५४६) मागे वळून बघताना …. (Looking Back)

490-wood-1

sunset-1

५४६) मागे वळून बघताना …. (Looking Back)

प्रस्तावना 

माझ्या आत्मचरित्रात आयुष्यातील काही व्यक्तिगत आठवणी  मुद्दामच शब्दबद्ध केल्या नव्हत्या, कारण वाचताना त्याचे महत्व वाचकाला चटकन कळले नसते. आणि मुख्य म्हणजे माझ्या सारख्या नवशिक्या लेखकाला हे जमलेही नसते. परंतु वेळोवेळी अश्या काही घटना घडल्या आणि त्यानंतर मी त्या आठवणीना माझ्या अनेक लेखात शब्दबद्ध केले.  अश्याच  काही लेखांचे संकलन ह्या पुस्तकात केले आहे.

प्रत्येक लेखात एक – दोन घटना, माणसे, काही विचारधारा, त्यावेळी मला पडलेले प्रश्न असतील. त्यावर माझे भाष्य असेल – त्या परिस्थितीनुसार. त्या वयात उमजलेले व काही काळानंतर परिपक्व झालेले. ते भाष्य कदाचित वाचकांना पटेल किंवा पटणार नाही. परंतु माझे विचार मात्र माझ्यासाठी बरोबरच असतील. ती घटना – ते विचार – माझे भाष्य पटले तर ठीक, नाहीतर वाचकांनी निदान माझ्या भूमिकेतून विचार करावा एव्हडीच अपेक्षा.

माझी अशी विनंती आहे कि दोन – चार लेख वाचून माझे व्यक्तिमत्व कळेल असे अजिबात नाही. सर्व लेख वाचल्यानंतर माझी थोडीफार ओळख मात्र नक्की होईल ह्याची  मला खात्री आहे.

मित्रानो, हे लेख म्हणजे काही माझे संपूर्ण आयुष्य नाही. ह्याच्या पलीकडे अश्या अनेक गोष्टी आहेत त्या नेमक्या सांगताही येणार नाहीत आणि दुसऱ्याला सांगून त्याचा उपयोगही नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक कप्पा असतो आणि त्यातील आठवणी त्या माणसाबरोबरच संपतात. असो.

हे पुस्तक आवडले तर मित्रांना जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला आवडतील.

सुधीर वैद्य

२१-११-२०१७

Advertisements

0 Responses to “५४६) मागे वळून बघताना …. (Looking Back)”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s




Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: