल्या निर्णयावर भाष्य करण्यापूर्वी विचार करा. त्याच्याकडे नेमके कोणते पर्याय होते ह्याची माहिती तुम्हाला सर्वार्थाने असणे शक्य नाही. त्याच्या पूढे नेमके कोणते विकल्प होते? हे सुद्धा आपल्याला माहित नसते. त्याची कारण मीमांसा आपण कशी बरे ओळखणार ? आपण त्याच्या भूमिकेत शिरू शकलो तरच कदाचित आपल्याला हे कळेल. त्याच्या सर्व बलस्थानांची  व कमजोर स्थानाशी आपली ओळख असेल असे नाही. त्याने उराशी बाळगलेली स्वप्ने, निराशा,  त्याच्या

मनातील – हृदयातील नेमक्या भावना आपण कसे बरे ओळखणार? काळजावर दगड ठेवून त्याने असे वागणे / बोलणे / दिसणे अंगिकारले असेल, ह्याची कल्पना आपल्याला असेल का?

त्यामुळे अश्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे समोरच्या बद्दल मत प्रदर्शन करताना विचार करा. आपण स्वत: परफेक्ट आहोत का? दुसऱ्याच्या भूमिकेत आपण शिरू शकतो का? तेव्हडी आपली कुवत आहे का?

विषयाचा आवाका खूप मोठा आहे. काही लोकांना समोरच्या बद्दल मत देण्याची फार घाई असते. परंतु आपल्या अपरिपक्व मत प्रदर्शनाने समोरचा दुखावला जाणार नाही ह्याची काळजी घेणे हि तुमची जबाबदारी आहे असे मला वाटते.

सुधीर वैद्य

०४-१२-२०१७

Advertisements

0 Responses to “५४९) मत – Judgment”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s




Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: