१३३) लक्ष्मण रेषा / आर के लक्ष्मण

133) 100320164694-001        133) 100320164696-001

१३३) लक्ष्मण रेषा / अनुवाद अशोक जैन / राजहंस प्रकाशन / आत्मचरित्र 

आर के लक्ष्मण आणि त्यांनी काढलेली व्यंगचित्रे पाहून आमच्या पिढीचा दिवस सुरु होत असे. हे रूढ अर्थाने त्यांचे आत्मचरित्र नाही. लेखकाचा जीवन प्रवास आणि त्यांची बहरलेली  व्यंगचित्रकला  ह्यांची हि वेगळ्या अर्थाने जुगलबंदी आहे.

लेखकाने विपुल लेखन केले आहे. अनेक व्याख्याने दिली आहेत. जगभर प्रवास करून ह्या क्षेत्रातील मान्यवरांना ते भेटले आहेत. ५० वर्षाहून अधिक काळ त्यांनी TOI मध्ये नोकरी केली.

गणपती व कावळा ह्या विषयावर त्यांनी उत्तम चित्रे काढली आहेत. ह्या चित्रांचे त्याकाळी प्रदर्शनसुद्धा भरवलेले होते. त्यांनी टिपलेल्या कावळ्याच्या लकबी पाहून त्यांच्या निरीक्षण शक्तीचे कौतुक करावेसे वाटते. कावळ्यांची काही चित्रे ह्या पुस्तकात दिली आहेत.

पुस्तकातील मजकूर वाचताना  व त्याबरोबरची व्यंगचित्रे  बघताना खूप गंमत वाटते.

ज्या काळात आणि परिस्थतीत लेखकाने common man साकारला, त्या सामान्य माणसाची परिस्थती आजही तशीच आहे. कदाचित आजचा common man जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण च्या चौकटीत अधिकच गोंधळलेला   आहे.

आयुष्यभर त्यांनी आपल्या व्यंगचित्राचा दर्जा उच्च राखण्यात यश मिळवले. पुस्तकाच्या शेवटी  ह्या कलेच्या बदलत्या स्वरूपाबद्दल ते खंत व्यक्त करतात.

पुस्तक नक्की वाचनीय आहे. पुस्तक वाचताना गेल्या ५० वर्षांचा काळ जिवंत होतो व आपण नकळतपणे आपल्या तारुण्यात  डोकावतो.

श्री अशोक जैन ह्यांनी ओघवत्या शैलीत अनुवाद केला आहे. असे सुंदर पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल प्रकाशकाचे अभिनंदन.

सुधीर वैद्य

१२-०३-२०१६

Advertisements

0 Responses to “१३३) लक्ष्मण रेषा / आर के लक्ष्मण”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

August 2016
M T W T F S S
« Jul   Sep »
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: