५११) संध्याकाळ – चिंतन:

511-p1020754

५११) संध्याकाळचिंतन:

२०१६ वर्षाची आजची शेवटची संध्याकाळ. आपल्या अनेक जणांचे अनेक प्रकारचे , असंख्य क्षण (दु:खाचे, अपमानाचे, रागाचे, आनंदाचे, पराभवाचे, बदला  घेतला ह्या समाधानाचे, काळजीचे, तणावाचे, आश्चर्याचे, शांततेचे, हुरहूर लावणारे, पश्चातापाचे, वियोगाचे, विजयाचे, स्वप्न पूर्तीचे, लोभाचे, भांडणाचे, शरमेचे, वेदनेचे, प्रेमाचे,  लज्जेचे) पोटात घेऊन आजचा सूर्य आपला निरोप घेणार आहे.

सूर्य आपल्याला  सांगत आहे कि प्रामाणिकपणे कर्म करत राहा, स्व-धर्माचे पालन करा, कर्मकांडाच्या आहारी जाऊ नका  म्हणजे तुमची स्वप्ने नक्की साकार होतील.

प्रत्येक संध्याकाळ वेगळे रूप घेऊन येते. वर्ष अखेरची संध्याकाळ सुद्धा ह्या नियमाला अपवाद नाही. संध्याकाळ कधी तुम्हाला प्रसन्न करते, कधी उदास करते. कधी जुन्या पुराण्या आठवणी जागवते, कधी धीर देते, कधी रडवते, कधी उल्हास देते. खरेतर आपण जेव्हा संध्याकाळ अनुभवतो तेव्हा जगाच्या पाठीवर कोठेतरी रम्य पहाटेची चाहूल लागलेली असते. नवी पहाट – नवा दिवस उल्हास घेऊन येत असतो. हि सगळी रूपे आपल्या मनात असतात. आपल्या मनाचे खेळ असतात. नकळतपणे आपण ते खेळ खेळत असतो.

मित्रानो, फार विचार करू नका. हि कातरवेळ  अशीच  असते. अशावेळी फक्त स्वत:शी संवाद साधा. ईश्वराचे स्मरण करा. देवापुढे दिवा लावा आणि हात जोडा. दोन मिनिटे डोळे बंद करून ध्यान करा. दीर्घश्वास घ्या आणि परत एकदा अनुभवा तीच संध्याकाळ. किती छान वाटू लागेल बघा. अनुभव घ्याच.

मित्रानो, बदल हा निसर्गाचा नियम आहे. कोणतीच गोष्ट संपत नाही – त्याचा शेवट होत नाही. ज्याला आपण शेवट म्हणतो तेव्हा ह्या शब्दात नवीन सुरवातीच्या पाऊल खुणा दडलेल्या असतात. बघा विचार करून.

पुढील वर्ष  व त्यानंतरची सर्व वर्षे तुम्हाला आनंदाची,  मन:शांतीची, सुखासमाधानाची जावोत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य

३११२२०१६

Advertisements

0 Responses to “५११) संध्याकाळ – चिंतन:”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2017
M T W T F S S
« Dec   Mar »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: