१३८) इसाक बागवान / शब्दांकन – अजय ताम्हणे

138-isak-bagwan

१३८) इसाक बागवान / शब्दांकन – अजय ताम्हणे/ Evershine Publication / दुसरी आवृत्ती ऑक्टोबर २०१५ / पृष्ठे ३१२ / रुपये ३०० / 

लेखकाचा परिचय:

एका शूर पोलीस अधिकाऱ्याचे हे अनुभव कथन आहे. लेखक पोलीस दलात जुलै १९७६ ला PSI म्हणून रुजू झाले व ३१-०५-२००९ रोजी ACP म्हणून निवृत्त झाले. त्यांना पोलीस दलातील उत्कृष्ठ सेवेबद्दल ३ राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. हे त्यांचे आत्मचरित्र नाही. पुस्तकाला श्री विश्वास नागरे पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक) ह्यांनी प्रस्तावना दिली आहे.

दोन शब्द पुस्तकाबद्दल:

एका बेधडक पोलीस अधिकाऱ्याचे मुंबई गुन्हेगारी जगातील बेमिसाल खरे अनुभव आहेत. पुस्तकातील प्रस्तावना व लेखकाचे मनोगत वाचल्यानंतर आपण कोणत्याही पानापासून हे पुस्तक वाचू शकतो. प्रत्येक केस निराळी आहे. हे पुस्तक वाचताना लेखकाची  कार्यशैली उलगडत जाते. असे प्रामाणिक अधिकारी होते व आजही  पोलीस दलात आहेत, म्हणून आपण सुरक्षित आहोत.

वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास वाचताना पूर्वी घडलेल्या ह्या घटना आपल्याला आठवतात. हे पुस्तक म्हणजे प्रत्येक नवीन पोलीस अधिकाऱ्यांसाठी पोलीस दलातील सेवेचा वस्तुपाठ आहे.

पुस्तकातील शेवटचे प्रकरण ‘ मुंबईवर अतिरेकी हल्ला २६-११-२००८’ वाचायला विसरू नका. त्यावेळी जसे श्री विश्वास नागरे पाटीलनी अतिरेक्यांना ताज महाल हॉटेलात जखडून ठेवले तसेच लेखकाने अतिरेक्यांना कुलाबा येथील नरिमन हाऊस मध्ये दोन  दिवस जखडून ठेवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ह्या पराक्रमासाठी त्यांना तिसरा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

मित्रांनो, वेळात वेळ काढून हे पुस्तक  नक्की वाचा.

लेखकाला सर्व वाचकांतर्फे मानाचा मुजरा . लेखकाला सर्वांच्या वतीने दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो.

सुधीर वैद्य

२०-०८-२०१६

Advertisements

0 Responses to “१३८) इसाक बागवान / शब्दांकन – अजय ताम्हणे”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

September 2016
M T W T F S S
« Aug   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: