Archive for July 11th, 2017

छत्री – एक बाळगणे

Umbrella

छत्रीएक बाळगणे

आज सकाळी फिरायला बाहेर पडलो. रात्रभर पाऊस पडून गेला होता. खरेतर पुढील तासभर पाऊस पडेल अशी शक्यता नव्हती. पण माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे मी छत्री घेऊन निघालो.

रस्त्यात नेहमी सकाळी भेटणाऱ्या गृहस्थाने विचारले की आज पण छत्री बाळगताय? मी म्हणालो की हो, कारण मग पावसाला पडावेसे वाटले तर उगाच माझा विचार त्याला करावा लागणार नाही? माझ्या मुळे बिचाऱ्या पावसाची पंचाईत नको. उत्तर ऐकून तो पसार झाला.

अपेक्षा नसताना सुद्धा पावसाची एक जोरदार सर आली. मी छत्री उघडून चालू लागलो आणि तो इसम आडोसा शोधत होता. असो.

आपण आयुष्यात कितीतरी गोष्टी बाळगत असतो.(उ.ह. आपला अहंकार, आपला स्वभाव, आपल्या शिक्षणाचा तोरा, आपली श्रीमंती, आपली दु:खे, आपला आनंद, आपल्या कुटुंबाची मर्जी वगैरे.) ह्यात एका छत्रीची भर पडली तर बिघडले कोठे?

अजून पावसाळा संपला नाहीये. मग काय छत्री बाळगताय का नाही?

 

Sudhir Vaidya

Advertisements

Archives

July 2017
M T W T F S S
« Jun   Aug »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.