१४०) The Mahabharata – a child’s view / Samhita Arni

140-mahabharat

१४०) The Mahabharata – a child’s view / Samhita Arni / July 1996 / edition December 2009 / Pages 287/ Tara books / Rs. 475/- English 

हे पुस्तक लेखिकेने वयाच्या १२ व्या  वर्षी लिहिले आहे. पुस्तकातील चित्रे लेखिकेने स्वत: काढली आहेत. जगभरात ७ भाषेत हे पूस्तक प्रसिद्ध झाले आहे व ५०००० हुन जास्त copies विकल्या गेल्या आहेत. संकेत स्थळ: http://www.samarni.com

आपल्याला पैकी अनेक जण महाभारत व रामायणातील गोष्टी ऐकत मोठे झाले आहेत. लेखिकेने वयाच्या चौथ्या वर्षी महाभारताच्या कथा वाचल्या. तिला ह्या कथांतून काय कळले, हे समजण्यासाठी तिला लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. त्यामुळे ह्या पुस्तकाचे स्वरूप म्हणजे लेखिकेला अवगत झालेले महाभारत असे म्हणता येईल. परंतु पुस्तकातील लेखिकेचे मनोगत  वाचलेत, तर तिच्या बुध्दीचे कौतुक वाटेल. तिने व्यक्त केलेली मते व त्यामागील कारण मीमांसा  आपल्याला

आश्चर्यचकित करते. एव्हडेच करून ती थांबलेली नाही, तर तिने महाभारत व रामायण ह्यांची तुलना सुद्धा केली आहे.

आपल्या घरातील मुलांच्या हुशारीचे आपण कौतुक करतो.  परंतु जर ह्या मुलांच्या विचार शक्तीची लेखिकेच्या वैचारिक पातळीशी तुलना केली, तर आपल्याला ज्या हुशारीचे कौतुक वाटते त्या हुशारीचे खरे स्वरूप उघड होईल.

पुस्तक सोप्या इंग्लिश भाषेत लिहिले आहे. इंग्लिश मिडीयम मध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलं-बाळांना  वाचायला काहीच अडचण येणार नाही. महाभारताच्या गोष्टींबरोबर त्यांच्या वैचारिक कक्षा विस्तारायला  हे पुस्तक खतपाणी घालेल, हे नक्की.

सुधीर वैद्य

२६-०८-२०१६

Advertisements

0 Responses to “१४०) The Mahabharata – a child’s view / Samhita Arni”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

September 2016
M T W T F S S
« Aug   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: