४९४) मत / सल्ला :

494-opinion-2                   494-opinion-3

 

494-opinion-5     494-opinion-1

 

४९४मत / सल्ला :

आपल्याला रोजच्या आयुष्यात पदोपदी मत देण्याचे प्रसंग येतात. आपल्याला हे कळत सुद्धा नाही की आपण जो संवाद साधत आहोत, त्याचा मुख्य गाभा हा  मतप्रदर्शनाचा असतो.

मत देताना समोरच्यासाठी ‘ श्रेयस्कर काय ‘ आणि समोरच्यासाठी ‘प्रिय काय’

ह्याची सीमा रेषा  ठरवावी लागतेच. श्रेयस्कर बोलणे /मत देणे  हे समोरच्यासाठी प्रिय असतेच असे नाही. समोरच्याला काय ऐकायला आवडते ह्याप्रमाणे मत दिले, तर कालांतराने योग्य ते न घडल्यास ती आपली सुद्धा जबाबदारी असते, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे. कोणी कुठच्या धर्माची कास धरावी, कोणी भविष्याचा वेध घ्यावा, कोणी विज्ञानाचा पाठ पुरावा करावा , हा खरेतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जो पर्यंत ह्या वैयक्तिक मताचा इतरांना त्रास होत नसेल,  तर प्रत्येकाने आपले मत जरूर सांभाळावे.

दुसऱ्याच्या चुका सांगताना – मत देताना, आपणही चुका करतो का? हे तपासले तर बरे होईल. आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवितो तेव्हा तीन बोटे आपणाकडे असतात, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

आपल्या चुकांसाठी आपण चांगले वकील असतो. त्याचवेळी दुसऱ्यांच्या चुका सांगण्यासाठी उत्तम जज असतो, हे वास्तव आहे.

माझ्या मते, कोणी विचारल्यानंतरच आपले मत द्यावे . अश्यावेळी आपण जर ‘ श्रेयस्कर मत ‘ (समोरच्यासाठी श्रेयस्कर – पण त्याला ऐकायला कदाचित आवडणार नाही ) देणार असू तर फारसा प्रश्न पडत नाही . पण लोकांना ‘ प्रिय मत’ आवडते . प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा ‘Your Right is at the cost of My Right ‘ अशी परिस्थिती येते  तेव्हा संघर्ष अटळ असतो.

मत देण्याची गरज लागते कारण चांगला माणूस बनण्यासाठी सुद्धा आपल्याला feedback आवश्यक असतो.  तुम्हाला  एक घडलेला किस्साच सांगतो.

दोन दिवसांपूर्वी  मित्राकडे गेलो होतो. गप्पा-टप्पा झाल्या. चहा – फराळ झाला. मी निघणार, एव्हड्यात मित्राचा नातू हातात सहामाही परीक्षेचे निकाल पत्रक घेऊन धावत आला व आनंदाने म्हणाला कि आजोबा मला ८०% मिळाले. (नातू ५ वीत शिकत आहे. – इंग्रजी माध्यम) त्याची आई बेडरूम मधून बाहेर आली. निकाल पत्र बघितले आणि म्हणाली कि मला अंदाज होताच कि तुझे कमीत कमी १२ – १५ % मार्क कापले जाणार आहेत. तुला खरेतर ९५ % मिळाले आहेत, पण पेपर कडक तपासले आहेत. त्यामुळे तुझ्या बारीक सारीक चुकांचे मार्क टिचरनी  कापले असणार.
आजीपण बाहेर आली व म्हणाली कि मार्क चांगले आहेत व सुनेला समजावू लागली  कि त्याला विषय तर चांगला कळला आहे. मोठा झाला कि बारीक सारीक चुका तो सुधारेल. (१ ली पासून हेच संभाषण चालू आहे. पण अजून सुधारणा नाही. अजून मोठा झाला नसेल.)

हा मुलगा hyperactive आहे. प्रत्येक कामात घाई. सतत बदल हवा असतो. एका जागी ५ मिनिटे बसणार नाही. एक खेळणे घेतले तर थोड्या वेळात दुसरे खेळणे लागेल. अभ्यास करताना दर १०-१५ मिनिटांनी विषय बदलेल.    मी अनेक वेळा सांगितले कि त्याला संध्याकाळी १० मिनिटे एका जागी फारशी हालचाल न करता बसायची सवय लावा. हवेतर सर्वांनी ध्यान करत बसा, म्हणजे तो पण बसेल. त्याला समजावा कि तू हुशार आहेस, ह्याचे वेगळे प्रमाणपत्र मिळणार नाहीये. तुझे मार्क बघून हे जगच  ठरवेल, तुझी हुशारी. त्यामुळे त्याच्या डोक्यात जो ९५ % चा चुकीचा संदेश register झाला आहे तो निघायला मदत होईल. हा सल्ला, मी नातू लहान असल्यापासून देत आहे. पण फारशी अंमलबजावणी होत नाही. कारण मुळात सून मानायला तयार नाही कि तो hyperactive आहे आणि त्यामुळे त्याचे मार्क कापले जातात.

मी त्याचे अभिनंदन करून निघालो. मित्र पण पाय मोकळे करायला माझ्या बरोबर निघाला. मी सहज विचारले कि त्याच्या वडिलांचे काय मत? मित्र म्हणाला कि मुलाचे तर भलतेच मत आहे. तो म्हणतो कि ह्या शालेय शिक्षणात काय दम नाही. (तो स्वत: IT Consultant  आहे.) तो आता पासून नातवाला संगणकीय प्रणाली शिकवणार आहे.

मी घरी परतलो आणि हा लेख लिहायला घेतला. हेच चित्र इतरही घरी दिसण्याची शक्यता आहे.

मित्रानो तुमचा काय सल्ला किवा मत ?

सुधीर वैद्य

१२-१०-२०१६

Advertisements

0 Responses to “४९४) मत / सल्ला :”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2016
M T W T F S S
« Oct   Dec »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: