५१९) आज जागतिक महिला दिवस (०८ मार्च २०१७)

५१९) आज जागतिक महिला दिवस (०८ मार्च २०१७)

वैद्यांच्या सुधीरचा समस्त महिला परिवाराला सप्रेम नमस्कार.

माझ्या विवाह बंधन ह्या पुस्तकातील काही विचार. 

१) एका मर्यादे पर्यंत पुरुषांना बायकांची भावनिक गुंतवणूक आवडते. पण त्याचा अतिरेक होता कामा नये. कुठे -कधी – कसे थांबावे (व्यापक अर्थ अपेक्षित) हे जर स्त्रीला कळले, तर वैवाहिक जीवनात प्रश्नच निर्माण होणार नाहीत.

२) बायकांनी सुद्धा नोकरी करत नसल्यास, स्वत:चे विश्व निर्माण केले पाहिजे. छंद निर्माण केले पाहिजेत. वाचनासारखा चांगला मित्र नाही. वाचाल तर वाचाल. !!!!! दोघांनी एकमेकाना space देणे आवश्यक आहे.

३) नवरा-बायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम – खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात, तर space न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात. बघा विचार करून.

४) स्त्रियांनी खालील वाक्याचा मनापासून विचार करावा हि विनंती.

A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she’s happy and laughs when she’s afraid. Her love is unconditional!! There’s only one thing wrong with her, she sometimes forgets what she is worth….

५) दुसऱ्याला प्रेमाने जिंकता येते असे म्हणतात. पण मला वाटते कि दुसऱ्याला डोक्याने सुद्धा जिंकता येते, कारण डोक्याच्या वापरात हृदयाचा विचार घेतला जातोच असे माझे मत आहे.

६) वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत तर ते प्रश्न विसरून जायचे असतात म्हणजे मनाला त्रास होत नाही. उत्तर वेळेवर मिळण्यात जी मजा आहे, ती मजा उत्तर ओरबाडून घेण्यात नाही.

७) मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा मनाचे मन व्हा आणि मनाची समजूत काढा म्हणजे सर्व गोष्टी सोप्या होतात.

८) संवाद करायला माणूस २ वर्षांचा असताना शिकतो. पण काय बोलावे , कसे बोलावे, काय बोलू नये वगैरे शिकायला कधी कधी एक जन्म सुद्धा अपुरा पडतो.

९) मन मारून काहीही करू नये. जे करायचे ते मनापासून आणि मनाचा कौल जाणून. जे आपल्या मनाला पटते तेच करावे, पण त्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

१०) चांगल्या शारीरिक आरोग्यासाठी आणि मनाच्या शांती साठी जिभेवर नियंत्रण हवे.

११) खऱ्या प्रेमात त्याग करायची तयारी असावी लागते. हिंमती शिवाय प्रेम सफल होत नाही.

१२) दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे.

जेव्हा नम्रता हि तुमची कमजोरी आहे, असा चुकीचा पवित्रा समोरच्या कडून घेतला जातो आणि तुम्ही गप्प बसता, तेव्हा नम्रता हा दोष ठरतो असे मला वाटते.

१३) चांगुलपणा बरोबर unpredictable पणा  जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात.

१४) संसाराच्या चक्रात अडकले तरी संसारात गुंतता कामा नये. कारण शेवटी संसार हा असार आहे.

१५) बिदाईच्या वेळी आपल्या माहेरच्या माणसांना सोडून जाताना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. पण गळ्यात पडून घाय मोकलून रडण्यासारखा हा प्रसंग आहे असे मला वाटत नाही . बऱ्याच लोकांना माझे म्हणणे पटणार नाही किवा पचवता येणार नाही याची मला कल्पना आहे . अश्या प्रसंगी रडणे म्हणजे सासरच्या मंडळींबरोबर व नवऱ्यावर  अन्याय करण्यासारखे आहे. आपले आयुष्य एका चाकोरीबद्ध रस्त्यावरून जाते, ज्यात लग्न हा एक महत्वाचा टप्पा असतो. लग्नानंतरहि माहेरचे नातेवाईक भेटणार असतातच. पूर्वी लहान वयात लग्ने  होत तेव्हा कदाचित हे रडणे योग्य वाटू शकेल.  पण हल्लींच्या काळात मुली शिकलेल्या असतात, चांगल्या वाईटाची त्यांना ओळख असते, त्यामुळे रडणे पटत नाही . असो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत.

१६) भांडणामुळे नवरा – बायकोचे नाते ताजे राहते. भांडणाचे सुद्धा एक शास्त्र आहे.

१७) ज्या वेळी महिलांना बरोबरीचा दर्जा खऱ्या अर्थाने प्राप्त होईल, त्या वेळी जागतिक महिला दिन साजरा करण्याची गरज भासणार नाही .

१८) नवरा – बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा करा. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार करा, पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व देऊ नका. अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार करा. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी कोणत्या अपेक्षा पूर्ण  करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण कराल याची कल्पना द्या.

१९) सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याग करायची तयारी आहे का ? असल्यास किती ह्याची सीमा रेषा आखा आणि त्याग करण्याची सवय अंगी बाणवा. त्यानंतरच लग्नाचा विचार करा.

२०) प्रत्येक प्रेम विवाह यशस्वी होत नाही कारण निर्णय बरेच वेळा फक्त चांगल्या बाजूचा विचार करून, बेनिफिट ऑफ doubt देऊन घेतलेला असतो. प्रेम जरी आंधळे असले तरी लग्नाचा निर्णय घेताना बुद्धी आंधळी होणार नाही ह्याची काळजी जरूर घ्या.

२१) जोडीदाराला गुण आणि दोषांसकट स्वीकारले तरच वैवाहिक आयुष्य सुखाचे जाते. अर्थात काही दोष स्वीकारण्याच्या पलीकडचे असतात हे मान्य करावेच लागेल.

२२) स्त्री हि खरेतर पुरुषा पेक्षा जास्त काटक  असते. स्त्री हि व्यवस्थापन गुरु असते. पण हि वस्तुस्थिती पुरुष मान्य करत नाहीत,  हे दुर्भाग्य आहे.

२३) खरेतर नवरा – बायकोनी  माप ओलांडून गृह प्रवेश केला पाहिजे, कारण कुटुंबाचे सुख , शांती आणि मर्यादा सांभाळण्याची  जबाबदारी दोघांची आहे .

२४) तुम्ही स्वत:ला सामान्य स्त्री का समजता ? मी साधी गृहिणी आहे असे तुम्ही का म्हणता? खरेतर साधी गृहिणी होणे हे खूप कठीण असते. कोणतीही स्त्री हि आद्य  management गुरु असते.
सुधीर वैद्य

०८-०३-२०१७

Advertisements

0 Responses to “५१९) आज जागतिक महिला दिवस (०८ मार्च २०१७)”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

June 2017
M T W T F S S
« Apr   Jul »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: