Archive for June 15th, 2017

प्रतिबिंब

Reflection in water

प्रतिबिंब

काल रात्री बऱ्यापैकी पाऊस पडला. सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेलो असता रस्त्यात छोटी छोटी तळी तयार झाली होती. सुर्य लाजत लाजत, ढगांशी लपंडाव खेळत आज दर्शन देऊ का नको अशा मूड मध्ये होता.

अश्याच एका तळ्यात आकाशाचे – झाडाचे प्रतिबिंब पडले होते. बायकोने माझ्याकडे बघितले. तिचे डोळे मला सांगत होते कि झाले तुझे समाधान ? तुला सकाळची फेसबुक पोस्ट मिळाली ना ?. मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. शांतपणे mobile काढला आणि प्रतिबिंबाचा मस्त फोटो काढला.

एखादेवेळी आपणही आयुष्याचे प्रतिबिंब बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप छान वाटते असा माझा अनुभव आहे.

आजचा दिवस तुम्हा सर्वाना सुखाचा, समाधानाचा, मन:शांतीचा जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Advertisements

Archives

June 2017
M T W T F S S
« Apr   Jul »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.