४९७) OCD / obsessive compulsive disorder /मंत्रचाळेपणा

497-ocd-78384_v1                497-ocd-icon-595544

४९७) OCD / obsessive compulsive disorder /मंत्रचाळेपणा 

OCD किंवा मंत्रचाळेपणा हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे. अश्या अवस्थेत रोग्याचा शरीरावरील ताबा कमी पडतो. कळते पण वळत नाही अशी त्याची अवस्था असते. ह्या रोगात माणूस एखादी गोष्ट किंवा काम परत परत करतो. त्याला स्वतः:ला सुद्धा हे कळत असते, पण त्याचा मनावर ताबा राहत नाही. उ.हा. हात धुणे, तोंड धुणे, परत परत चेहरा पुसत राहणे, कुलूप बरोबर लागले आहे की नाही हे तपासणे. एखादा विचार सतत मनात रुंजी घालणे, पैसे परत परत मोजणे  वगैरे. अश्या वागणुकीमुळे  त्या रोग्याचे व घरातील माणसांचे रोजचे  आयुष्य कठीण होत जाते.

ह्या रोगाचे नेमके कारण सांगता येत नाही. बरेच वेळा अश्या रोग्याला acidity, anxiety चा त्रास असतो. अनेक दिवस हा त्रास घराच्या मंडळींच्या लक्षात सुद्धा येत नाही. ह्या आजाराला बळी पडलेला माणूस सुद्धा सुरवातीला कबूल करत नाही व त्याच्याकडे ह्या वर्तणुकीबद्दल explanation – उत्तर  तयार असते.

माझ्या मते हा रोग काही एक दिवसात होत नाही. हळू हळू तो माणसाचा ताबा घेतो. ज्याचे मन दुर्बल आहे, ज्याला inferiority complex आहे, त्याला ह्या रोगाची लागण  होऊ शकते.

मनावर ताबा मिळवणे आणि मनाला आपला गुलाम बनविणे ही प्रक्रिया लहानपणापासून सुरू झाली पाहिजे.

शरीर मनाच्या ताब्यात आणि मन बुद्धीच्या ताब्यात असेल, तर आयुष्यातील बऱ्याच समस्या कमी  होतात. माणसाला सुखी व्हायचे असेल तर त्याला निग्रह आणि संयम आत्मसात करणे आवश्यक आहे.

लहानपणापासून आपल्यावर हे संस्कार केले जातात, पण आपल्याला हे शब्द माहिती असतातच असे नाही. अश्या सूचनांचा आपल्याला राग येतो. पण आपल्या भल्यासाठी काहीवेळा पालक वाईटपणा घेतात, पण प्रयत्न सोडत नाहीत. पण ह्याची जाणीव आपल्याला संतती झाल्यानंतर होते, हे आपले दुर्दैव. असो.

निग्रह हा काही वेळा सोपा असतो, पण संयम मात्र खूप कठीण. निग्रह हे संयमाचे शेवटचे टोक असते. संयम  म्हणजे सुद्धा काही काळा पुरता निग्रहच असतो. परंतु जेव्हा संयम शक्यच होत नाही, तेव्हा निग्रह करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.

निग्रह आणि संयमाची एकदा कास धरली कि सुख – दु:खात आपले पाय जमिनीवर राहतात. हे शब्द आपल्याला चांगली वर्तणूक शैली आत्मसात करण्यास मार्गदर्शन करतात. हे शब्द आत्मसात करून व्यवहारात वागणे वाटते  तेव्हडे सोपे नाही. हि एक तपश्चर्या आहे आणि ह्याचा अभ्यास लहानवयात सुरु करावा लागतो. पण कोणत्याही वयात प्रयत्न केला तरी ह्या बाबतीत यश येईल, कदाचित थोडा अधिक वेळ लागेल. कमीत कमी आपण आपल्या मुलाबाळांना हे शिकवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करू शकतो.

जेव्हा संयम आणि निग्रह कमी पडतो किंवा हरतो तेव्हा माणूस OCD चा बळी होतो. OCD चे अनेक प्रकार असतात व चटकन हे OCD ह्या प्रकारात मोडते हे कळतसुद्धा नाही. असेच काही प्रकार खाली नमूद करतो.

१)  व्यसन: बरेच वेळा व्यसनाची सुरवात सुखाच्या हिंदोळ्यावर होते. आनंद साजरा करायचा म्हणजे कमीत कमी दारू हवीच. दारू कोण घेतो ह्यावरून ह्या व्यसनाला समाजात मान्यता मिळत असते. हळू हळू ह्या दारू पिण्याचे प्रसंग वाढू लागतात. पेगची संख्या आपल्या नकळत वाढू लागते. आपण ह्या सवयीला शब्दांचा मुलामा देऊ लागतो, समर्थनाचा एक दुबळा प्रयत्न करतो.

पण काही लोकांच्या बाबतीत माणूस दारूला सोडत नाही किवा दारू माणसाला सोडत नाही. अश्यावेळी जर माणसाला आपल्यावरील जबादारीची जाणीव  असेल  तर तो निग्रह करतो कि आजपासून मी दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही. योग्य मार्गदर्शक मिळाला तर ह्या प्रयत्नात तो यशस्वी होतो.

पण जर त्या माणसाने वेळेवर संयमाचा आधार घेतला असता, तर निग्रह करण्याची वेळच आली नसती .

२) खाद्य पदार्थाची आवड: काही पदार्थ आपल्याला अतिशय आवडतात. पण म्हणून ते पदार्थ किती खावेत, रोज झाल्याशिवाय चैन पडत नाही, याचे भान आपल्याला नसले, तर त्याची किंमत पोट बिघडण्याचा स्वरूपात आपल्याला चुकवावी लागते. मग काही वेळा आपण तो पदार्थ खाण्याचेच बंद करतो आणि आनंदाला मुकतो. आवडीचा पदार्थ किती खायचा याचा संयम  बाळगता आला तर हा प्रश्न सुटू शकतो.

३) नातेसंबंध : निग्रह आणि संयम जर वापरला नाही तर नातेसंबंध सुद्धा बिघडू शकतात. काही वेळा एखाद्या नातेवाईकाच्या आपण गळ्यात पडतो. त्याच्याशी रोज फोनवर बोलल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. त्याला आपल्या बरोबर वारंवार बोलायला आवडते का – आवडत नाही  हेही आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा आपल्याला हि जाणीव त्याच्याकडून करून दिली जाते, तेव्हा मग आपण त्याच्याशी  कमीत कमी संपर्क करण्याचा निग्रह करतो.

४) वेळेचे नियोजन: साधारणपणे दिवसातील ४० % वेळ हा आपले काम, व्यवसाय (विद्यार्थांनी अभ्यास) ह्यासाठी खर्च केला पाहिजे. ३५ % वेळ कुटुंब, मित्र, छंद, relaxation, विश्रांती ह्यासाठी व्यतीत केला पाहिजे. उरलेला २५% वेळ झोपेसाठी आवश्यक आहे. अशी दिनचर्या आखली नाही तर आयुष्याचा तोल सावरणे कठीण होते. हे वेळापत्रक पाळण्यासाठी निग्रह आणि संयम आवश्यक आहे.

थोडक्यात असे म्हणता येईल की जेव्हा काही कारणांनी एखादी गोष्ट करायला मिळाली नाही (उ.हा. फेसबुक)  किंवा केली नाही तर जेव्हा माणूस अस्वस्थ होतो तेव्हा त्याला OCD  झाला आहे असे समजावे.

In English the phrase obsessive–compulsive is often used in an informal manner unrelated to OCD to describe someone who is excessively meticulous,perfectionistic, absorbed, or otherwise fixated.

तुमच्या आजूबाजूला अशी माणसे असतील, तर त्यांना ह्याची जाणीव करून द्या व जमेल तसे मार्गदर्शन करा.
सुधीर वैद्य

१५१०२०१६

Advertisements

0 Responses to “४९७) OCD / obsessive compulsive disorder /मंत्रचाळेपणा”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2016
M T W T F S S
« Oct   Dec »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: