Archive for December, 2017

५५९) आज झालो मुक्त मी …

Freedom       559) Shoulder Immobiliser - IMG_0068

५५९) आज झालो मुक्त मी  …

८ नोव्हेंबर २०१७ रोजी मला अपघात झाला व उजव्या हाताच्या हाडाला fracture झाले. ६ ते ८ आठवडे खांदा immobilizer मध्ये बांधून ठेवण्यास सांगण्यात आले. आज दीड महिन्यानंतर x-ray काढला. हाड पूर्णपणे जुळले आहे. आता physiotherapy चे व्यायाम सांगितले आहेत. अजून दीड महिना गोळ्या घेतल्यानंतर परत एकदा  x-ray  काढावा लागेल.

आनंदाची बातमी म्हणजे आजपासून माझी shoulder immobilizer पासून मुक्तता झाली. गेले दीड महिना माझा उजवा हात जखडलेला होता. सर्व कामे डाव्या हाताने करत होतो. उजव्या हात १९९६ साली बस दरीत पडल्यामुळे fracture झाला होता. त्यावेळेपासून अनेक कामे डाव्या हाताने करायची सवय लागली होती. ती सवय  उपयोगी पडली.

गळ्यातील पट्ट्याची फार अडचण होत होती. झोपताना सुद्धा हात जखडलेलाच असे. गेले ते दिवस. परंतु विवाहित बायका कसे दिवसभर मंगळसूत्र घालतात / सहन करतात, ती सहवेदना जगता आली. माझी छोटीशी कुत्री ‘ सोनी ‘ गळ्यातील पट्ट्यामुळे कशी हैराण होत असे हे मला आठवले. कित्येक वेळा मी तो पट्टा काढून तिला सुटी ठेवत असे. त्यावेळी तिला जसा आनंद होत असे त्याची अनुभूती  मी आज घेतली.

फेसबुकमुळे दुखण्याचा मला विसर पडला. माझ्या पत्रिकेतील  रवी – मंगळ युती प्रत्येक समस्येत  मला अधिक strong बनविते ह्याचे  परत एकदा प्रत्यंतर आले. माझी बायको तर माझ्या मागे नेहमीप्रमाणे उभी होती. तिचे आभार किती मानू?

आज पासून उजव्या हात सुद्धा संगणक वापरण्यासाठी दिमतीला आला आहे. धन्यवाद मित्रानो.

सुधीर वैद्य 

२३१२२०१७

Advertisements

Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements