५१३) ती सध्या काय करते?

513-ti-sadhya-kay-karate

५१३) ती सध्या काय करते

ती सध्या म्हणजे नेमके ह्या घडीला काय करते असे विचारत असाल तर उत्तर देणे शक्य नाही. परंतु जर ती सध्या म्हणजे आयुष्यात काय करत असेल असे विचारत असाल तर उत्तर खूप सोपे आहे.

जर तिचे लग्न झाले नसेल तर एकतर ती स्वातंत्र्य एन्जॉय करत असेल किंवा उदास असेल.

जर तिचे लग्न झाले असेल तर एकतर ती सुखात असेल किंवा आयुष्य ढकलत असेल.

आहे त्या परिस्थितीत जुळवून घेण्याचा ती नक्की प्रयास करत असेल.

ती सध्या म्हणजे दिवसभर काय करत असेल? नेहमी प्रमाणेच.  सर्व स्त्रिया करतात तेच. म्हणजे?

घरकाम, नवऱ्याची – मुलाबाळांची सेवा करणे. त्यांना चांगले चुंगले खाऊ पिऊ घालणे. ह्या यादीत सुनेची – सासू – सासऱ्यांची भर पडू शकेल. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांच्यावर संस्कार  करणे, तरुण मुलीची काळजी करणे, करिअर मार्गदर्शन करणे, त्यांची वेळेवर लग्न जुळविणे, नातवंडे सांभाळणे, घरातील आजारपणे, आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर हे सर्व सांभाळून नोकरी/अर्थांर्जन  करणे वगैरे.

हि जंत्री कितीही लांबू शकेल. ह्या प्रवासात त्याची साथ असेल / नसेल.

प्रश्न हा आहे कि ह्या सर्व प्रवासात तुम्ही काय करताय?

प्रत्येक नवऱ्याने  आपली  बायको म्हणजेच ‘ती’ आणि बायकोने आपला नवरा म्हणजेच  ‘तो ‘ असे मानले तर असले फुटकळ प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत. 🙂

सुधीर वैद्य

०६-०१-२०१७

Advertisements

0 Responses to “५१३) ती सध्या काय करते?”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2017
M T W T F S S
« Dec   Mar »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: