४८२) ०९-०९-२०१६

482-maths-1       482-maths-3

 

४८२०९०९२०१६

आजची तारीख ०९-०९-२०१६.  या तारखेकडे नीट बघा.  विचार करा. काही Clue मिळतोय? असो. मीच suspense दूर करतो. Year ची जर बेरीज केली तर ९ येते. हे आकडे  (९-९-९)  बघून माझ्या मनात काही विचार आले. ते विचार मी आपल्याजवळ Share करत आहे.
हि तारीख असे दर्शविते की आपण सारे एक आहोत. एका अर्थी  हे खरेही आहे की देवानेच आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे. पण प्रत्यक्षात असे दिसते का? खेदाने  ‘नाही’ असेच म्हणावे लागेल. आपण सारी देवाची लेकरे आहोत. पण आपणच माणसा माणसा मध्ये भिंती उभ्या केल्या आहेत. हा लेख म्हणजे या भिंतींची जंत्री होय.

George Orwell had said in his famous novel ‘Animal Farm’ that All are Equal But some are More Equal than Others. हा लेख लिहिताना चटकन ह्या वाक्याची आठवण आली.

१)  आज स्त्री – पुरुष समानता बरेच वेळा बोलण्यापुरती आहे.  समाजात, कचेरीत, घरी, राजकारणात नजर फिरवली  तरी माझे म्हणणे तुम्हाला पटेल. अमेरिकेत ह्या समानतेच्या गप्पा मारल्या जातात पण windows च्या clip art मध्ये एक स्त्री भांडी घासताना दाखविली आहे. 😦

२)  आज आपण बघतो की की श्रीमंतांची लहान मुले लाडा-कोडात वाढतात, तर कित्येक लहान मुले त्यांच्या बालपणाला वंचित होतात. सरकार कायदे करते पण बरेच वेळा ते कायदे कागदावरच रहातात. आजही बाल कामगार दिसतात. गरीब, खालच्या जातीची मुले शिक्षणापासून वंचित राहतात.

३)  राजकारणात कार्यकर्ता फक्त कार्यकर्ताच राहतो. निवडणुकीचे तिकीट द्यावयाची वेळ आली की नेत्यांच्या मुलाबाळांचा विचार होतो.

४)  गरीब -श्रीमंत हा भेद आहेच. श्रीमंत लोकांच्यातही गर्भ-श्रीमंत आणि नव-श्रीमंत हा फरक उरतोच.

५) शिकलेले  व अशिक्षित हा फरक तर जुनाच आहे. त्यात Technology मुळे Computer शिक्षित आणि इतर हा नवीन भेद. स्मार्ट फोन वापरणारे आणि साधा फोन वापरणारे. वातानुकूलित घरात राहणारे – स्वत:चे वाहन असणारे, वगैरे हा एक नवोन फरक. राहणीमानाप्रमाणे हे भेद निर्माण झाले आहेत. एकाची गरज दुसऱ्यासाठी चैन असते. असो.

६)  जातीपातीमुळे दुभंगलेला समाज हा आपल्या मनुष्यजातीला लागलेला काळिमा आहे. ‘जी जात नाही ती जात’.

७)  शहर आणि गाव यातील समाज असाच विभागाला गेला आहे.

८)  पाणी-वीज मिळणारा आणि न मिळणारा असा एक नवीन भेद निर्माण झाला आहे.

९)  मुलगा की मुलगी हा भेद त्याच्या जन्मापूर्वीच सुरु झाला आहे. गर्भ जर मुलगी असेल तर आधीच गर्भपात केला जातो. जन्माला न आलेल्या त्या मुलीचा काय दोष ह्याचा विचार केला जात नाही. मुलगी होणे हे पुरुषावर अवलंबून असते , पण दोष दिला जातो बिचाऱ्या बायकोला. 😦

१०)  एका घरात मुलगा आणि मुलगी  ह्यांना मिळणाऱ्या वागणुकीतही हा  फरक दिसतो.

मित्रानो, काय लिहू आणि किती लिहू. मामला गंभीर आहे आणि ह्याचे निराकरण आपल्याच हातात आहे.

मित्रानो, कराल विचार? हे चित्र बदलू शकते. पाहिजे ती फक्त ‘इच्छा शक्ती.’ Better Late than Never. चला आजच सर्व जण हा भेद मिटविण्यासाठी एक पाउल टाकूया.

सुधीर  वैद्य

०९-०९-२०१६

Advertisements

0 Responses to “४८२) ०९-०९-२०१६”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

October 2016
M T W T F S S
« Sep   Nov »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: