Archive for December 6th, 2017

५५०) Pro Active – स्वयंप्रेरित

550) proactive - 1

 

550) proactive - 2

५५०) Pro Active – स्वयंप्रेरित

प्रत्येक माणसाची वर्तणूक हा खरेतर संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक माणसाचे दुसऱ्याबरोबरचे वागणे सारखे तर नसतेच, पण एकसारखे सुद्धा नसते.

Pro Active म्हणजे स्वयंप्रेरित. जन्मापासून अनेक नाती निर्माण होतात. काहींच्या बरोबर आपले सूर जुळतात तर काहींच्या पासून आपण दोन हात लांबच राहतो. ह्या जीवन प्रवासात आपल्याला अनेकांची मदत लागते / मदत होते. काही जण प्रेमापोटी – कर्तव्यापोटी अशी मदत करतात. ह्याचे स्मरण अनेकवेळा मोठेपणी राहत नाही. अनेक वेळा अनेक जणांना समोरच्या माणसाने आपल्याला हवी असलेली किंवा अपेक्षित असलेली उत्तरे द्यावी अशी अपेक्षा असते. परंतु प्रत्येक वेळी हे शक्य नसते. काहीवेळा जवळची माणसे – नातेवाईक – मित्र न विचारता सुद्धा आपल्याला सल्ला देतात. हा सल्ला जर आपल्या अपेक्षेत बसणार असेल, तर आपण त्याचे स्वागत करतो. परंतु जर हा सल्ला आपल्या अपेक्षेत बसणारा नसेल, तर मात्र आपण त्या माणसापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

इथेच आपली चूक होण्याची शक्यता असते. हा अप्रिय सल्ला त्या माणसाने आपल्याला दुखावण्यासाठी दिलेला नसून, आपल्यावरील प्रेमापोटी व आपले नुकसान होऊ नये म्हणून दिलेला असतो. त्या सल्ल्याचा परिणाम आपल्यासाठी श्रेयस्कर असतो.

जी माणसे शिकलेली आहेत, ज्यांना तुमची खरी ओळख आहे, तुमचा स्वभाव माहित आहे, तुमच्यावर आत्यंतिक प्रेम आहे व तुमचे भले व्हावे अशी प्रामाणिक ईच्छा आहे तेच लोक असा श्रेयस्कर पण तुम्हाला अप्रिय वाटणारा Pro – Active सल्ला देतात. त्यांना तोंडावर गोड बोलणे जमत नाही. तुमच्या स्वप्नातील पुढील खाच खळगे त्यांना दिसतात आणि म्हणूनच ते योग्य असा सल्ला देतात. तुमचा विरोध त्यांना अपेक्षित असतो. त्याचे तुम्ही स्वागत केले पाहिजे. आपल्या समस्येकडे / स्वप्नाकडे पुन्हा एकदा गांभीर्याने बघितले पाहिजे.

शेवटी निर्णय हा तुम्हीच घ्यायचा असतो. परंतु पुढे भविष्यात समस्या आल्यानंतर अनेक वेळा अश्या माणसाला विचारले जाते कि त्या वेळी तुम्ही गप्प का बसलात? अश्यावेळी आपल्या भूकाळातील वागण्याचे विश्लेषण करा. तो माणूस गप्प बसल्यामुळे नुकसान तर तुमचेच झाले ना !

Pro – Active सल्ला देणारी माणसे अनेकवेळा नाकारली जातात – कुटुंबात , समाजात, नोकरी / व्यवसायात सुद्धा. मित्रानो. अशी माणसे ओळखा आणि त्यांना मित्र करा. तुमचाच फायदा आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

सुधीर वैद्य

०६-१२-२०१७

Advertisements

Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements