५३३) Jettison clause आणि म्हातारपण 

533) Jettison clause - 1

533) Cargoship - 1            533) Cargoship - 2

५३३) Jettison clause आणि म्हातारपण 

जेट्टीसन clause हि मरीन इन्शुरन्स मधील एक महत्वाची टर्म आहे. ह्याचा सोप्या भाषेत अर्थ सांगायचा  म्हणजे जेव्हा मालाची वाहतूक करणारे जहाज समुद्री धोक्यांमुळे बुडण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा जहाजावरील माल  समुद्रात फेकला जातो, जेणेकरून वजन कमी झाल्यामुळे जहाज / इतर सामान वाचू शकेल.

ज्याचे सामान समुद्रात फेकले जाते, त्याला इतर जणांकडून नुकसान भरपाई दिली जाते.

मित्रानो, ह्या लेखाचे शीर्षक बुचकळ्यात टाकणारे आहे असे सुरवातीला तुम्हाला वाटले असेल, पण कदाचित Jettison clause ह्याचा अर्थ सांगितल्यावर तुम्हाला अंदाज आला असेल.

आपले आयुष्य म्हणजे सुद्धा समुद्रसफरीवर निघालेले जहाजच असते. लहानपणापासून वारेमाप गोष्टी आपण जमवत असतो – भौतिक आणि मानसिकसुद्धा. असंख्य भावना, राग, लोभ, व्देष, कॉम्प्लेक्स, तुलना, आसक्ती, सुडाची भावना. नात्यांचा गोतावळा, मित्र परिवार, मी पणा, इगो वगैरे. (हि जंत्री कितीही लांबू शकेल) खाण्या – पिण्याच्या सवयी तर डोईजड झालेल्या असतात. संयम आणि निग्रह पाळणे कठीण होऊन बसलेले असते. एव्हडे वजन घेऊन म्हातारपणात जगणे डोईजड झाले नाहीतरच  नवल.

ह्या साठी म्हातारपणी आसक्ती कमी झाली पाहिजे. विकारांपासून मुक्त झाले पाहिजे. ‘ मीपण ‘ गळून गेले पाहिजे. भूतकाळाचे ओझे फेकून देता आले पाहिजे, वर्तमानात जगात आले पाहिजे. भविष्याच्या चिंतेपासून मुक्ती मिळाली पाहिजे. मला कल्पना आहे हे सांगणे सोपे आहे. हे सर्व जर प्रत्यक्षात करता आले तरच आयुष्यातील संध्याकाळ मजेत जाईल. हे शक्य होऊ शकेल, जर ह्याचा अभ्यास आणि मनोभूमिका तरुणपणी तयार झाली असेल तरच. असो.  बघा विचार करून.

एव्हाना जर माझा मुद्दा / लेखाचा विषय ह्यावर तुम्हाला विचार करावासा वाटला असेल, तर हा लेख लिहिण्याचे माझे श्रम सार्थकी लागले असे मला वाटेल.

सुधीर वैद्य

०६०७२०१७

Advertisements

0 Responses to “५३३) Jettison clause आणि म्हातारपण ”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

July 2017
M T W T F S S
« Jun    
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: