४६६) स्पंदने – हौशी कौटुंबिक सल्लागाराचा सुखी वैवाहिक आयुष्यासाठी सल्ला

P1000667.JPG

४६६) स्पंदनेहौशी कौटुंबिक सल्लागाराचा  सुखी वैवाहिक आयुष्यासाठी सल्ला 

ह्या घडीला मागे वळून बघताना असे वाटते कि सल्ला देण्याचा वारसा मला वडिलांकडून मिळाला आहे. माझे आणि वडिलांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. मला त्यांचा सहवास फक्त १८ वर्षे मिळाला. मी खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूने  कसा विचार करावा हे मी त्यांच्याकडून आत्मसात  केले.  पुढे अति उच्च शिक्षण पूर्ण करून मी व्यावसाईक सल्लागार झालो, त्यावेळी ह्या लहानपणी शिकलेल्या गोष्टींचा मला खूप उपयोग झाला.

मी १९९८ सालापासून समुपदेशनाचे काम (माझा व्यवसाय सांभाळून)  सहनिवासातील मुले – मुली – जेष्ठ नागरिक, सुना – सासवा ह्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करत आहे. माझ्या लेखनात काही अनुभव मी share केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या, तरुणांच्या  छोट्या, मोठ्या  खाजगी –  कौटुंबिक Problem चा गुंता सोडवत होतो. आजही हे काम निवृत्तीनंतर  चालू आहे.

१९९७ साली पर्यायी वैद्यक शाखेचा अभ्यास केला व १९९८ पासून नियमितपणे Society तील लोकांचे  BP  & Pathological Reports  तपासू लागलो.  (विना मोबदला) आजारी माणसाला वैद्यकीय सल्ला व  धीर देऊ लागलो. म्हाताऱ्या लोकांसाठी वेळ काढू लागलो. बरेच ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे येऊन मन मोकळे करतात. नाहीतरी त्यांचे ऐकायला घराच्या मंडळीना वेळ कोठे असतो? हे व्रत आजतागायत चालू आहे.

गरजवंताला मानसिक आधार देणे हा समाजापुढील गंभीर प्रश्न आहे. प्रत्येकानेच आपल्या हातून होईल ती सर्व मदत अश्या अभागी जीवाला दिली पाहिजे.

कौटुंबिक सल्लागार म्हणून मी कोणतेही प्रशिक्षण  घेतले नाहीये. पण वस्तुनिष्ठ विचार करण्याची पद्धत आत्मसात केल्यामुळे मी हे काम आवडीने करू लागलो.  …. विना मोबदला.

माझ्या अनेक लेखात आयुष्याबद्दलचे विचार शब्दबद्ध होतात. समस्येकडे कसे बघितले पाहिजे – कसा विचार केला पाहिजे वगैरे गोष्टींचे मार्गदर्शन सुद्धा असते. माझ्या संकेत स्थळावर आणि ब्लॉग  वर हे लेख उपलब्द्ध आहेत.  ह्या लिखाणाचा फायदा कदाचित तुम्हाला सुद्धा होऊ शकेल?

लग्न हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मी अनेक वर्षापूर्वी जगावेगळा,

रूढी बाह्य, चालीरितीना पूर्णपणे फाटा देऊन नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला आणि यशस्वी सुद्धा केला.  हे लग्न  ३० दिवससुद्धा टिकणार नाही असा आशीर्वाद असतानासुद्धा, हे लग्न ३० वर्षाहून अधिक काळ आम्ही टिकविले, हि हकीकत आहे. असो.

एक हौशी समुपदेशक म्हणून काही ओळखीचे लोक, नातेवाईक, मित्र, माझे Assistants, Client आणि त्यांचा कर्मचारी वर्ग, माझा अनेकवेळा सल्ला  घेतात. अनेक जण त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात आणि त्यांना फायदा होतो, काही वागत नाहीत – काही ना ते जमत नाही. पण हे लोक कालांतराने मी दिलेला सल्ला मानायला हवा होता असे न विसरता सांगतात. लग्नाळू मुलीना आणि मुलांना मी बरेच काही सांगतो – समजावतो, जेणे करून लग्नानंतरच्या आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोण सुधारेल.

लग्नानंतर माणसाचे (स्त्री -पुरुष ) आयुष्य मार्गी लागते – सुधारते – जैसे थे राहते – किंवा बिघडते. हे पूर्व सुकृतानुसार घडते. परंतु ह्यासाठी नशिबाला  सर्व दोष देणे योग्य नाही असे माझे मत आहे. प्रेमाचे धागे जुळावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण असे खूप प्रेमाचे संबंध जुळतातच असे नाही, असा सार्वत्रिक अनुभव आहे . परंतु निदान वैवाहिक संबंध एका छताखाली राहण्याइतपत निर्माण होतील – सुधारतील ह्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू शकतो.

एक दिवस एका लग्नाळू मुलीने मला विनंती केली कि काका हे सगळे तुम्ही लेखात शब्दबद्ध का करीत नाही? त्यानंतर मी दिलेला सल्ला शब्दबद्ध केरु लागलो. काही लेख लिहिले व ब्लॉग वर अपलोड केले.  हे लेख वाचून तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल याची मला खात्री आहे. कदाचित हे सल्ले – टिप्स थोड्या रुक्ष वाटतील. मी मान्य करतो कि ह्या टिप्स रुक्ष आहेत,  कारण त्या पूर्णपणे व्यवहारीक  पातळीवर लिहिलेल्या आहेत. ह्या टिप्सप्रमाणे वागले तर काहीहि  नुकसान न होता, झाला तर फायदाच होईल.

लग्न ठरलेल्या मुला – मुलींचे काही प्रातिनिधिक प्रश्न असतात. अनेक जण  हे प्रश्न विचारतातच. त्यामुळे मी अश्या प्रातिनिधिक प्रश्नांना दिलेली उत्तरे शब्दबद्ध केली आहेत.

सुधीर वैद्य

१४०६२०१६

Advertisements

0 Responses to “४६६) स्पंदने – हौशी कौटुंबिक सल्लागाराचा सुखी वैवाहिक आयुष्यासाठी सल्ला”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

September 2016
M T W T F S S
« Aug   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: