Archive for June, 2017

५३१) निर्णय 

 

531) Decision making - 1

५३१) निर्णय 

आयुष्यात प्रत्येक वळणावर, प्रत्येक  दिवशी आपण निर्णय घेत असतो. खरेतर तर रोजच्या व्यवहारासाठी हि एकप्रकारची प्रतिक्षिप्त क्रियाच असते. त्यामुळे आपण निर्णय घेतोय असे आपल्याला वाटतच नाही.

काही गोष्टीं अश्या असतात कि आपण सर्वांगीण विचार करून निर्णय घेतो. उ.हा. नोकरी स्वीकारणे, नोकरी बदलणे, नोकरी सोडून व्यवसाय सुरु करणे, लग्न करणे, जागा घेणे – विकणे  वगैरे. खरेतर ह्या गोष्टींची  जंत्री खूप मोठी होऊ शकेल.

काही वेळा हे निर्णय बरोबर ठरतात, तर काही वेळा निर्णय चुकतात. निर्णय बरोबर निघाला कि आपल्याला खूप आनंद होतो. आपल्या हुशारीचे कौतुक वाटते. अभिमान वाटतो. आपण दुसऱ्या कोणाला सल्ला दिला असेल आणि तो सल्ला बरोबर निघाला, तर आपला आनंद गगनात मावत नाही.  काही वेळा निर्णय चुकतात आणि आपण निराश होतो. आपल्या नशिबाला दोष देतो. आपल्याला सल्ला  देणाऱ्या माणसाला दूषणे देतो. कधी त्याच्याशी अबोला धरतो.

माझ्या मते असे वागणे बरोबर नाही. प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. जय आणि पराजय ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या दोन्ही गोष्टी आहेत म्हणून तर जगण्यात गंमत आहे.

अनेक वेळा सर्वांगीण विचार करून निर्णय घेतला तरी परिस्थिती बदलते, नवीन जोखमी निर्माण होतात, सरकारची धोरणे बदलतात आणि आपला निर्णय चुकतो. ह्या गोष्टींचा आपण तेव्हा विचार केला नव्हता, कारण ह्या गोष्टी तेव्हा अस्तित्वात नव्हत्या. असा अनुभव व्यावसायिक मंडळींना बरेच वेळा येतो.

हीच ती वेळ असते स्वत:ला सावरण्याची, कर्म करत राहण्याची. नशिबाला दोष न देण्याची. तुमच्यासाठी देवाच्या मनात  दुसरा चांगला पर्याय असेल, असा विचार करण्याची.

बघा विचार करून.

सुधीर वैद्य

२८-०६-२०१७

Advertisements

Archives

June 2017
M T W T F S S
« Apr   Jul »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements