४८६) तडजोड आणि वैवाहिक आयुष्य

DSC_0014                P1030033

४८६) तडजोड आणि वैवाहिक आयुष्य

तडजोड हा वैवाहिक आयुष्याचा पाया आहे. अर्थात विवाहानंतर सुनेला सर्वात जास्त तडजोड करावी लागते. लग्नानंतर सासरच्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा तडजोड करावी लागते. नवीन सून किती काळात मनाने सासरी रुळेल हे ठरवणे कठीण असते. तिच्या आजपर्यंतच्या आयुष्यात तडजोड करण्याची तिची किती मानसिक तयारी झाली आहे, ह्यावर हि गोष्ट अवलंबून आहे असे मला वाटते.

प्रत्येक माणूस वेगळ्या वातावरणात लहानाचा मोठा होत असतो. त्याने केलेले निरीक्षण, त्याला आलेले अनुभव, घरातील  वातावरण – संस्कार – चालीरीती  हे सगळे वेगळे व व्यक्ती सापेक्ष असते.

जोडीदाराकडूनच्या  सर्व अपेक्षा पूर्ण होतील असे मानणे म्हणजे भाबडेपणा आहे. परंतु विवाहाला संमती देण्यापूर्वी आपल्या नेमक्या काय अपेक्षा आहेत ह्याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. ह्या अपेक्षांची चर्चा सुद्धा झाली पाहिजे. चर्चेनंतर मुलाला  व मुलीला नेमका अंदाज येईल कि लग्नानंतर आपले किती पटेल? आपल्या तडजोडीची सीमारेषा नक्की केली असेल, तर फारसा त्रास होत नाही. काही कारणांनी तडजोड करायला जमले नाही तर, ह्या मानसिक कोंडीतून कसा  मार्ग काढता येईल ह्या गोष्टीवर सुद्धा विचार करून ठेवला पाहिजे.

लग्नाला विलंब झाला असेल तर काही अपेक्षा काळानुसार गळून पडतात – दडपल्या जातात.  पण अपेक्षा मनात जिवंत असतात व वैवाहिक आयुष्याच्या वळणावर एक दिवस त्या अपूर्ण अपेक्षा मनात नागासारखा फणा काढतात व क्षुल्लक कारण घडले तरी मनाचा स्फोट घडवतात.

काही वेळा सुनेला वाटते कि आपण सहज तडजोड करू शकू, ती प्रयत्न सुद्धा करते पण तिला जमत नाही. तिची मानसिक घुसमट होते. तिची खंत नवऱ्याला कळली तरी तिला थोडाफार दिलासा मिळतो.

अश्या वेळी माझा असा सल्ला असेल कि सुनांनी मनातील  घुसमट दाबून न ठेवता नवऱ्याशी, सासू सासऱ्यांशी मोकळेपणाने  बोलली पाहिजे. ह्यातून काय – कसा  मार्ग काढता येईल हे  सांगितले पाहिजे. तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल, कारण हा तुमचा प्रश्न आहे व तुम्हालाच तो सोडवायचा आहे.तुमची घुसमट सासरच्या मंडळींनी ओळखली असेल तर ह्यातून नक्की मार्ग निघेल.

मनाला जास्त त्रास देत बसून नका व  तुम्हाला करावी लागणारी तडजोड किंवा पूर्ण होत नसलेल्या अपेक्षा ह्याची मोकळेपणी चर्चा करा. परंतु आपण  सासरच्या मंडळींना  कबुल केलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का ह्याचा विचार करायला विसरू नका. तुमच्या वाटचालीसाठी  माझ्या शुभेच्छा.

हौशी कौटुंबिक सल्लागाराचे निरीक्षण आणि फुकटचा सल्ला. 🙂 🙂

सुधीर वैद्य

१२१०२०१६

Advertisements

0 Responses to “४८६) तडजोड आणि वैवाहिक आयुष्य”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

October 2016
M T W T F S S
« Sep   Nov »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: