४९८) इच्छा मरण / दया मरण / युथनेशिया

498-pope-john-paul-ii-600262

 

498-quote-not-all-moral-issues-have-the-same-moral-weight-as-abortion-and-euthanasia-there-may-pope-benedict-xvi-2-34-70

४९८) इच्छा मरण / दया मरण / युथनेशिया

वैद्यकीय अधिवेशनात  ‘दयामरण’ ह्या विषयावर हिरीरीने बोलले जाते. दयामरणाची

परवानगी मिळाली पाहिजे म्हणून अनेकांचा आग्रह सुद्धा असतो.  कशा प्रकारे ह्याची अंमलबजावणी  करता येईल ह्यावर मात्र एकमत होत नाही. अनेक लोक दयामरण हवे ह्या मताशी सहमत असतात पण मोकळेपणी कोणीच ह्या मताचा पुरस्कार करत नाहीत. हा विषय सरकारच्या विचाराधीन आहे.

युथनेशिया म्हणजे दयामरण. ‘मर्सी किलिंग’ ला कायद्याने आपल्या देशात मान्यता नाही. पण ती असती तर नि:स्वार्थी भावनेने त्याचे पालन होऊ शकेल का? मृत्यू म्हटला कि भय, दु:ख, वेदना काही टळत  नाहीत. जगण्यावरच अपरंपार प्रेम, मोह, वासना सुटत नाहीत. नकोशी झालेली शरीरंहि खितपत पडतात. वेदना, अपमान सहन करत राहतात मग अशांना शांत मरण द्याव अशा विचारांना चालना मिळते. आपणही स्वत:वर प्रसंग आल्यानंतर दया मरणाचा विचार करू लागतो.  पण उघडपणे ते विचार आपण बोलू शकत नाही.

संकुचित दृष्टीने जगणे आणि मरणे ह्याचा विचार केला, तर दयामरण आपण स्वीकारू  शकणार नाही.  जेव्हा मरण येत नाही म्हणून जगणे सुरु होते, तेव्हा असे जगणे त्या माणसासाठी आणि त्याच्या नातेवाईकांसाठी त्रासदायक होते.  अशा रोग्यांना दया मरण दिले पाहिजे असे त्या नातेवाईकांना व डॉक्टरना वाटणे स्वाभाविक आहे.

आयुष्यभर परोपकार करणाऱ्या डॉक्टरांचा हा वेगळ्या प्रकारचा परोपकारच असतो.

ह्या कृत्यात डॉक्टरांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसतो. डॉक्टरनी दया मरण सुचविलेले  रोगी  दुर्धर आजाराने बेजार असतात व  कोणताही वैद्यकीय उपचार त्यांना वाचवू शकणार नाहीत असे त्यांचे मत असते. त्यांचे जगणे त्या रोग्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरलेले असते. नातेवाईकांची मनाची तयारी पण असते. फक्त उघडपणे कोणी दया मरणाचा उपाय डॉक्टरना  सुचवत नाही. अशी काही उदाहरणे आपण ऐकतोहि.

काही वेळा ज्योतिषी मृत्युंजय जप करायला सांगतात. बरेच वेळा रोग्याची तब्बेत सुधारते किवा वरील प्रकारातील रोगी दगावतो.

माणसाला मरणाची नेहमी भीती वाटत असते. हे स्वाभाविकपण आहे. खरेतर हि भीती मरणाची असतेच, पण त्याहून जास्त भीती असते कि आपण लोळत पडणार का? आपली  सेवा कोण करणार? पत्नी आधी वारली असेल तर हि चिंता पराकोटीची असते. ह्यामुळेच ‘मरण’ हा शब्द उच्चारायला पण माणूस घाबरतो. विनोदाने बोलायचे तर आयुष्यात दोन गोष्टी नक्की आहेत, त्या म्हणजे मरण आणि कर. (Taxation)

आपले आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या मधील प्रवास आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. Pascal (तत्ववेत्ता) म्हणतो कि मृत्यू   नक्की आहे, फक्त वेळ अनिश्चित आहे. मग मृत्यूबद्दल काळजी करण्यात काय अर्थ आहे?

कै. विनोबा भावेनी आपल्या ‘भगवत गीता ‘ ह्या पुस्तकात मृत्यूबद्दल छान विवेचन केले आहे. माणसाला शांतपणे मरण येण्यासाठी ४ देवतांची कृपा आवश्यक  आहे.

१) Fire / अग्नी म्हणजे काम. माणसाने शेवटपर्यंत कार्यमग्न राहिले पाहिजे.

२) Moon / चंद्र म्हणजे चांगले, क्षमाशील मन असले पाहिजे.

३) Sun  / सूर्य म्हणजे सतत नवीन शिकणे. शिक्षणाचा / अनुभवाचा उपयोग लोकांसाठी करणे.

४) Space  /अवकाश म्हणजे वासना मेली पाहिजे. (detached attitude )

ह्या देवतांची मर्जी संपादन करण्यासाठी तरुण वयातच अभ्यास सुरु करावा लागेल. हा अभ्यास वाटतो तेव्हडा सोपा नाही. पूजा अर्चा, कर्म कांड एकवेळ निभावता येईल  पण क्षमाशील मन, कार्यमग्नता, सेवेतील आनंद आणि वासनेवर विजय संपादन करणे, खूप कठीण.

आजारपणांत लोळत न पडता वेदनारहित मृत्यू आपल्या नशिबात असेल कि  नाही हे आपण सांगू शकत नाही. पण एखादा जीवघेणा आजार झाला तर उगाच उपचार करू नयेत हि आपली इच्छा (Living will) नातेवाईकांना नक्की सांगून  ठेवू शकतो.

मित्रांनो, ह्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. एव्हडे दिवस ह्या विषावर बोलणे म्हणजे पाप समजले जायचे, पण हल्ली निदान ह्या विषयावर बोलले जाते.

मित्रांनो, तुम्ही कधी ह्या विषयावर विचार केला आहे? असेल तर तुमचे विचार नक्की कळवा.
सुधीर वैद्य

१६१०२०१६

Advertisements

0 Responses to “४९८) इच्छा मरण / दया मरण / युथनेशिया”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2016
M T W T F S S
« Oct   Dec »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: