५४२) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१७ / २७-०८-२०१७

542) unch maza zoka - 1     542) Uncha Maza Zoka_2

५४२) उंच माझा झोकापुरस्कार सोहळा २०१७ / २७०८२०१७

झी टीव्ही वरील उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१७ बघून मन प्रसन्न झाले, पण त्याचबरोबर मन अंतर्मुखही झाले. कार्यक्रमाचे  सादरीकरण – निवेदन उत्तम होते.

ह्या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष. ह्या स्त्रियांचा गौरव करून समाजाचा पाठींबा त्यांच्या मागे उभा करून त्यांना आपले  कार्य अधिक जोमाने करण्यास बळ मिळेल ह्यात शंकाच नाही.

यशस्वी स्त्रियांच्या कहाण्या आणि कार्य बघून स्त्रीशक्तीचा अभिमान वाटला. अश्या ध्येयवेड्या स्त्रिया आणि त्यांना साथ देणारे पुरुष समाजात आहेत म्हणून आज आपला समाज जिवंत आहे.

यशाच्या शिखरावर असलेल्या ह्या स्त्रियांचे पाय जमिनीवर होते. यश पचविणे हि काही सोपी गोष्ट नाही. विशेष म्हणजे ह्या स्त्रियांनी मिळवलेले यश हे आपले एकटीचे नसून ह्या कार्यात साथ देणाऱ्या कुटुंबाचे, गुरूंचे, सहकाऱ्यांनी  दिलेल्या पाठींबा, मदत ह्यामुळे शक्य झाले हे आग्रहाने नमूद केले. चित्रपट सृष्टीतील  पुरस्कारात हि भावना फारशी आढळत नाही. असो.

कार्यक्रमाची सुरवात देवकी पंडित ह्याच्या सुश्राव्य गायनाने झाली. उमेश कामत आणि प्रसाद ओक ह्यांनी सूत्र संचालन छान केले. अश्या कार्यक्रमात नाच नसता तरी चालले असते. नाच नसल्यामुळे TRP मध्ये काहीही फरक पडला नसता, असे माझे मत आहे. कार्यक्रमातील इतर कलाविष्कार (नाट्य प्रवेश, कविता वाचन, किर्तन) कार्यक्रमाशी सुसंगत आणि रंजकता वाढविणारे होते.

हा कार्यक्रम झी टीव्हीने परत परत दाखविला पाहिजे. ह्या कार्यक्रमाच्या CD शहरातील शाळेतील सुखवस्तू मुला – मुलींना दाखविल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना आपल्या देशाची खरी ओळख होण्यास मदत होईल. जो पर्यंत पांढरपेशा समाजाच्या मनाला  ‘नाही रे’ गटाची दु:खे – समस्या भिडत नाहीत, तो पर्यंत तळागाळाचा पूर्णपणे विकास साधणे कठीण आहे.

स्त्री खरेतर व्यवस्थापन गुरु असते, परंतु मोकळेपणाने पुरुष हे मोठेपण उघडपणे मान्य करत नाहीत, हि वस्तुस्थिती आहे. मुलीला परक्याचे घन म्हणून घडविताना तिला माणूस  म्हणून सुद्धा  घडवले पाहिजे ह्याची जाण पालकांना अधिक प्रमाणात झाली व त्याचबरोबर मुलींना आपला आतला आवाज ओळखण्याची / व्यक्त करण्याची मुभा मिळाली, तर समाजाच्या प्रगतीसाठी हा शुभसंकेत असेल.

मिडिया एकाचवेळी मनोरंजन आणि समाज प्रबोधन करू शकतो, हा धडा झी टीव्हीने घालून दिला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ह्या सर्व यशस्वी स्त्रीयांना मानाचा मुजरा.  इतर स्त्रियांसाठी व पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी, ह्या कहाण्या प्रेरणादायी ठरतील असा मला विश्वास वाटतो.

सुधीर वैद्य / २८०८२०१७

0 Responses to “५४२) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१७ / २७-०८-२०१७”



  1. Leave a Comment

Leave a comment




Archives

September 2017
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.