१४४) ही “श्री ” ची इच्छा / डॉ श्रीनिवास ठाणेदार

144) Photo5355

१४४) ही “श्री ” ची इच्छा / डॉ श्रीनिवास ठाणेदार / शब्दांकन शोभा बोन्द्रे / मॅजेस्टिक प्रकाशन / आत्मचरित्र / पृष्ठे १९७/ रुपये १५० /- सहावी आवृत्ती ऑक्टोबर २००५. 

माणसाला यश हवे असेल तर त्यासाठी प्रकर्षाने ईच्छा असणे गरजेचे आहे व त्याच बरोबर प्रयत्न करणे आवश्यक आहे. हि शिकवण  हे पुस्तक आपल्याला देते.

लेखक बेळगाव येथून ५५ % मार्क मिळवून मॅट्रिक होतो, पण त्यानंतर अविरत श्रम आणि इच्छा शक्तीच्या जोरावर डॉक्टर होतो. अमेरिकेत  उद्योग सुरु करून त्यात यशस्वी होतो व अनेक पुरस्कार सुद्धा मिळवतो.

शोभा बोन्द्रे ह्यांनी सुरेख  शब्दांकन केले आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना लेखकाच्या जडण घडणीत आपण गुंतत जातो.

एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा लेखक आयुष्यात खूप मोठी उंची गाठतो, परंतु त्याच वेळी वैयक्तिक आयुष्यात मात्र काही काळ त्याला खूप कठीण जातो. व्यवसायात क्लायंटच्या समस्येची लीलया उकल करणारा लेखक, आपल्या वैवाहिक आयुष्यातील उकल करण्यास असमर्थ ठरतो. बायकोने आत्महत्या केल्यानंतर त्यामागील नेमके कारण उलगडते. त्यावेळी लेखकाची दोनीही मुले लहान असतात. आईच्या मायेने त्यांना तो मोठे करतो. व्यवसायाकडे थोडे दुर्लक्ष होते. परंतु  परत एकदा तो विवाहाचा घाट घालतो आणि त्यानंतर व्यवसायात नवीन उंची गाठतो.

हे पुस्तक प्रत्येक वाचकासाठी काही ना काही देते. अभ्यास कसा करावा / कसा केला पाहिजे ह्याची शिकवण विद्यार्थ्यांना मिळेल. व्यवसाय कसा वाढवावा / ग्राहकांचा विश्वास कसा संपादन करावा ह्याची शिकवण व्यवसाय करण्याऱ्या मंडळींना उपयोगाची आहे. व्यवसायात यशाच्या टोकावर असताना मालकाने नेमके कसे वागले पाहिजे व व्यवसायावर कसे लक्ष ठेवले पाहिजे ह्याचा मूलमंत्र लेखक आपल्या बरोबर share  करतो. आयुष्य कसे जगले पाहिजे ह्याची दृष्टी आपल्याला देतो.

पुस्तक वाचताना आपण लेखकाच्या भावनांशी  कधी एकरूप होतो, हे आपल्याला कळत नाही. जरा प्रतिकूल परिस्थिती वाट्याला आली तर हादरणारे आपण, लेखकाचा खंबीरपणा बघून अचंबित होतो.

बरेच दिवसांनी खूप प्रेरणादायी पुस्तक वाचून मन तृप्त झाले. सुंदर शब्दांकन केल्याबद्दल शोभा बोन्द्रे यांचे अभिनंदन.

मित्रानो, वेळात वेळ काढून हे पुस्तक वाचा. आपला वेळ सत्कारणी लागेल ह्याची मी खात्री देतो.

पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक आहे व लेखकाच्या आयुष्यातील प्रमुख कालखंड सुंदर रीतीने चित्रांकित केले आहेत.

सुधीर वैद्य

०२-०१-२०१७

Advertisements

0 Responses to “१४४) ही “श्री ” ची इच्छा / डॉ श्रीनिवास ठाणेदार”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

July 2017
M T W T F S S
« Jun    
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: