५१७) पुनर्विकास – चाय पे चर्चा

concept_aerial_housing_complex-400

५१७) पुनर्विकास – चाय पे चर्चा 

काल मी व माझे मित्र नेहमीच्या जागी भेटलो. गप्पांचा मस्तपैकी फड  जमला. चहाचा एक राऊंड पूर्ण होत आला. गप्पांची गाडी सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर म्हणजे पूनर्विकास ह्या विषयावर थांबली.

श्रीरंग टेंडरबद्दल काही माहिती देऊ लागला तेव्हड्यात रवी व सुरेश जॉईन झाले. सुरेश खाण्यातील दर्दी. त्याच्या कानावर टेंडर शब्द पडला आणि तो बोलून गेला कि टेंडर कोकोनट आईसक्रीम खाण्याचे बेत चालू आहेत का? ग्रुप मधील सर्व जोरात हसले. सुरेश एकदम कावरा बावरा झाला. मी म्हणालो कि तुला खाण्यापलीकडे कधी सुचते का रे? आम्ही पुनर्विकास ह्या जटिल विषयावर माहितीचे आदान प्रदान करत आहोत. तू सुद्धा ऐकून ठेव. पुढे मागे तुझ्या सुद्धा बिल्डिंगचा पुनर्विकास होईल, तेव्हा ह्या माहितीचा तुला उपयोग होईल.

मग आम्ही टेंडर बद्दल चर्चा केली. अनिकेतने विचारले कि सुधीर तू कधी ह्या विषयावर लिहिणार आहेस? मी म्हणालो कि बहुतेक एप्रिल २०१७ च्या अंकात लेख देण्याचा विचार आहे. फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकल्प सल्लागाराची निवड कशी करावी ह्या  विषयावर लेख प्रसिद्ध होईल.

मी मिलिंदला विचारले कि तुमच्या सोसायटीने टेंडर issue करून काही प्रतिथयश विकासकांकडून ऑफर मागविल्या होत्या, त्याचे काय झाले? विकासकांचा काय रिस्पॉन्स. मिलिंदच्या चेहऱ्याकडे बघून कळत होते कि काहीतरी गडबड आहे. मिलिंदने ग्लासातील चहा संपवला. मिलिंद म्हणाला कि आम्ही पेपर मध्ये टेंडरची जाहिरात न देता, काही प्रतिथयश विकासकांकडून ऑफर मागविल्या. सुरवातीला अनेक विकासकांनी आमच्या पुनर्विकासात रस दाखविला. परंतु चार  विकासक सोडून कोणीही ऑफर दिली नाही. आम्ही ह्या विकासकाचे  बरोबर चर्चा करू लागलो, आमच्या अपेक्षा सांगू लागलो. विकासकांना आमच्या कामात रुची आहे हे बघून आमच्या मागण्या वाढत गेल्या. सोसायटी मध्ये ग्रुप्स तयार झाले. मागणी पत्रकाबद्दल सर्वांचे एकमत होईना. शेवटी दोन विकासक उरले. फायनल चर्चेसाठी दोघांना बोलावण्यात आले. त्यातील एकजण आलाच नाही, तर दुसऱ्याने आमच्या मागण्या पुरविण्यास नकार दिला. वर्षाहून अधिक काळ फुकट गेला.

मी म्हणालो कि हा वेळ फुकट नाही गेला. तुम्ही बरेच काही शिकलात. जर सर्वानी शांतपणे असे का झाले ह्याचे सिंहावलोकन केलेत तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल.

श्रीरंगने विचारले कि सुधीर तुला काय वाटते? युती तुटली आहे. ह्याचा परिणाम पुनर्विकासाच्या कामावर तर होणार नाही ना? विकास आराखड्याबद्दल काय बातमी?

मुंबईचा २०१४-३४ साठीचा मूळ विकास आराखडा २७ मे २०१६ ला प्रसिद्ध झाला.

ह्या आराखड्याला दोन वेळा (३१-१२-२०१६ आणि १५-०१-२०१७ पर्यंत ) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.  १४००० हरकती आणि सूचनांची सुनावणी १५ डिसेंबर २०१६ ला पूर्ण  झाली आहे.  मुंबईचा २०१४-३४ चा विकासआराखडा राज्य सरकारला सादर करण्यासाठी तिसऱ्यांदा ७ मार्च २०१७ पर्यंत   मुदत वाढ देण्यात आली आहे.

हा प्रस्ताव महापालिका सभागृहात गुरुवारी २२-१२-२०१६ रोजी मंजूर करण्यात आला.

त्यानंतर नगरविकास खाते विकास आराखडा मंजुरीचा निर्णय घेईल. ह्यासाठी किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण आहे.

निवडणुकीचा निर्णय २३ फेब्रुवारी २०१७ ला लागेल. बरेच काही कोण जिंकणार – कोण हरणार ह्यावर अवलंबून राहील. जोपर्यंत नवीन विकास आराखडा मंजूर होत नाही तो पर्यंत जुना विकास आराखडा १९९१-२०११ व नवीन आराखडा ह्यातील  ज्या तरतुदी stringent असतील, त्याचा विचार बिल्डिंगचा प्लॅन मंजूर करताना केला जाईल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या Dumping  केसच्या संदर्भातील निर्णयानुसार मुंबई उपनगरात नवीन बांधकामांना  ०१-०३-२०१६ पासून बंदी करण्यात आली आहे. ३०-०६-२०१७ नंतर सरकारने डम्पिंगच्या संदर्भात काय उपाययोजना कार्यान्वित केली आहे ह्याची माहिती मुंबई हायकोर्टात देणे अपेक्षित आहे. त्यानंतर कोर्टाला योग्य वाटल्यास बांधकामावरील बंदी  उठवली जाईल. ह्यामुळे ३०-०६-२०१७ पूर्वी प्लॅन सबमिट करण्यात काहीच अर्थ नाही.

ज्या सोसायटीचा अँप्रोच रोड ९ मीटर आहे अश्या सोसायटीला ह्याचा फटका बसू शकेल. कारण जुन्या विकास आराखड्यात अँप्रोच रोड ९ मीटर असेल तर सात मजल्यांची बिल्डिंग होऊ शकते. टॉवरसाठी कमिशनरची परवानगी घ्यावी लागेल. परंतु नवीन विकास आराखड्यात ७० मीटर बांधकामासाठी मंजुरी दिली आहे.

विमुद्रिकरणा नंतर Demonetization नंतर विकासकांच्या ऑफरचा अंदाज करणे कठीण आहे. १ फेब्रुवारी २०१७ ला अंदाजपत्रक सादर होणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून ४ किलोमीटर अंतरापर्यंत काही निर्बंध घातलेले आहेत. ह्या संदर्भात दिनांक   ६ डिसेंबर २०१६ रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तुमची  सोसायटी जर ४ किलोमीटरच्या परिसरात असेल तर उपाय शोधावा लागेल.

बांधकाम व्यवसायात मंदीचे वातावरण आहे. मुंबईत अंदाजे १ लाख घरे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत, असे वाचनात आले आहे.

देशातील मोठ्या ७ – ८ शहरांचा  विचार केला तर काही लाख घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

घराला मागणी नसेल तर त्याचा बांधकामावर परिणाम होतोच व पुनर्विकास प्रकल्प रखडतो.

जर सोसायटीने सध्याचा FSI  पूर्णपणे  / जवळ जवळ पूर्णपणे  वापरला असेल, तर विकास आराखड्यानुसार मिळणारा ०.५ % TDR सोसायटीच्या प्लॉटवर लोड करून मिळेल का? ह्याची खातरजमा MCGM कडून करावी लागेल. जर का प्लॉट मधील काही इमारती आधी पाडायच्या असतील तर असा TDR लोड करून दिला जातो, अशी माहिती माझा मित्र सांगत होता.  परंतु ह्या परिस्थितीत शिफ्ट न होता बांधकाम करायचे असेल तर TDR लोड करून मिळणार नाही, असेही तो म्हणाला.

ह्या सर्व माहितीची खातरजमा PMC कडून करून घेता येईल असे म्हणत असताना, माझा मोबाईल वाजला. मी म्हणालो कि मला निघाले पाहिजे. पुनर्विकासाचा विषय तसा अर्धवटच राहिला. परत काही दिवसांनी भेटण्याचे ठरवून आम्ही पांगलो.

सुधीर वैद्य

२७-०१-२०१७

Advertisements

0 Responses to “५१७) पुनर्विकास – चाय पे चर्चा”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

June 2017
M T W T F S S
« Apr   Jul »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: